Ramayana Movie : १६०० कोटींच्या भव्य ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूरचं

Usha Nadkarni : “एक चित्रपट केला की स्वत:ला हॉलिवूडचे समजतात”
मराठी चित्रपटसृष्टीत बेस्ट ‘खाष्ट सासू’ म्हटलं की केवळ एकाच ज्येष्ठ अभिनेत्रीचा चेहरा डोळ्यांसमोर येतो त्या म्हणजे उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) . ‘माहेरची साडी’ या क्लासिक चित्रपटामुळे घराघरांत पोहोचलेल्या उषा यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतीलही त्यांनी साकारलेली सासू प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. उषा नाडकर्णी केवळ अभिनयामुळेच नाही तर त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळेही कायम चर्चेत असतात. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी मराठीत कौतुक नाही तर जळकुटेपणा फार आहे असं विधान केलं आहे. नेमकं त्या काय म्हणाल्या नक्की वाचा…(Marathi movies)

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उषा नाडकर्णी म्हणाल्या की, “मराठीत कौतुक नाही जळकुटेपणा खूप आहे”, “एक चित्रपट केला तर स्वत:ला मोठे हॉलीवूडचे समजायला लागतात. मराठीमध्ये काही ठिकाणचं वातावरण बघून असं वाटतं की नको. आपण आपलं काम करू आणि संपलं म्हटलं की घरी जाऊ. हिंदीत प्रेम खूप करतात आणि कौतुकही होतं. आपल्या मराठीत कौतुक नाही जळकुटेपणा खूप आहे.”(Entertainment news)

उषाताई पुढे म्हणाल्या की, “मला एका निर्माती बाईंचा फोन आला होता, तेव्हा मला त्या म्हणाल्या, ‘उषा तू खूप छान काम करत आहेस. पण मी बघितलं तिकडे हिंदीत तुला खूपच प्रेम करतात. मग मराठीत का नाही?’ यावर मी त्यांना असं म्हटलेलं की, ‘मराठीत सगळ्यांची जळते. आम्ही हिच्याबद्दल इतकं बोलूनही हिला कामं कशी मिळतात.’ माझ्याकडे कोणाचे नंबर्स नाहीत. मला कोणाला फोन करून काम दे असं म्हणायचं नाही. आजपर्यंत उषा ही आहे ती तिच्या कामामुळे आहे.”
================================
=================================
उषा नाडकर्णी ‘वास्तव’, ‘क्रिष्णा कॉटेज’, ‘पक पक पकाक’, ‘वन टु थ्री’, ‘हुप्पा हुय्या’, ‘देऊळ’, ‘भूतनाथ रिटर्न्स’, ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’, ‘रुस्तम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तसेच, नुकत्याच त्या सेलिब्रिटी मास्टर शेफ कार्यक्रमातही सहभागी झाल्या होत्या.(Usha Nadkarni movies)