Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे

Reema Lagoo : शरद पोंक्षेंना घरच्यांच्या नकळत रिमा ताईंनी पैसे का दिले?
बॉलिवूडमध्ये ‘कुल आई’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू (Reema Lagoo) फार लवकरच मराठी-हिंदी चित्रपट आणि नाट्यसृष्टी पोरकी करुन निघून गेल्या. नाटक, मालिका, चित्रपट या मनोरंजनाच्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांना आपलंसं केलं. चित्रपटांमध्ये आदर्श आईची भूमिका साकारणाऱ्या रिमा वैयक्तिक जीवनातही निर्मळ आणि मदतीला धावून जाणाऱ्या होत्या. सहकलाकारांना हवी ती मदत करणाऱ्या रिमा लागूंची चक्क एका अभिनेत्याला घरच्यांना कळू न देता लाखो रुपयांची मदत केली होती. कोण होता हा कलाकार आणि काय आहे किस्सा जाणून घ्या…(Marathi entertainment news)

तर, रिमा लागू यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांना हक्काचं घर घेण्यासाठी आर्थिक मदत केली होती. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पोंक्षेंनी रिमा लागूंची खास आठवण काढत हा किस्सा सांगितला. शरद म्हणाले की, “मी रीमा ताईंबरोबर नाटक करत होते. आमचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. एकदा मी ‘झाले मोकळे आभाळ’ या नाटकाच्या तालमीनंतर जरा विचार करत बसलो होतो. तर त्या मागून आल्या आणि “काय झालं?” असं विचारलं. त्यावर मी त्यांना “काही नाही… रोज हा भाईंदरवरुन प्रवास करून थकलो आहे. मला या सगळ्याचा कंटाळा आला आहे” असं म्हटलं. तर त्यावर ती म्हणाली, “भाईंदरपेक्षा थोडं पुढे ये ना?”.(Bollywood tadaka)

त्यावर शरद रिमा ताईंना म्हणाले, “कसं येऊ रीमाताई. माझ्याकडे भाईंदर सोडून घर घेण्यासाठी पैसे नाहीत गं…म्हाडाचं घर घ्यायचं म्हटलं तरी मला तीन-साडेतीन लाख रुपये लागतील.” असं मी तिला सहजच बोलून गेलो. त्यावर तिनेसुद्धा मग जवळ घेत “होईल रे! काळजी करू नको” असं म्हटलं. दहा-बारा दिवसांनी तिने फोन करून मला घरी जेवायला बोलावलं”.(Entertainment news)

शरद पोंक्षे पुढे म्हणाले, “तिच्या घरी गेलो तर तिची मुलगी मृण्मयी आणि राजन ताम्हाणे होते; काही वेळाने ते कामानिमित्त बाहेर पडले. सगळे गेल्यानंतर रीमाताई मला म्हणाली, “अरे हे सगळे जायचीच मी वाट बघत होते. कारण तुला पैसे द्यायचे आहेत. मला हे घरच्यांना कळू द्यायचं नाही. मी एक जाहिरात केली. त्याचा चेक मिळाला आहे. त्यावर मी नाव टाकलेलं नाही. तर हा चेक तुला देते. भाईंदरवरुन आता बोरीवलीमध्ये ये आणि तू म्हणत होतास ते म्हाडाचं घर घे. जमेल तसं मला हे पैसे दे. मी तुला एका सीएचा नंबर देते. महिन्याला चार-पाच हजार जमतील तसे आणि तुला परवडतील तसे हे पैसे परत कर. काही घाई नाही.” कालांतराने शरद पोंक्षे यांनी तीन वर्षात दिवस-रात्र काम करुन रिमा लागू यांना पैसे परत केले. शेवटचा चेक देताना शरद यांनी रिमा लागूंना आवडणारी काळी साडी आणि चेक देऊ केला होता. (Bollywood news)
================================
हे देखील वाचा: Reema Lagoo : बॉलिवूडच्या ‘कूल आई’ला पाहून श्रीदेवीलाही वाटायची भीती!
=================================
खरंच रिमा लागू यांच्याविषयी बोलावं तितकं कमी आहे. त्यांनी १९७९ मध्ये ‘सिंहासन’ या मराठीतील गाजलेल्या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर १०० पेक्षा अधिक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिका देखील केल्या. ‘तु तु मैं मैं’ (Tu Tu Mein Mein) ही हिंदी मालिका तर विशेष लोकप्रिय ठरली. याव्यतिरिक्त ‘मैंने प्यार किया’, ‘कुछ कुछ होता है’, ‘हम साथ साथ है’, ‘हम आपकें है कौन?’, ‘वास्तव’, ‘कल हो ना हो’, ‘साजन’, ‘सावली’, ‘आपली माणसं’, ‘बिंधास्त’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कामं केली.(Reema Lagoo movies)