
Pallavi Joshi : “मी हिंदीतच काम करते अशी मराठी चित्रपटसृष्टीची समजूत आहे”
‘सारेगमप लिटिल चॅम्प’ हा कार्यक्रम जितका लहान मुलांची गाणी ऐकण्यासाठी पाहिला जात होता तितकाच तो पल्लवी जोशीच्या (Pallavi Joshi) अॅंकरिंगसाठी पाहिला जात होता. बालकलाकारापासून सुरु झालेली पल्लवी जोशीची अभिनयाची जर्नी द काश्मीर फाईल्सपर्यंत येऊन पोहोचली. मात्र, मराठी असूनही फारशी मराठी चित्रपटसृष्टीत न दिसलेल्या पल्लवी जोशीने याचं आता थेट उत्तर देत मराठी चित्रपटसृष्टीच मला बोलावत नाही अशी तक्रार तिने केली आहे.(Marathi movies)

पल्लवी जोशी हिने ग्रहण मालिकेत काम केलं होतं. मात्र, त्यानंतर कुठल्याच मराठी मालिकेत किंवा चित्रपटात ती दिसली नाही. याबद्दल महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना तिने उत्तर दिलं आहे. पल्लवी म्हणाली की, “मराठी इंडस्ट्री मला बोलवतच नाही. मी हिंदीतच असते अशीच त्यांची समजूत झाली आहे. मी मराठी चित्रपट आवर्जुन बघते. ही भूमिका मी चांगली करु शकले असते असंही मला बऱ्याचवेळा वाटतं. मला मराठीत काम करायला आवडतंच.”(Bollywood news)

पल्लवी पुढे असं देखील म्हणाली की, “हिंदीत मी आणि माझा नवरा विवेक एकत्र काम करतो. पण असं असलं तरी आम्ही स्वतंत्र काम करत नाही असं मुळीच नाही. त्यालाही स्वतंत्र कामासाठी विचारलं जातं. विवेक फक्त बायकोसोबतच काम करतो असा त्याच्याबाबतीत कोणी समज करुन घेतलेला नाही. मात्र, माझ्याबाबतीत तो नक्कीच करुन घेतला आहे. अभिनेत्री तर मी आहेच पण मी एक निर्मातीसुद्धा आहे हे सगळे सोयीस्कररित्या विसरतात. मी फक्त नवऱ्यासोबतच काम करते असं नाहीए.” त्यामुळे पल्लवी जोशीने व्यक्त केलेल्या भावनांचा मराठी चित्रपटसृष्टीतील मेकर्स गांभीर्याने विचार करतील का? आणि भविष्यात मराठी चित्रपटांमध्ये पल्लवी दिसणार का? हे पाहणं महत्वाचं असेल. (Bollywood tadaka)
================================
हे देखील वाचा: Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?
=================================
पल्लवी जोशीने १९७३ साली आलेल्या ‘नाग मेरे साथी’ या चित्रपटातून वयाच्या चौथ्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर बालकलाकार म्हणून पल्लवीने ‘आदमी सडक का’ (१९७७) आणि ‘दादा’ (१९७९) या चित्रपटांमध्ये कामं केली. पुढे, ‘बदला’, ‘रक्षाबंधन’, ‘डाकू और महात्मा’, ‘ड्रीम गर्ल’, ‘दोस्त असावा तर असा’, ‘अमृत’, ‘एक कहाणी’, ‘रिटा’,’द मेकिंग ऑफ महात्मा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली. लवकरच, ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटात दिसणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुपम खेर करणार आहेत. (Pallavi Joshi Movies)