Gharoghari Matichya Chuli मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर करणार

Dev Anand आणि सुरैय्याची अधुरी एक प्रेम कहाणी
हिंदी सिनेमाच्या सुवर्ण विभागातील तीन आघाडीचे सदाबहार अभिनेते. दिलीप कुमार, राज कपूर आणि देव आनंद. या तिघांच्याही त्या काळातील असफल प्रेमाच्या कहाण्या आज देखील रसिक आठवत असतात. दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि मधुबाला, राज कपूर (Raj Kapoor) आणि नर्गिस, देव आनंद आणि सुरैया. या तीनही स्टोरीजचा काळ पन्नासच्या दशकाचा पूर्वार्ध होता. देव आणि सुरैया यांच्या प्रेमकहाणीला पूर्ण विराम फार लवकर मिळाला. (bollywood news)

या दोघांचं खरोखरच एकमेकांवर खूप प्रेम होते. सुरैया तर देव वर जान कुर्बान करत होती पण तिच्या घरच्यांचा या दोघांच्या लग्नाला विरोध होता. विशेषतः तिच्या आजीचा या लग्नाला प्रचंड विरोध. लग्नाच्या विरोधाचे मुख्य कारण दोघांचे वेगवेगळे धर्म हेच होते. त्यामुळे हे दोघे कधीच एकत्र येऊ शकले नाहीत. सुरैयाने आयुष्यभर लग्नच केले नाही देव आनंद ने मात्र हे प्रकरण मिटल्यानंतर कल्पना कार्तिक सोबत लग्न केलं. (Entertainment)

सातारच्या दशकात स्टार डस्ट या मासिकाला सुरैयाने एक प्रदीर्घ मुलाखत दिली होती. यात तिने सांगितले होते. “ खरं तर माझ्या भित्रेपणामुळे आमचं लग्न होऊ शकले नाही. मी थोडं जरी धाडस त्यावेळेला दाखवलं असतं तरी आमचं नक्की लग्न होऊ शकलं असतं.” सुरैया आणि देव आनंद त्या काळातली हिट पेअर होती. सुरैया ही त्या काळातील मोठी गायिका अभिनेत्री होती. तिच्या समकालीन अभिनेत्रींमध्ये ती काकणभर सरस होती. देव ला ती अभिनयाच्या क्षेत्रात सिनियर होती. या दोघांचे एकूण सात चित्रपट आहेत. (untold story)
======================
हे देखील वाचा: Dev anand : देव आनंद पाकिस्तानी क्रिकेटपटूला घेऊन हा चित्रपट बनवणार होता!
======================
विद्या(१९४८), शायर, जीत (१९४९), नीली , अफसर (१९५०), सनम. दो सितारे (१९५१)‘जीत’ या चित्रपटात हे दोघे पळून जाऊन लग्न करतात असा एक शॉट होता. देव आनंदच्या डोक्यात एक आयडिया आली . त्याने सुरैया विचारले,” जर आपण या खोट्या खोट्या फिल्मी लग्नाच्या निमित्ताने खरंच लग्न करून टाकलं तर? म्हणजे सिनेमातील लग्नासाठी आपण दोघांनी वधूवराचे पोशाख परिधान करायचे. लग्न लावण्यासाठी गुरुजी येतील. सात फेरे होतील. लोक अक्षता टाकतील. हे सर्व फिल्म शूट होत असताना आपण खऱ्या गुरुजीला तिथे बोलवायचं आणि त्यांच्याकडून आपले (खरे) लग्न लावून घ्यायचे!” दोघांनाही हि भन्नाट आयडिया आवडली. सेटवर त्यांनी सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला. (Bollywood tadaka)

सिनेमातील काही मेंबर्सला त्यांनी या आपल्या प्रोजेक्ट मध्ये सामील करून घेतले. सुरैया तर प्रचंड खूष होती. तिच्या मनातला राजकुमार उद्यापासून तिचा होणार होता. देवला देखील रात्रभर झोप लागलीच नाही. दुसऱ्या दिवशी दोघे लवकर सेटवर पोहोचले. लग्नाचा सेट उभारला गेला. त्यांचा मेकअप करण्यात आला. लग्नाची जय्यत तयारी तिथे चालू झाली. दोघांचे मनात खुशी के लड्डू फुट रहे थे.पण दोघांचे दुर्दैव आड आले. त्यांच्या युनिट मधील एक व्यक्ती असा होता त्याला या दोघांच्या प्लॅनची भनक लागली आणि त्याने ती बातमी सुरैयाच्या घरापर्यंत पोहोचवली. तिथे भूकंप झाला. सुरैयाची आजी प्रचंड चिडली. पोलिसांना घेऊन ती सेटवर दाखल झाली. आणि देव आणि सुरैया चा सिनेमातील खोटा खोटा विवाह समारंभ आणि त्यानंतर लगेच होणारा खरा विवाह समारंभा वर पाणी पडले. रील आणि रियल लाईफ मधील फक्त रील लाइफ मधील लग्न होऊ शकले. सुरैया च्या आजी फरपटत सेट वरून तिला घेऊन गेली! (Bollywood update)
======================
हे देखील वाचा: Ameeta चे ‘फिल्मी बारसे’ वाचकांचा कौल घेवून करण्यात आले.
======================
सुरैयाची आजी खूप कर्मठ विचारांची होती. तिला हिंदू जावई आवडणे शक्यच नव्हते. या प्रकारानंतर तिच्या घरचे खूपच चौकन्ने झाले आणि त्यांनी एक खास माणूस तिच्या वर लक्ष ठेवण्यासाठी सेट पाठवायला सुरुवात केली. हळूहळू दोघांच्याही लक्षात आले की आपल्या या प्रेमप्रकरणाची पुढे काही होऊ शकत नाही. अर्थात देव आनंद कडून प्रयत्न चालूच होते. त्याचा एक मित्र पोलीस मध्ये होता त्याच्याकडून आजीला घाबरवून तिचे मन वळवण्याचा प्रयत्न झाला पण सारे प्रयत्न व्यर्थ झाले. ‘अफसर’ या चित्रपटानंतर दोघेही पुन्हा कधीच न भेटण्यासाठी वेगळे झाले! (Entertainment tadaka)