Jarann Movie OTT Release: दमदार अभिनयात गुंफलेली भय आणि भावनांची उत्कंठावर्धक गोष्ट ‘जारण’

Ashok Saraf : “पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण”
महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf) यांना राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते २७ मे २०२५ रोजी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. कलाक्षेत्रात गेले अनेक वर्ष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला. हास्यसम्राट अशोक सराफ ५० वर्षांपेक्षा अधिक काळ मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहेत. मनोरंजनसृष्टीत इतकी वर्ष कार्य करणाऱ्या या कलावंताचा पद्मश्री देऊन केलेला सन्मान हा कलासृष्टीला गौरवण्यात आल्यासारखं आहे.(Bollywood update)

पद्मश्री अशोक सराफ (Ashok saraf) यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना एएनआय या वृत्तसंस्थेशी व्यक्त करताना म्हटलं की, “ही एक आनंदाची गोष्ट आहे, अशाप्रकारे सन्मान होणे ही एक मोठी बाब आहे. हा पुरस्कार एक उच्चस्तरीय सन्मान आहे. मला आनंद आहे की, या पुरस्कारासाठी मला पात्र समजण्यात आलं, म्हणजे मी आयुष्यात नक्कीच काहीतरी काम केलं आहे”. पुरस्कार तुम्हाला उशीरा दिला गेला का? असा प्रश्न विचारला असता सराफ म्हणाले की, “असं अजिबात नाही, मला हा पुरस्कार मिळाला हीच महत्वाची गोष्ट आहे. विसरले तर नाही ना? विसरले असते तर कदाचित मी काही बोललो असतो. त्यांच्या लक्षात कसं आलं किंवा त्यांनी आधीच विचार केला होता, हे मला माहीत नाही. पण पुरस्कार मिळाला हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे”.(Latest marathi entertainment news)

तसेच, काळानुसार अपडेट राहण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच अशोक सराफ यांनी इन्स्टाग्रामवर आपलं अकाऊंट सुरु केलं होतं. पद्मश्री मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मिडियावरही पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबियांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद कायम असंच राहू द्या”.(Bollywood news)
================================
हे देखील वाचा: Ashok Saraf पद्मश्री अशोक सराफ यांची कारकीर्द
=================================
अशोक सराफ यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दिबद्दल बोलायचं झालं तर १९६९ मध्ये ‘जानकी’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीतील अभिनयाची सुरुवात केली होती. त्यापूर्वी रंगभूमीवर विविध नाटकांमधून त्यांची कामं सुरुच होती. वयाच्या १८व्या वर्षी ‘ययाति आणि देवयानी’ या नाटकात ते काम करत होते. पुढे चित्रपटांचा त्यांचा सुरु झालेला प्रवास आजपर्यंत अविरत सुरुच आहे. विनोदी चित्रपटांचा एक वेगळा काळ त्यांनी प्रेक्षकांना दिला. ‘दोन्ही घरचा पाहूणा’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘हळदी कुंकू’, ‘धुम धडाका’, ‘पांडू हवालदार’, ‘अबोध’, ‘घर घर की कहाणी’, ‘मा बेटी’ अशा अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या. (Ashok Saraf Movies)