Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

कलात्मक चित्रपटाची नांदी देणारा : Bhuvan Shome!

लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Digpal Lanjekar : शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय’- स्वारी

२०२५ मधील टॉप १० बॉलिवूडच्या यादीत Kantara 1 ची ग्रॅण्ड

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Nana Patekar यांनी संजय दत्तला का केलं होतं बॉयकॉट?

 Nana Patekar यांनी संजय दत्तला का केलं होतं बॉयकॉट?
कलाकृती विशेष

Nana Patekar यांनी संजय दत्तला का केलं होतं बॉयकॉट?

by रसिका शिंदे-पॉल 03/06/2025

१९९३ चं साल आठवलं की अंगावर शहारेच येतात… मुंबईत एकामागून एक १२ बॉम्बस्फोट झाले होते… या भयावह दुर्घटनेत अनेकांनी आपल्या घरच्यांना गमावलं… आणि या बॉम्बस्फोटात अभिनेता संजय दत्तचं (Sanjay Dutt) नाव समोर आलं आणि २७ वर्ष त्याच्यावर कारवाई सुरु होती.. अखेर TADA संजयवर लागला आणि तुरुंगाची हवा त्याला भोगावी लागलीच… वैयक्तिक जीवनात १९९३ च्या बॉम्बस्फोटाने संजयचं जीवन पार बदलून टाकलं होतं.. आणि त्याच्या करिअरवरही त्याचा गंभीर परिणाम झाला होता… बरेच चित्रपट संजय दत्तच्या हातून निसटले होते आणि नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी तर चक्क कधीच संजय दत्त सोबत काम करणार नसल्याचं जाहिरपणे सांगितलं होतं… काय होता तो किस्सा आणि नेमकं झालं तरी काय होतं जाणून घेऊयात…(Bollywood news)

सध्या ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे… या चित्रपटात पहिल्यांदाच १८ well known कलाकार एकत्र दिसणार आहेतच शिवाय भारतीय चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन क्लायमॅक्स देखील दाखवले जाणार आहेत…. आता हाऊसफुल्लची चर्चा सुरु आहेच तर यातील दोन कलाकारांबद्दल जरा रंजक किस्सा ऐकूयात.. हे दोन कलाकार आहेत नाना पाटेकर आणि संजय दत्त… नानांनी चक्क संजय दत्त सोबत कधीच पुढे काम करणार नाही असं म्हटलं होतं.. पण आता इतक्या वर्षांनी ‘हाऊसफुल्ल ५’ मध्ये नाना आणि संजय एकत्र दिसणार आहेत… (Entertainment dhamaka)

तर झालं असं की १२ मार्च १९९३ साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले… यात सर्वसमान्यांसोबतच विविध क्षेत्रातील लोकांनीही आपल्या कुटुंबियांना गमावलं… या दु्र्घटनेत नाना पाटेकर यांनी आपल्या भावाला गमावलं होतं आणि त्यांची बायको मरता मरता वाचली होती..९३ मध्ये वरळीत झालेल्या बॉम्बस्फोटात नाना पाटेकरांच्या भावाचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर नानांनी आयुष्यात कधीच संजय दत्त सोबत काम करणार नाही असं म्हटलं होतं..१९९३ च्या बॉम्बस्फोटासाठी संजय दत्त (Sanjay Dutt) जबाबदार आहे असं मी म्हणत नाही पण त्याचं नाव या प्रकरणात आलं होतं.. संजय सोबत कांम न करण्याचा निर्णय केवळ माझ्या भावाचा मृत्यू नसून इतर ज्या लोकांनी आपल्या माणसांना गमावलं आहे त्यांच्यासाठीही मी हा निर्णय घेतोय आणि संजय दत्तच्या चित्रपटांना बॉयकॉट करतो असं नाना पाटेकर म्हणाले होते… आणि त्यानुसार कधीच नाना आणि संजय एकत्र दिसले नाहीत.. (Nana patekar and 1993 bomb blast)

२००७ मध्ये ‘दस कहानिया’ (Dus Kahaniya) हा चित्रपट आला होता ज्यात संजय दत्त आणि नाना पाटेकर एका चित्रपटाचा जरी भाग असले तरी त्यांनी स्क्रिन स्पेस शेअर केली नव्हती… आत्तापर्यंत ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) चित्रपटाच्या ट्रेलर, टीझर किंवा गाण्यांमध्ये कुठेच नाना पाटेकर आणि संजय दत्त एकत्र दिसले नाहीत…. त्यामुळे संपूर्ण हाऊसफुल्ल ५ मध्ये एका चित्रपटात असूनही ते दोघे स्क्रिन शेअर करणार की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे..

================================

हे देखील वाचा: Housefull 5 : नाना पाटेकरांनी पत्रकाराची घेतली फिरकी म्हणाले, “प्रश्न इंग्रजीत नाही तर….”

=================================

तरुण मनसुखानी यांचं दिग्दर्शन असणाऱ्या ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, श्रेयस तळपदे, जॉनी लिव्हर, फरदीन खान, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, जॅकलिन फर्नांडिस, सौंदर्या शर्मा, सोनम बाजवा, नर्गिस फाकरी, चित्रगंधा सिंग, चंकी पांडे, डिनो मॉरिया, रणजीत बेदी अशी मोठी कलाकरांची फौज झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दोन क्लायमॅक्सही असणार आहेत. त्यामुळे हाऊसफुल्ल फ्रेंचायझीमधील या पाचव्या भागाला प्रेक्षक प्रतिसाद कसा देणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. (Housefull 5 movie cast)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: 1993 bomb blast in mumbai Abhishek Bachchan actor Akshay Kumar Bollywood Bollywood Chitchat bollywood movies Bollywood News Celebrity Celebrity News dus kahaniya movie Entertainment Get Latest Marathi Entertainment update housefull 5 housefull movie latest marathi entertainment news marathi entertainment news nana patekar Riteish Deshmukh sanjay dutt
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.