Madhubala मुंबईच्या मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Mahesh Kothare : ‘पछाडलेला’ चित्रपटआणि सुलोचना दीदींचं कनेक्शन काय?
मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर-कॉमेडी (Horror-Comedy movies) हा प्रकार प्रामुख्याने रुजवणारा चित्रपट म्हणजे पछाडलेला. दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kotahre) यांनी नेहमीच टेक्लॉलॉजीचा वापर करुन मराठी चित्रपटांना बळ देण्याचा प्रयत्न केला. ‘पछाडलेला’ (Pachadlela movie) या चित्रपटाचं कथानक, कलाकार जितके गाजले आणि लक्षात राहिले तितकाच या चित्रपटातील वाडा प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला. बाब्या, किरकिरे, दुर्गा मावशी यांच्यासोबत जोडलेला हा वाडा महाराष्ट्रात नेमका कुठे आहे तुम्हाला माहित आहे का? आणि हो या चित्रपटात बाब्याची एन्ट्री कशी झाली याचा किस्सा माहित आहे का? चला तर जाणून घेऊयात…(marathi entertainment news)
२००४ साली ‘पछाडलेला’ हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटात भरत जाधव, श्रेयस तळपदे, अभिराम भडकमकर, दिलीप प्रभावळकर, विजय चव्हाण, वंदना गुप्ते, नीलम शिर्के असे दिग्गज कलाकार या चित्रपटात होते. दुर्दैवाने लक्ष्मीकांत बेर्डे यांचा त्यांच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दितील शेवटचा चित्रपट ठरला. तर, या चित्रपटातील “बाबा लगीन”,” सुड दुर्गे सुड”, हे संवाद ज्या वाड्यातून ऐकू येत होते तो गुढ वाडा कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालूक्यात आहे. या वाड्याचं नाव पंत अमात्य बावडेकर वाडा असं असून संपूर्ण चित्रपटाचं शुटींग याच वाड्यात झालं आहे. आजही या वाड्याची ओळख पछाडलेला चित्रपटातील वाडा अशी असून पर्यटक आवर्जून हा वाडा पाहायला कोल्हापूरात जातात.(Marathi movies)

आता वळूयात पछाडलेला चित्रपटातील बाब्या नेमका महेश कोठारे यांना सापडला कसा त्या किस्स्यावर… तर, ‘पछाडलेला’मध्ये बाब्याची भूमिका अभिनेता अमेय हुनासवाडकर याने केली आहे. इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यानेच हा चित्रपट त्याच्या पदरी कसा पडला याची रंजक कथा सांगितली होती. अमेय म्हणाला होता की, “सुलोचना ताईंच्या (पद्मश्री सुलोचना लाटकर) पंच्याहत्तरीनिमित्त रंगशारदामध्ये कार्यक्रम होता. सुलोचना ताईंबरोबर मी स्टेजवर उभा होतो. तिथे कोठारे आले आणि त्यांनी सुलोचना ताईंना शुभेच्छा दिल्या. तेव्हा ते म्हणाले की मी एक चित्रपट करतोय पण मला एक कॅरेक्टर मिळत नाहीय आहे. सुलोचना ताईंनी तेव्हा माझ्याकडे बोट दाखवलं आणि त्या महेश कोठारेंना म्हणाल्या की हा चालतोय का बघ. महेश कोठारेंनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले की उद्या माझ्या ऑफिसमध्ये ये”.(Entertainment news)

पुढे अमेय म्हणाला की, “मी दुसऱ्या दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे अभिराम भडकमकर, महेश कोठारे आणि त्यांची पूर्ण फॅमिली होती. त्यांना मी माझं आधीचं काम दाखवलं. त्यानंतर लूक टेस्ट झाली आणि मला तो सिनेमा मिळाला. कोल्हापूरला सिनेमाचं शूटिंग होतं. पहिलाच शॉट माझा होता. आणि भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, श्रेयस तळपदे असे सगळेच होते. पछाडलेला नंतर माझं रस्त्यावर पाणीपुरी, भेळपुरी खाणं सगळं बंद झालं. लोक मला खरंच वेडा समजायचे. काही लोक ट्रीटमेंट सुरू आहे क? असं देखील विचारायचे”, अशी रंजक आठवण त्याने सांगितली. (Bollywood)
================================
हे देखील वाचा: Indian Cinema : ‘गुड्डी’ ते ‘जब वी मेट’ ; बॉलिवूडच्या चित्रपटांचे साऊथ रिमेक्स!
=================================
थोडक्यात काय तर महेश कोठारे यांना पद्मश्री सुलोचना लाटकर (Padma Shri Sulochana Latkar) यांच्यामुळे पछाडलेला चित्रपटातील बाब्या गवसला होता. ‘पछाडलेला’ चित्रपटाला रिलीज होऊन २१ वर्ष झाली असली तरी प्रेक्षकांच्या मनावर आजही चित्रपट अधिराज्य गाजवत आहे. टी.व्हीवर पछाडलेला लागला तरी लोकं आवर्जून पाहतात.(Marathi movie)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi | Marathi Entertainment News