Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sholay : स्पर्धेत टिकले कोण? गळपटले कोण?

Bollywood Movies : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांचं झालंय

Shilpa Shetty : “मी महाराष्ट्राची मुलगी…”,मराठी-हिंदी भाषा वादावर शिल्पाचं सूचक

‘बिग बॉस मराठी’ फेम Janhavi Killekar ची मालिकेत एन्ट्री; मोहिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना

Actress Snehlata Vasaikar आता होणार माईसाहेब; ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेत करणार

Son Of Sardaar 2 Trailer: अजय देवगनच्या हटके कॉमेडीने चाहते

Bahubali Movie :१० वर्षांनी पुन्हा एकदा ‘बाहुबली’ एका ट्विस्टसह भेटीला

राजेश खन्ना यांच्या ‘या’ सिनेमाच्या मुहूर्ताची क्लॅप Amitabh Bahchan यांनी

Genelia Deshmukh : ‘सितारे जमीन पर’ नंतर तिच्याच सुपरहिट चित्रपटाच्या

Filmfare Awards Marathi 2025 : ‘पाणी’ ने मारली बाजी; तर

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mahesh Kothare : ‘धुमध़डाका’तून दिग्गज अभिनेत्याला कोठारेंनी चित्रपट सोडायला का सांगितलं?

 Mahesh Kothare : ‘धुमध़डाका’तून दिग्गज अभिनेत्याला कोठारेंनी चित्रपट सोडायला का सांगितलं?
कलाकृती तडका

Mahesh Kothare : ‘धुमध़डाका’तून दिग्गज अभिनेत्याला कोठारेंनी चित्रपट सोडायला का सांगितलं?

by रसिका शिंदे-पॉल 14/04/2025

“धनाजी राव मुडदाबाद…” गाणं सुरु झालं ना डोक्यात.. ‘धुमधडाका’ (Dhum Dhadaka) चित्रपटातील अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांची तिघडी गाजली तितकीच अभिनेते शरद तळवळकर यांची धनाजी वाकडे ही भूमिकाही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. दिग्दर्शक महेश कोठारे यांचा मराठी चित्रपटसृष्टीतल धुमधडाका हा चित्रपट माईलस्टोन ठरला. महेश कोठारे यांनी आपल्या पुस्तकात या चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानचे काही मजेदार किस्से लिहिले आहेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल कि या चित्रपटाच्या मेकिंगवेळी महेश कोठारे आणि धनाजीराव वाकडे ही अजरामर भूमिका साकारणारे शरद तळवलकर यांच्यात वाद झाले होते. आणि महेश यांनी थेट शरद यांना चित्रपटातून काढून टाकण्याची धमकी दिली होती. काय होता किस्सा वाचा… (Sharad talvalkar)

महेश कोठारे यांचा ‘धूमधडाका’ चित्रपट ‘प्यार किये जा’चा रिमेक होता. तर झालं असं की, महेश यांना चित्रपटाची स्क्रिप्ट पटकथालेखक अण्णासाहेब देऊळकर यांच्याकडून लिहून घ्यायची होती. अण्णासाहेब देऊळकर म्हणजे कोण? तर, ‘लेक चालली सासरला’, ‘माहेरची साडी’, ‘कुंकू’, ‘खट्याळ बायको नाठाळ सून’, ‘नशीबवान’ या सारख्या सुपरहिट चित्रपटांचे पटकथाकार. पण स्वत: अण्णांनी नाना करमरकरांचे नाव पटकथा लेखनासाठी सुचवलं. त्यांच्या सल्ल्यानुसार नानांना ही जबाबदारी मिळाली. चित्रपटाची स्क्रिप्ट लिहून झाल्यानंतर महेश यांच्या लक्षात आलं कि नानांनी चक्क ‘प्यार किये जा’ चित्रपटाचे संवाद अगदी तसेच्या तसे मराठी भाषेत उतरवले आहेत. ही तक्रार कोठारें अण्णासाहेब देऊळकरांकडे केली आणि अखेर अण्णा- महेश यांनीच पुन्हा स्क्रिप्ट लिहायचं ठरवलं. (Bollywood mox masala)

महेश कोठारे यांच्या मनासारखी स्क्रिप्ट लिहून तयार होती आणि चित्रपटाच्या मुहुर्ताचा दिवळ देखील जवळ आला होता. धुमधडाका चित्रपटातील सगळ्या कलाकारांच्या राहण्याची सोय पन्हाळ्यावरील एका हॉटेलमध्ये करण्यात आली होती. महेश यांनी धुमधडाकाच संपूर्ण ‘स्क्रिप्ट’ कलाकारांना आधीच वाचायला दिलं होतं. मुहूर्ताचा सिन शूट करणार त्याच्या अगदी आदल्या दिवशी ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर ज्यांनी चित्रपटात धनाजी वाकडे ही भूमिका साकारली आहे ते पहिल्या स्क्रिप्टचे लेखक नाना करमरकर याना घेऊन सेटवर आले. नाना या चित्रपट एक छोटासा रोल देखील करणार होते. आणि शरद महेश कोठारे यांच्याकडे स्क्रिप्टबद्दल बोलायचा गेले.(Bollywood tadaka)

शरद तळवळकर म्हणाले, “महेश, आपल्या नानानं आधी जे ‘स्क्रिप्ट’ लिहिलं होतं तेच खूप छान होतं रे. अण्णांनी स्क्रिप्टमध्ये सगळ्यांना बांधून ठेवलंय!” ते ऐकून महेश दोन मिनिटं स्तब्धचं झाले. उद्या सकाळी शूट सुरु होणार आणि आदल्या रात्री चित्रपटाचं ‘स्क्रिप्ट’ चांगलं नाही असं एक ज्येष्ठ आणि तरबेज अभिनेते महेश यांना सांगत असल्यामुळे साहाजिकचमहेश विचारात पडले. आणि यावेळी नाना पण महेश यांना म्हणाले की, ‘शरदरावांचे म्हणणं मला बरोबर वाटतंय. माझंच ‘स्क्रिप्ट’ तुम्ही घेतली असती तर बरं झालं असत.’ (Entertainment news)

===============================

हे देखील वाचा: उत्तम युक्तिवाद करूनही हाय कोर्टात केस हरले होते ॲड महेश कोठारे!

===============================

अगदी कमी वयात महेश कोठारे चित्रपटाचं दिग्दर्शन करत असल्यामुळे ते कताही निर्णय फारच तडकाफडकी घ्यायचे. कुणी आपल्याला ‘डॉमिनेट’ करू नये, असं त्यांना वाटायचं. खरं तर, मोठे कलाकार नवख्या दिग्दर्शकांसोबत असं वागतात हा कोठारेंचा समज झाला होता. त्यामुळे आपल्यासोबत असं काही होऊ द्यायचं नाही हा विचार करत महेश शर तळवळकरांना म्हणाले की, “शरदराव, अण्णासाहेबांचं स्क्रिप्टच आपण फॉलो करणार आहोत. कारण ते खूप विचार केल्यानंतर आम्ही ‘ओके’ केलं आहे. तुम्हाला जर का ते आवडलं नसेल तर तुम्ही हा चित्रपट सोडू शकता. आज रात्रभर तुम्ही विचार करा आणि उद्या सकाळपर्यंत मला तुमचा निर्णय सांगा. म्हणजे मला तुमची रिप्लेसमेन्ट शोधता येईल!”. महेश यांचं हे रोखठोक बोलणं शरदरावांना जराही अपेक्षित नव्हत हे सर्व ऐकून ते थोडे गांगरलेच. (Mahesh kothare movies)

दुसऱ्या दिवशी सकाळी महेश कोठारे (Mahesh kothare) सेटवर आले आणि त्याआधीच शरद तळवळकर तिथे उपस्थित होते. शरद यांनी बरीच वर्ष मराठी चित्रपट आणि रंगभूमी अभिनयाने गाजवली होती, परंतु त्यांनी स्क्रिप्टचा मुद्दा काढून आपल्याला अडचणीत आणायला नको होतं असं महेश कोठारेंचं मत होतं. त्यामुळे महेश यांचा त्यांच्यावरचा राग अजूनही कायमच होता. महेश यांनी कामाला सुरुवात केली. त्यांना पाहून राव महेश यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, ”महेश, करूया आपण हा चित्रपट एकत्र.” ते ऐकताच महेश म्हणाले, ”करूया म्हणजे काय शरदराव… करायलाच पाहिजे! मला तुमचं संपूर्ण सहकार्य हवंय आणि मुख्य म्हणजे आपण अण्णासाहेबांचं ‘स्क्रिप्ट’ फॉलो करणार आहोत. आणि अशाप्रकारे धुमधडाका हा मराठीतील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. (Marathi films untold stories)

‘धुमधडाका’ चित्रपटात अशोक सराफ (Ashok Saraf), लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे, निवेदिता सराफ, प्रेमा किरण, सुरेखा राणे,जयराम कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दरम्यान, १९८५ साली आलेल्या ‘धुमधडाका’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आपलं स्थान निर्माण केलं आहे. (Dhum Dhadaka Movie)

रसिका शिंदे-पॉल

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress ashok saraf Bollywood Bollywood Chitchat dhum dhadaka Entertainment Laxmikant Berde Mahesh Kothare Marathi Movie Nivedita saraf sharad talv=akkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.