Madhubala मुंबईच्या मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Marathi Films 2025 : बॉलिवूडच्या प्रोडक्शन हाऊसला मराठी चित्रपटांची ओढ!
मराठी चित्रपट (Marathi films) किंवा कुठलाही चित्रपट म्हटलं की आर्थिक उलाढाल ही आलीच… सध्या मराठीत वेगवेगळ्या विषय आणि आशयांचे प्रयोग फार केले जात आहेत. हॉरर, कॉमेडी, रोमॅंटिक, थ्रिलर या प्रकारातील चित्रपट जरी येत असले तरी प्रेक्षकांचा अधिक कल हा विनोदी चित्रपटांकडेच दिसतो. मराठी चित्रपट कथेच्या बाबतीत जरी हिरो असले तरी आर्थिक गणित म्हटलं की जरा एक पाऊस मागे पडतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये चक्क बॉलिवूडलाही मराठी चित्रपटांची भूरळ पडली असून दिग्गज कलाकार आणि त्यांच्या निर्मिती संस्थांनी मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. चला तर जाणून घेऊयात…(Bollywood producers and marathi films)
अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने तिच्या अभिनय क्षेत्रातही सिलेक्टेड पण खणखणीत भूमिका साकारल्या आहेत. निर्मितीच्या बाबतीतही उत्कृष्ट कथानक निवडत ‘व्हेंटिलेटर’ (Ventilator) या चित्रपटाची निर्मिती केली. यानंतर तिने अलीकडेच आलेल्या ‘पाणी’ (Paani) या चित्रपटाची देखील निर्मिती करुन प्रेक्षकांची शाबासकी मिळवली होती. यानंतरचा कलाकार म्हणजे खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kuamr). अक्षयने ‘७२ मैल एक प्रवास’ या चित्रपटाची ट्विंकल खन्ना आणि अश्विनी यर्दी यांच्यासोबत सहनिर्मिती केली होती. सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळाली होती. (Latest entertainment news)

आता पुढचा कलाकार हा आपल्या मातीतलाच आहे तो म्हणजे रितेश देशमुख (Riteish Deshmukh). बऱ्याच जणांना कदाचित ठाऊक नसेल पण सेक्स एड्युकेशनवर भाष्य करणारा ‘बालक पालक’ या चित्रपटाची रितेश देशमुख याने निर्मिती केली होती. त्यानंतर ‘लई भारी’ चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर ‘वेड’ (Ved movie) चित्रपटातून रितेश दिग्दर्शक म्हणूनही समोर आला होता. आता रितेश देशमुख त्याची निर्मिती असलेला पहिला ऐतिहासिक भव्य चित्रपट ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji movie) प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असून हा चित्रपट तब्बल ६ भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.(Historical Bollywood and marathi films)

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कायमच मराठी चित्रपटांबद्दल विशेष प्रेम आणि आपुलकी वाटली आहे. मराठी चित्रपटांविषयीचा आदर म्हणून त्यांनी ‘विहिर’ (vihir) या सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची निर्मिती केली होती. यानंतर ‘ए.बी आणि सी.डी’ या चित्रपटाची निर्मिती करत अमिताभ यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhle) यांच्यासोबत काम देखील केलं होतं. आता वळूयात त्या अभिनेत्याकडे ज्याच्या घरातच मराठी आहे. ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांचा जावई अजय देवगण (Ajay Devgan) याने केवळ मराठी चित्रपटांची निर्मितीच केली नाही तर त्याने हिंदीत मराठी पात्र देखील साकारली आहेत. अजय देवगण याने ‘विट्टी दांडू’ आणि ‘आपला मानूस’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे.(Entertainment news)

यापुढील अभिनेत्याबद्दल फारसं कुणाला माहित नसेल… रंगभूमीवर गाजलेलं नाटक ‘सविता दामोदर परांजपे’ हे मोठ्या पडद्यावर २०१८ मध्ये झळकलं होतं; आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) याने या चित्रपटाची निर्मिती केली होती. आणि आता लवकरच बॉलिवूडमधील सर्वात मोठी आणि नावजलेली निर्मिती संस्था धर्मा प्रोडक्शन्स (Dharema Productions) मराठीकडे वळळी आहे. संजय जाधव यांचं दिग्दर्शन असणाऱ्या ‘ये रे ये रे पैसा ३’ चित्रपटाची निर्मिती करण जोहर (Karan Johar) यांची धर्मा प्रोडक्शन ही निर्मिती संस्था करणार असून मराठीत हे त्यांचं पहिलं पाऊल आहे. त्यामुळे आगामी काळात नक्कीच हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या अभिनय आणि आर्थिक पाठबळामुळे मराठी चित्रपट आणखी मोठी झेप घेईल यात शंका नाही. (Bollywood celebrities as Producers)
================================
=================================
२०१८ मध्ये आलेल्या ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटाचा हा तिसरा भाग असून यात ५ कोटींचा घोटाळा असणार आहे. चित्रपटात सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘ये रे ये रे पैसा ३’ चित्रपटाची तिप्पट धमाल प्रेक्षकांना १८ जुलै २०२५ रोजी अनुभवता येणार आहे. (YeReYeRe Paisa 3 movie)
रसिका शिंदे-पॉल
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi | Marathi Entertainment News