Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

Nana Patekar एक्स गर्लफ्रेंड मनिषा कोईरालाबद्दल काय म्हणाले?

Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

अनुराधा : Hrishikesh Mukherjee यांची भावरम्य कविता!

Amitabh Bachchan यांचं खरं नाव ‘हे’ असतं; भाऊ अजिताभने केला

Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!

Bappi Lahiri ने संगीत दिलेल्या गाण्याला किशोर कुमारने कसे इम्प्रोवाइज केले?

‘मनाचे श्लोक’मधून Leena Bhagwat – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mahesh Kothare : मराठी चित्रपटसृष्टीतील टॅक्नॉलॉजीचा बादशाह!

 Mahesh Kothare : मराठी चित्रपटसृष्टीतील टॅक्नॉलॉजीचा बादशाह!
कलाकृती विशेष

Mahesh Kothare : मराठी चित्रपटसृष्टीतील टॅक्नॉलॉजीचा बादशाह!

by रसिका शिंदे-पॉल 06/06/2025

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रत्येक भाषेतील चित्रपटाचा एक USP असतो… आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय? तर, हॉलिवूड म्हटलं की High end टॅक्नोलॉजी, बॉलिवूड म्हटलं की सुपरस्टार्स आणि आपली मराठी चित्रपटसृष्टी म्हटलं की content driven चित्रपट… मुळात भारतात चित्रपटांचा पाया दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) या मराठमोळ्या माणसाने रोवला.. परदेशातून चित्रपटांचं तंत्रज्ञान शिकून आलेल्या फाळकेंनी लोकांना हे मनोरंजनाचं एक माध्यम दिलं… अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मराठीतल्या एका दिग्गज अभिनेता आणि दिग्दर्शकाने चक्क मराठीत पहिला 3D चित्रपट आणला.. कोण आहे हा अवलिया चित्रपटप्रेमी आणि त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला technologyने कसं परिपुर्ण केलं जाणून घेऊयात…. (Marathi Movies)

घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालेले हे दिग्गज अभिनेते आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक-अभिनेते आणि निर्मात आहेत.. ते म्हणजे ‘डॅम इट’ या शब्दाचे मालकी हक्क असणारे The Mahesh Kothare… वडिल अंबर कोठारे सुप्रसिद्ध अभिनेते असल्यामुळे अगदी बालपणापासूनच महेश यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली…छोटा जवान या हिंदी चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून हिंदीत पाऊल टाकलं.. पुढे राजा और रंक, मेरे लाल अशा चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली.. पण पुढे अभिनयापेक्षा दिग्दर्शनाकडे त्यांचं मन वळू लागलं आणि मग १९८३ साली ‘मासूम’ या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करत महेश कोठारे यांनी दिग्दर्शकिय क्षेत्रात आपला नवा प्रवास सुरु केला.. खर तर केवळ ग्रेट कथा आणि बेस्ट कलाकार यांच्या जोडीला चित्रपटात technology हवी हा महत्वाचा विचार करत महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांमध्ये cinemascope (anemographic format), dolby digital sound, VFX यांचा वापर करायला सुरुवात केली…(Entertainment)

१९९० साली महेश कोठारे यांचा ‘धडाकेबाज’ हा चित्रपट आला होता.. ज्यात त्यांनी cinemascope (anemographic format) वापरला होता.. या चित्रपटातील गंगाराम हे कॅरेक्टर आपल्या सगळ्यांना माहित आहेच.. लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी साकारलेला गंगाराम बाटलीत दाखवला होता.. आता १९९० मध्ये हे कसं साध्य करणार? यासाठी महेश कोठारेंनी थेट यु.एस गाठलं आणि gfx मध्ये मास्टरी मिळवण्यासाठी त्यांनी १ वर्ष तिथेच घालवलं.. त्यावेळी अमेरिकेच्या चित्रपटांमध्ये blue screen हा ग्राफिक्सचा प्रकार वापरला जात होता.. त्यांनी धडाकेबाजमधील गंगाराम तयार करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत परदेशातून काही equipments मागवण्याचा निर्णय घेतला होता.. कोडॅक कंपनीकडे त्यांनी काही imported negatives आणि इतर साहित्यांची मागणी केली होती.. पण त्यांनी मदत न केल्यामुळे महेश यांनी थेट अजूबा या चित्रपटाचे सिनेमॅटॉग्राफर यांच्याशी संपर्क साधला आणि मराठी चित्रपटासाठी परदेशातून तंत्रज्ञानाचा साठा ते घेऊन आले…(Technology and Marathi movies)

इतकंच नाही तर आपल्या काही चित्रपटांमध्ये sound quality अधिक उत्कृष्ट करण्यासाठी त्यांनी डॉल्बी साऊंडचाही वापर केला होता.. 2d sound असणारं हे तंत्रज्ञान वापरुन त्यांनी थिएटरमध्ये चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी आवाज अधिक क्लिअर ऐकू येण्यासाठी ही तर्तूद केली होती.. महेश कोठारे यांनी अनेक आयकॉनिक चित्रपट दिले.. इतकंच नाही तर त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील खलनायकही आयकॉनिक ठरले… झपाटलेला हा त्यांचा आणखी एक क्लासिक चित्रपट ज्यात चक्क बोलका बाहूला होता… रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहूल्याला त्यांनी एक technology चा एक वेगळाच टच देत जीवंत केलं होतं… परदेशातून त्यांनी ग्राफिक्स, मोशन अशा तंत्रज्ञानाचं शिक्षण घेत मराठी चित्रपटांमध्ये वापरण्याचा प्रयत्न केला होता.. आता वेगवेगळ्या प्रकारे चित्रपटांचं प्रमोशन केलं जातं.. पण १९९३ मध्ये ‘झपाटलेला’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी महेश कोठारेंनी वेगळीच शक्कल लढवली होती.. थिएटरबाहेर झपाटलेला चित्रपटाचं पोस्टर लागलं होतं आणि त्यात तात्या विंचू थोडा बाहेर आल्याचं दिसत होतं.. tech savy असणाऱ्या महेश यांनी तात्या विंचूच्या फोटोमागे एक मोटर लावली होती आणि ती सुरु केली तो पोस्टरच्या बाहेर यायचा आणि त्याच्या डोळ्यातील लाईट पेटायची.. तर अशा या हटके प्रयोगाने महेश कोठारेंनी प्रेक्षकांना भंडावून सोडलं होतं.. परिणामी ‘झपाटलेला’ सुपरहिट ठरला होता..(Bollywood news)

आता लवकरच ‘झपाटलेला’ मधील तात्या विंचू आधुनिकतेच्या या जगात एक वेगळंच रुप घेणार आहे… ‘झपाटलेला ३’ चित्रपटात तात्या विंचू चक्क AIच्या वापराने बोलणार असून अगदी जीवंत वाटणार आहे… टेक्नो फ्रीक असणारे महेश कोठारे आणि ‘झपाटलेला ३’ मध्ये अ‍ॅनिमेट्रॉनिक्स आणि अत्याधुनिक CGI चा वापर करणार आहेत… त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत ज्या माणसाने तंत्रज्ञान आणले तोच कलावंत मराठी चित्रपटांना आणखी एक उभारी देणार हे निश्चितच…(Latest Marathi news)

================================

हे देखील वाचा: Ashok Saraf : अभिनयाचे बादशाह!

=================================

१९६४ सालात सुरु झालेला महेश कोठारे यांचा सिनेसृष्टीचा प्रवास अजूनही सुरुच आहे.. ‘सफर’, ‘प्रीत तुझी माझी’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘थोरली जाऊ’, ‘गुपचुप गुपचुप’, ‘थरथराट’, ‘पछाडलेला’ अशा अके चित्रपटांमध्ये कामं करत दिग्दर्शनही केलं… मराठी चित्रपटसृष्टीला तंत्रज्ञानाची देण देऊ करणाऱ्या या चित्रपटप्रेमीला खरंच सॅल्यूट. मराठी चित्रपटसृष्टीत खऱ्या अर्थाने टॅक्नॉलॉजीचं इनोव्हेशन महेश कोठारे यांनी आणलं. (Director Mahesh Kothare)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aadinath kothare bollywood movies Bollywood News Entertainment News latest entertainment news in marathi Mahesh Kothare marathi entertainment news marathi films update marathi movies
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.