Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sonali Bendre हिने अखेर तिच्या आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल मौन सोडलं!

 Sonali Bendre हिने अखेर तिच्या आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल मौन सोडलं!
मिक्स मसाला

Sonali Bendre हिने अखेर तिच्या आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल मौन सोडलं!

by रसिका शिंदे-पॉल 09/06/2025

बॉलिवूडचा ९०चा आणि २०००चा सुरुवातीचा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे (Sonali Bendre). कॅन्सरचं निदान झाल्यानंतर परदेशात उपचारासाठी गेलेली सोनाली बेंद्रे पुन्हा चित्रपटात काही दिसलीच नाही. पण ९०चं दशक आपल्या अभिनय आणि सौंदर्याने गाजवणारी सोनाली आणखी एका कारणामुळे विशेष चर्चेत होती. आणि ते कारण म्हणजे राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांचं नातं. काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात २०-२५ वर्षांनी सोनाली आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच मंचावर दिसले होते. यावेळी नजरेने राज ठाकरे यांनी सोनाली खुनावत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता या व्हिडिओवर राज ठाकरे यांच्यासोबतच्या नात्यावर सोनाली बेंद्रेने खुलासा केला आहे.(Entertainment news)

बऱ्याच वर्षांपुर्वी मनसे अधयक्ष राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्यात विशेष नातं होतं आणि राज ठाकरेंना सोनालीशी लग्न करायचं होतं पण ते शक्य झालं नव्हतं अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. अशातच बऱ्याच वर्षांनंतर सोनाली आणि राज यांचा कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याबद्दल सोनालीला ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने त्या व्हायरल व्हिडीओवरून प्रश्न विचारला होता. “त्या व्हिडीओनंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली की वीस वर्षांपूर्वी राज ठाकरे यांचं सोनालीवर क्रश होतं”. त्यावर सोनाली म्हणाली की, “तसं खरंच होतं का?… मला तर शंका वाटते.” पुढे त्या व्हायरल क्लिपबद्दल सोनाली म्हणाली, “मी तिथे माझ्या बहिणीशी बोलत होते, जी तिथेच उभी होती. आणि जेव्हा लोकं असं काहीतरी बोलतात तेव्हा मला अजिबात आवडत नाही. यात कुटुंबही सहभागी असतात आणि इतर लोकसुद्धा त्यात सहभागी असतात.”(Bollywood)

पुढे सोनाली हिने ठाकरे आणि बेंद्रे कुटुंबातील नातेसंबंध फार जुने असल्याचं म्हटलं. सोनाली म्हणाली की, “माझे भावजी क्रिकेटर आहेत आणि ते राजच्या चुलत बहिणीच्या पतीसोबत क्रिकेट खेळायचे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या बहिणीची सासू रुईयामध्ये, हेड ऑफ डिपार्टमेंट होत्या, ज्या रुईया कॉलेजमध्ये इंग्लिश लिटरेचरही शिकवायच्या. तिथेच माझंही शिक्षण झालं होतं. त्यामुळे ते सर्वजण एकमेकांना ओळखायचे. राज यांची पत्नी शर्मिला, त्यांची सासू आणि माझी मावशी यांच्यातही खूप चांगली मैत्री आहे. शर्मिला (Sharmila Raj Thackeray) यांच्या आईने मला दहा दिवसांपर्यंत त्यांच्याकडे ठेवलं होतं”, असं ती पुढे म्हणाली. सरतेशेवटी यापलीकडे मी राज ठाकरेला अधिक ओळखत नसल्याचं सोनाली म्हणाली.(Bollywood Masala)

खरं तर बॉलिवूडमधले कलाकार आणि राजकारणी यांच्यातील नातेसंबंध जोडले जातात. त्यांच्या अफेरच्या चर्चा रंगतातच. राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्याही नात्याबद्दल ९०च्या दशकात फार बोललं गेलं होतं. पण आता जवळपास २०-३० वर्षांनी अखेर सोनाली बेंद्रे हिने अफेरच्या चर्चांना पुर्णविराम लावला आहे. (Bollywood tadaka)

================================

हे देखील वाचा: Mahesh Kothare : ‘पछाडलेला’ चित्रपटआणि सुलोचना दीदींचं कनेक्शन काय?

=================================

सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) हिच्या सिनेकारकिर्दिबद्दल बोलायचं झालं तर, १९९४ साली ‘आग’ या चित्रपटातून सोनालीने अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘नाराज’, ‘रक्षक’, ‘भाई’, ‘अंगारे’, ‘ड्युपलिकेट’, ‘मेजर साब’, ‘सरफरोश’, ‘हम साथ साथ है’, ‘हमारा दिल आपकें पास है’, ‘चोरी चोरी’, ‘शंकर दादा एम.बी.बी.एस’ अशा हिंदीसह साऊथ चित्रपटांमध्येही सोनालीने कामं केली आहेत. (Sonali Bendre Movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Gossip Bollywood News bollywood tadaka Celebrities Update in Marathi Entertainment entertainment latest news raj and sonali affair raj thackeray sonali Bendre
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.