Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

संगीतकार Ram Bhau Kadam यांचा हा जुगाड भलताच हिट ठरला!
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. आपल्याकडील पाऊस लहरी असतो. कधी धो धो पडेल तर थेंबभर पाण्यासाठी तरसवेल. पण आपल्या सिनेमात दिग्दर्शकाच्या हुकमी अस्त्राने कधीही पाऊस पडत असल्याने पावसाची अनेक गाणी धो धो वाहत असतात. अशाच एका पावसाली गाण्याची हि जन्म कथा. आपले दादा कोंडके त्या वेळी त्यांच्या पहिल्या मराठी सिनेमा ’सोंगाड्या’ च्या चित्रीकरणात व्यस्त होते. आपल्या पहिल्या सिनेमात लताच्या आवाजात एखादं तरी गाणं असावं अशी त्यांची फार इच्छा होती. त्यांनी संगीतकार रामभाऊ कदमांशी तसं बोलूनच ठेवलं होतं. वसंत सबनीस यांच्याकडून त्यांनी एक मस्त लावणी लिहून घेतली.

लावणीचे बोल होते ’राया मला पावसात नेऊ नका..’ लताबाईंच्या रामभाऊं सोबत रिहर्सल सुरू झाल्या. दादा इकडे कोल्हापूरात शूटींग मध्ये व्यस्त होते. त्यांनी रामभाऊंना लवकरात लवकर ती लावणी रेकॉर्ड करून ती पाठवायला सांगितली.राम कदमांनी लगेच बॉम्बे लॅब बुक करून लता मंगेशकर यांना सकाळी नऊ वाजता रेकॉडींग करीता बोलावले. लताबाई वेळेवर आल्या पण ’ आज घसा बरोबर नाही आज रेकॉर्डींग नको’ असं म्हणून निघून गेल्या. रामभाऊंवर जणू बॉम्बच पडला. रेकॉडींगचे भाडे इतर खर्च मराठी चित्रनिर्मात्याच्या आवाक्याच्या बाहेरचा होता. तिकडे दादा या लावणीची वाट पाहत खोळंबून बसले होते.

रेकॉर्डींग रद्द करणे कुणालाच परवडणारे नव्हते. मग काय मार्ग काढायचा? त्यांच्या कडे एक ढोलकी पटू होता पंडीत विधाते नावाचा. रामभाऊंनी त्याला बोलावले व सांगितले ’ आत्ताच्या आत्ता माहिमला जा आणि पुष्पा पागधरे ला घेवून या.येताना टॅक्सीतच तिला गाण्याची चाल समजून द्या व जमलं तर रिहर्सल घ्या! पण हि लावणी आज रेकॉर्ड झालीचं पाहिजे’. ताबडतोब पंडीत विधाते माहीम ला गेले. ठरल्या प्रमाणे पुष्पा पागधरे आल्या व एक दोन टेक मध्येच लावणी रेकॉर्ड झाली सुध्दा! रामभाऊंचे मोठे टेन्शन दूर झाले. लगोलग दुपारीच ती लावणीची टेप कोल्हापूरला दादांकडे पाठवून देखील दिली व सुटकेचा निश्वास सोडला. पण खरी गंमत पुढेच आहे.
============
हे देखील वाचा : धर्मेंद्र आणि राखी यांचा ‘Jeevan Mrityu’
============
दोन दिवसांनी राम कदम कोल्हापूरला गेले. तिथल्या जवळच्या रेंदाळ या गावी शूट चालू होतं.रामभाऊ ला पाहताच दादांनी त्यांना मिठी मारली.आनंदाने ते म्हणाले’ अरे राम काय सुंदर लावणी बनवली आहेस. आणि लताने काय बेफाम गायलीय.युनिट मधील सर्व लोक पागल झालेत त्या लावणीने. आम्ही कालच चित्रीकरण सुध्दा करून टाकले.’ राम भाऊंनी त्यांचा उत्साह कमी झाल्यावर बाजूला घेवून रेकॉर्डींगची ’खरी स्टोरी’ दादांना सांगितली. आता आश्चर्यचकीत व्हायची पाळी दादांची होती.ज्या स्वराला सारे युनिट खुद्द दादा लताचा समजत होते तो आवाज तिचा नसून पुष्पा पागधरेचा आहे हे मान्य करायला त्यांना फार वेळ लागला!.आपल्याकडे एक म्हण आहे ’दाने दाने पे लिखा…’ त्याच चालीत आता म्हणावे लागेल ’गाने गाने पे लिखा है…’ पुष्पा पागधरे यांनी अशोक पत्की, ओ.पी. नय्यर, बाळ पळसुले, यशवंत देव, राम कदम, राम लक्ष्मण, विठ्ठल शिंदे, श्रीनिवास खळे, सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, स्नेहल भाटकर अशा अनेक संगीतकारांकडे चित्रपट व गैर चित्रपट गाणी गायली.
=============
हे देखील वाचा : पाकिस्तानी शायर कतील शिफई लता मंगेशकरांचे कायम ऋणी का राहिले?
=============
मराठी व हिंदीव्यतिरिक्त त्यांनी ओडिया, गुजराती, बंगाली, भोजपुरी, मारवाडी, आदी भाषांतूनही त्यांनी गाणी गायली. त्यांच्या गाजलेल्या गाण्यांमध्ये आला पाउस मातीच्या वासात गं,नको नको रे पावसा धिंगाणा अवेळी,नाच गं घुमा कशी मी नाचू,राया मला जरतारी शालू आणा पैठणचा हिरवा. हिंदीत त्यानी गायलेल्या ‘इतनी शक्ती हमे दे न दाता ‘(अंकुश) या गाण्याला अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळाली. म. रफी सोबत गाण्याचे भाग्य पुष्पा पागधरे यांना लाभले.(अगं पोरी संभाल दर्याला तुफान आय लई भारी’) संगीतकार ओ पी नय्यर यांच्याकडे तीन सिनेमात त्या गायल्या.