Dilip Prabhavalkar : गुढ आणि रहस्यांनी भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटाचा टीझर

Aamir Khan आणि पाकिस्तानबद्दलची ‘ती’ विधानं!
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याने आजवर एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले.. ‘लगान’,सरफरोश,राजा हिंदुस्तानी, पीके, गजनी… लिस्ट फार मोठीच आहे… सध्या आमिर त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाचं प्रमोशन करतोय आणि याचवेळी बऱ्याचशा मुलाखतींमध्ये गौप्यस्फोट करतोय… आमिर खान कधीच पाकिस्तानबद्दल काहीच बोलला नाही किंवा आपली बाजू मांडत नाही असं म्हटलं गेलं… मात्र, आता आमिरचं पाकिस्तानबद्दलची दोन विधानं ट्रेण्डींग आहेत… काय आहे किस्सा जाणून घेऊयात…(Aamir Khan And Pakistan)

शक्यतो चित्रपटांमध्ये पाकिस्तान देशाचा उल्लेख डायरेक्ट न करता पडोसी मुलूख किंवा शेजारचा देश असा करावा असं सेन्सॉर बोर्डाकडून सांगण्यात आलं होतं… पण बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानचं डायरेक्ट नाव चक्क आमिर खानच्या एका चित्रपटात घेतलं गेलं होतं.. याबद्दलच आमिरने स्वत: एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे… आमिर म्हणाला की, “जर लाल कुष्ण अडवाणीजी संसदेत पाकिस्तान आपल्याशी गैरवर्तन करतोय आणि दहशतवाद पसरवतोय हे बोलू शकतात मग आपण चित्रपटात का म्हणू शकत नाही?”. ‘सरफरोश’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून परवानगी मिळवून घेण्यासाठी आमिरने हेच कारण सांगत सेन्सॉर बोर्डाची परवानगी मिळवली होती…त्यामुळे बॉलिवूडमध्ये पाकिस्तान हे उघडपणे बोलणारा ‘सरफरोश’ (Sarfarosh Movis) हा पहिला चित्रपट होता असंही आमिर म्हणालाय…(Entertainment)

दुसरा किस्सा होता ‘दंगल’ (Dangal Movie) चित्रपटाचा… २०१६ मध्ये गीता आणि बबीता फोगाट यांचं जीवन मांडणारा ‘दंगल’ चित्रपट पाकिस्तानातही रिलीज झाला होता… पण रिलीज झाल्यावर तिथे तो बॅन केला गेला.. बॅन करण्याचं कारण विचारलं असता पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने दंगल चित्रपटाच्या शेवटी गीता फोगाटच्या विनिंग सीनमधून भारतीय राष्ट्रध्वज आणि भारतीय राष्ट्रगीत काढून टाकण्यास सांगितलं. जोपर्यंत तो सीन कट केला जात नाही तोपर्यंत चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित केला जाणार नाही असं सांगण्यात आलं…(Bollywood News)
================================
हे देखील वाचा: Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार एकत्र!
=================================
जेव्हा आमिर खानला ही बाब समजली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तो म्हणाला राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज काढणार नाही… आणि आमिरने स्पष्टपणे सांगितलं की आमचा चित्रपट पाकिस्तानात रिलीज होणार नाही…व्यवसायावर त्याचा परिणाम झाला तरी चालेल पण चित्रपटातून आत्ता किंवा यापुढेही भारताचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत कधीच काढणार नाही… पाकिस्तान वगळता जगभरात दंगल चित्रपटाने बाजीच मारली.. भारतात ५३८ कोटींच्या पुढे आणि जगभरात २००० कोटींच्या पुढे चित्रपटाने कमाई केली हे विशेष…. लवकरच आमिरचा ‘सितारे जमीन पर’, ‘महाभारत’, ‘लाहौर १९४७’ असे बरेच बिग बजेट चित्रपट येणार आहेत… याशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke Biopic) यांचा बायोपिकही तो राजकुमार हिरानी यांच्यासोबत करणार आहे… त्यामुळे पुन्हा एकदा मिस्टर परफेक्शनिस्ट अॅक्शन मोडमध्ये आलाय असं म्हणण्यास हरकत नाही…(Aamir Khan upcoming movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi