Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Gharoghari Matichya Chuli मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर करणार

Rajinikanth : नाहीतर ‘दशावतार’मध्ये दिसले असते रजनीकांत !

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Tu Hi Re Maza Mitwa मालिकेतील ईश्वरी ने वारीत सहभागी होत वारकऱ्यांसाठी बनवल्या भाकऱ्या…

 Tu Hi Re Maza Mitwa मालिकेतील ईश्वरी ने वारीत सहभागी होत वारकऱ्यांसाठी बनवल्या भाकऱ्या…
टीव्ही वाले मिक्स मसाला

Tu Hi Re Maza Mitwa मालिकेतील ईश्वरी ने वारीत सहभागी होत वारकऱ्यांसाठी बनवल्या भाकऱ्या…

by Team KalakrutiMedia 25/06/2025

महाराष्ट्रातील सर्वात मोठं भक्तिपर्व म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी. आषाढी वारी म्हणजे केवळ एक यात्रा नाही… ती एक भावयात्रा आहे, मनाची पंढरपूर वारी आहे. ती चालते श्रद्धेवर, टिकते भक्तीवर आणि फुलते प्रेमावर. पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करतात. माथ्यावर टोपली, हातात टाळ-मृदुंग, मुखात “राम कृष्ण हरि”, आणि हृदयात एकच देव – विठोबा! लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीची वाट धरतात. ही फक्त यात्रा नसून एक भक्तीमय साधना आहे. दरवर्षी या वारीत सहभागी होण्याची अनेकांची मनापासून इच्छा असते. काहीजण आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून वारी गाठतात, तर काहींना प्रत्यक्ष जाणं शक्य होत नाही. (Tu Hi Re Maza Mitwa Serial)

Tu Hi Re Maza Mitwa Serial

अशांसाठी स्टार प्रवाह वाहिनी घेऊन आली आहे एक खास भक्तिपूर्ण कार्यक्रम, ‘माऊली महाराष्ट्राची’. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आदेश बांदेकर आणि स्टार प्रवाहवरील लोकप्रिय कलाकार आपल्याला घरबसल्या पंढरीची वारी अनुभवायला घेऊन जाणार आहेत.

Tu Hi Re Maza Mitwa Serial

‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतील ईश्वरी अभिनेत्री शर्वरी जोग नुकतीच या वारीत सहभागी झाली. दिवेघाट ते सासवड या खडतर पायी टप्प्याचा प्रवास करत शर्वरीने वारकऱ्यांसाठी स्वतः भाकऱ्या तयार केल्या. हा अनुभव सांगताना ती म्हणाली की, “माझ्या आयुष्यात ही पहिलीच वारी होती, आणि तो अनुभव शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. सासवड ते दिवेघाट हा टप्पा अत्यंत आव्हानात्मक होता. पण आसपासचं भक्तिमय वातावरण, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आस्था आणि भक्तीरस पाहून अंगात नवी ऊर्जा आली. वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली, हरीपाठ कानावर पडत असताना मी तिथे भाकऱ्या बनवत होते… हे क्षण आयुष्यभर लक्षात राहतील.” (Tu Hi Re Maza Mitwa Serial)

===========================

हे देखील वाचा: Tejashree Pradhan आणि Subodh Bhave झी मराठीच्या मालिकेत एकत्र झळकणार !

===========================

“तू ही रे माझा मितवा’ ही एक युवा प्रेम कहाणी आहे. या मालिकेतून परस्पर नातेसंबंध उलगडतीलच पण या दोन प्रमुख पात्रांध्ये एक नवी केमिस्ट्री पाहायला मिळेल. प्रेम आहे पण व्यक्त होता येत नाही, राग आहे पण प्रेमामुळे रोखून ठेवलंय अशी ही दोन विरुद्ध माणसांची प्रेम कहाणी फुलत जाईल जी रसिकांना नक्की आवडेल.” आता या मालिकेतील ईश्वरीसह केलेला हा भक्तिपूर्ण अनुभव आणि भावस्पर्शी क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘माऊली महाराष्ट्राची’ हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता, स्टार प्रवाहवर प्रसारित होतो. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhijit Amkar ashadhi wari Celebrity Entertainment mauli maharashtrachi star pravah sharvari jog Surabhi Bhave Tu Hi Re Maza Mitwa Tu Hi Re Maza Mitwa serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.