Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

 Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?
बात पुरानी बडी सुहानी

Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

by धनंजय कुलकर्णी 27/06/2025

भारतीय सिनेमाच्या म्युझिकल गोल्डन इरातील प्रतिभावा न संगीतकार रोशन यांचं वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी १९६७ साली अकाली निधन झालं. त्यानंतर त्यांची पत्नी इरा रोशन यांनी त्यांच्या पश्चात दोन्ही मुलांना खूप चांगल्या पद्धतीने वाढवलं. दोघेही अगदी कमी वयात बॉलिवडच्या दुनियेत आले आणि लोकप्रिय ठरले . मोठा मुलगा राकेश रोशन अभिनयाच्या दुनियेत आला तर धाकटा राजेश रोशन आपल्या वडिलांच्या क्षेत्रात म्हणजेच संगीतकार म्हणून सिनेमाच्या दुनियेत आला. राजेश रोशनने वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी मेहमूदच्या ‘कुवारा बाप’ या १९७४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला संगीत दिलं.

पहिल्याच चित्रपटात त्यांच्या संगीतातील स्पार्क लक्षात आला होता. या चित्रपटात किशोर कुमारची तीन गाणी होती. यातील लोरी आजारी निंदिया आ…खूपच भावस्पर्शी होती. यात रफी यांच्या स्वरात देखील एक गाणे होते. पहिल्याच चित्रपटात आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवणाऱ्या राजेश रोशन यांचा दुसरा चित्रपट होता ‘जुली’. हा एका मल्याळम चित्रपटाचा हिंदी रीमेक होता. यात विक्रम आणि लक्ष्मी हे दोन कलाकार प्रमुख भूमिके होते. ओमप्रकाश, नादिरा जलाल आगा , रिटा भादुरी हे कलाकार देखील या चित्रपटात होते. काळाच्या मानाने सिनेमाचा विषय पुढचा होता. बोल्ड होता. कुमारी मातेचा प्रश्न यात मांडला होता.

आज हा चित्रपट आठवला जातो त्यातील संगीतामुळे. या चित्रपटात एकूण सहा गाणी होती. जी लता मंगेशकर, किशोर कुमार, प्रीती सागर यांनी गायलेली होती. भारतातील पहिले संपूर्ण इंग्रजी भाषेतील गीत ‘माय हार्ट इज बीटिंग…’ या चित्रपटात होते जे प्रीती सागर यांनी गायले होते आणि हरिशंकर चट्टोपाध्याय यांनी लिहिले होते. या चित्रपटात किशोर कुमार लताची दोन युगलगीत होती. ‘भूल गया सब कुछ याद नही अब कुछ हे’ लता मंगेशकर सोबत प्रचंड गाजलं. या गाण्याच्या रेकॉर्डिंग च्या वेळेला राजेश रोशन यांना चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक यांनी खूप झापलं होतं. कारण या गाण्यासाठी त्यांनी तब्बल ७५ हून अधिक म्युझिशियंस बोलावले होते.

चित्रपटाचे दिग्दर्शक सेतू माधवन म्हणाले,” हा एक लो बजेट सिनेमा आहे. यातील दोन्हीही कलाकार नवीन आहेत आणि या सिनेमासाठी एवढे ७५ म्युझियम्स आणायची काय गरज आहे? तू स्वतःला काय लक्ष्मीकांत प्यारेलाल किंवा शंकर जयकिशन समजतोस की काय? अवघ्या १९ वर्षाच्या राजेश रोशनला तो अपमान वाटला.पण तो स्वाभिमानाने म्हणाला,” माझी काम करण्याची पद्धत हीच आहे. तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला ठेवा. नाहीतर मी चाललो!” रेकॉर्डिंग स्टुडिओत काही लोकांनी मध्यस्थी केल्यामुळे हा वाद तिथेच थांबला.

यातील दुसऱ्या गाण्याचा किस्सा राजेश रोशन यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितला. ‘दिल क्या करे जब किसी को किसी से प्यार हो जाये…’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगला जेव्हा किशोर कुमार आले तेव्हा राजेश रोशन यांनी सांगितलं,” दादा हे रोमँटिक गाणं आहे. सॉफ्ट आवाजात तुम्हाला गायला पाहिजे!” किशोर कुमारला राजेश रोशन चे कौतुक वाटले. एवढ्या लहान वयात त्याला संगीताची केवढी मोठी समज आहे. त्याने रिहर्सलच्या वेळेला तोंडावर रुमाल ठेवून गाणे गाऊन दाखवले आणि सांगितले “हा अर्धा एक तोळा मी सॉफ्टनेस आणू शकतो.” राजेश रोशन म्हणाले ,” ठीक आहे.” आणि गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू झालं.

साऊंड प्रूफ काचेच्या आत किशोर कुमार गात होते. राजेश रोशन बाहेरून संपूर्ण ऑर्केस्ट्रा कंडक्ट करत होते. किशोर कुमारला आणखी सॉफ्ट आणखी सोफ्ट असते म्हणत होते. गाण्याचा मुखडा झाला. आणि अंतरा गाताना किशोर कुमार आणखी सॉफ्ट होत जाऊ लागला. ‘दौड रहा है साथ लहू के प्यार तेरा नस नस में ना कुछ तेरे बस मे जुली ना कुछ मेरे बस मे …’ किशोर गाण्यातील भाव कमालीचे आपल्या स्वरातून गात होते. अतिशय जबरदस्त रित्या किशोर गात होते. इकडे बाहेर राजेश रोशन इतके आनंदी झाले की जोरजोरात ओरडून आनंद व्यक्त करू लागले. रेकॉर्डिंग स्टुडिओ मधील अन्य लोक हे दृश्य पाहत होते. राजेश रोशन यांची आई इरा यांनी राजेश शांत व्हायला सांगितले आणि किशोर कुमार समोर असे हात वारे करून त्यांना डिस्टर्बन्स होऊ करू नको असं सांगितलं. पण राजेश रोशन प्रचंड आनंदात असल्याने त्यांच्या भावना नैसर्गिकच होत्या. पण आईच्या सांगण्याने ते शांत झाले पण मनामध्ये त्यांना हे गाणं प्रचंड लोकप्रिय होणार हे त्या क्षणी लक्षात आलं.

================================

हे देखील वाचा: Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

=================================

गाण्याचे रेकॉर्डिंग संपलं. राजेश रोशन धावत धावत जाऊन किशोरच्या पाया पडला. आणि किशोरने त्याला जवळ घेऊन सांगितले ,” राजू तुने क्या मिठी धून हूं बनाई है..” जुली सिनेमा त्यावर्षीच्या सुपरहिट सिनेमापैकी एक होता. कारण त्यावर्षी शोले, दिवार, जय संतोषी मा, आंधी, संन्यासी, खेल खेल में हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. या सर्वांच्या मध्ये ‘जुली’ सिनेमाने आपले वेगळेपण दाखवून दिले. राजेश रोशन यांच्या संगीताने देशभर लोकप्रियता हासिल केली. या सिनेमासाठी त्यांना पहिले फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाले!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Entertainment News Julie Movie Kishore Kumar lata mangeshkar latest bollywood movies rajesh roshan Rakesh Roshan retro news
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.