‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला अभिनेता?
मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी चित्रपटांचा एक काळ गाजवणारे ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते सचिन पिळगांवकर सध्या चांगलेच चर्चेत आहेत… आजवर अनेक अजरामर चित्रपट देणाऱ्या सचिन यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली होती… शिवाय, वयाच्या ७व्या वर्षीच दिग्दर्शक होणार असल्याचं मनाशी पक्क करणाऱ्या सचिन यांना बालकलाकार म्हणून त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता… काही मुलाखतींमध्ये त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत चक्क भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यांच्या कोटावरील गुलाब त्यांना दिल्याची दुर्मिळ आठवण त्यांनी सांगितली… काय म्हणाले सचिन पिळगांवकर जाणून घेऊयात…(Marathi Entertainment News)

सचिन पिळगांवकर यांनी वयाच्या ५व्या वर्षी म्हणजे १९६३ साली ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली होती.. या त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठीच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता… या पुरस्कार सोहळ्याची आठव सांगताना ते म्हणाले की, ” ‘हा माझा मार्ग एकला’ चित्रपटासाठीचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो… त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरु आणि देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन मला पुरस्कार देणार होते. मी पाच वर्षांचा होतो आणि काळ्या रंगाची शेरवानी, चुडीदार पायजमा असा अटायर घालून पुरस्कार घ्यायला गेलो होतो. शिवाय, माझ्या आईने मला नवीन घेतलेली चप्पलही घातली होती… अगदी आनंदी होत मी पुरस्कार घेतला आणि दोघांना अभिवादन केले, मंचावरून मी खाली जात असताना मला ‘सुनो!’ असा आवाज आला, तो पंडितजींचा होता. त्यांनी मला त्यांच्या मांडीवर बसवले. त्यांच्या कोटावर असलेले लाल गुलाब बाहेर काढून त्यांनी माझ्या शेरवानीवर लावले आणि म्हणाले ‘जा… तू खूप मोठा होशील“.
================================
=================================

दरम्यान, सचिन पिळगांवकर यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांतही कामं केली आहेत… ‘शोले’, ‘नदिया के पार’, ‘सत्ते पे सत्ता’,’बालिका वधू’,’अखियों के झरोको सें’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच ‘गंमत जंमत’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘नवरा माझा नवसाचा’ अशा अनेक चित्रपटांच दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi