“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

शाहरुख नाही तर सलमान खानच होता खरा Devdas; ब्रेकअपनंतरही चित्रित झालेला ‘तो’ सीन
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’ (Devdas Movie) हा चित्रपट प्रत्येक मेकर्सला भूलवणारा आहे… चित्रपटाची कथा जितकी जितकी ह्रदयाला भिडणारी होती तितकीच त्याची मांडणी भव्य होती… मुंबईच्या फिल्मसिटीत उभारलेले भले मोठे सेट आणि शाहरुख, ऐश्वर्या आणि माधुरीचं उत्तम सादरीकरण… खरंच ‘देवदास’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर चित्रपट नक्कीच आहे… चित्रपटात देवदासची भूमिका साकारली होती शाहरुख खानने (Shah Rukh Khan) आणि पारो बनली होती ऐश्वर्या (Aishwerya Rai)… पण तुम्हाला माहितेय हा या चित्रपटाच्या शुटींगवेळी ऐश्वर्याच्या आयुष्यातला खरा देवदास त्यावेळी सेटवर होता आणि ब्रेकअप होऊनही सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय यांचा एक सीन शुट झाला होता… जाणून घेऊयात हा इंटरेस्टिंग किस्सा…(Bollywood News)

तर, संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ (Hum Dil De Chuke Sanam) चित्रपटावेळी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं सुत जुळलं… २ वर्ष त्यांचं प्रेमप्रकरण सुरु होतं.. पण नंतर सलमानच्या केसेस, त्याचा रागीटपणा आणि त्याने केलेली मारहाण याला वैतागुन अखेर ऐश्वर्याने ते नातं संपवलं.. त्यानंतर ‘देवदास’ चित्रपटाचं शुटींग सुरु झालं.. भन्साळी आणि शाहरुख दोघेही सलमानचे मित्र असल्यामुळे ऐश्वर्याची मनधरणी करायला तो देवदासच्या सेटवर यायचा आणि त्याचे हे दोन मित्र त्याला अडवायचे नाहीत..(Devdas movie)

एकेदिवशी ‘मोरे पिया’ (More Piya song from Devdas) या देवदासमधील गाण्याचं शुटींग सुरु होतं.. ज्यात पारोच्या पायात काटा रुततो आणि देवदास तो अलगद काढतो.. हा सीन शुट करताना माहित नाही का पण शाहरुख रिटेक वर रिटेक देत होता.. शेवटी सलमान पुढे सरसावला आणि पायातून अलगद काटा कसा काढायचा याचं ट्रेनिंग शाहरुखला तो देऊ लागला… त्यावेळी संजय लीला भन्साळी यांनी सलमान-ऐश्वर्याला न कळता कॅमेरा रोल ठेवला आणि तो ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्याच सिनेमॅटॉग्राफरने कैद केला…सलमान आणि ऐश्वर्याच्या ब्रेकअपनंतर हा त्यांचा शेवटचा सीन ठरला… ज्येष्ठ सिनेसमीक्षक अनुपमा चोप्रा यांनी आपल्या ‘किंग ऑफ बॉलिवूड शाहरुख खान’ या पुस्तकात हा किस्सा लिहला आहे…(Sanjay Leela Bhansali)

================================
हे देखील वाचा: Shahrukh Khan : संजय लीला भन्साळी, ‘देवदास ‘आणि बरंच काही….
=================================
दरम्यान, ‘देवदास’ चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं.. . शाहरुख, माधुरी आणि ऐश्वर्या टॉपचे कलाकार होतेच पण देवदासमुळे त्यांचा दर्जा अधिक उंचावला… शिवाय जॅकी श्रॉफ यांना चक्क नृत्य करताना पाहून प्रेक्षक हैरानच झाले होते… मात्र, देवदास हा संजय लीला भन्साळी यांच्या जीवनातला दिग्दर्शक म्हणून आयकॉनिक चित्रपट नक्कीच ठरला…(Latest Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi