Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mahesh Manjrekar : “महेशला कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी मला..”

Ramayana : रणबीर कपूरच्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक!

Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित

आणीबाणी उठली आणि Dada Kondke यांनी आपल्या पिक्चरचे नाव ठेवले

Nana Patekar : “देव मानत नाही अशातला भाग नाही पण…”;

‘आपल्या डोक्यात हवा गेली म्हणून…’ शरद उपाध्येंनी Nilesh Sable यांना

Dashavatar : दिलीप प्रभावळकर नव्या अवतारात; ‘दशावतार’ या थरारक सिनेमातून रंगणार कोकणच्या

निलेश साबळे नाही तर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता करणार ‘Chala Hava

Aamir Khan : ‘त्या’ ज्येष्ठ मराठी कलाकराने १० हजारांची मदत

Dev Anand : ‘देस परदेस ‘; नवकेतनचा अखेरचा सुपर हिट

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘आपल्या डोक्यात हवा गेली म्हणून…’ शरद उपाध्येंनी Nilesh Sable यांना लिहिलेल पत्र चर्चेत… 

 ‘आपल्या डोक्यात हवा गेली म्हणून…’ शरद उपाध्येंनी Nilesh Sable यांना लिहिलेल पत्र चर्चेत… 
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘आपल्या डोक्यात हवा गेली म्हणून…’ शरद उपाध्येंनी Nilesh Sable यांना लिहिलेल पत्र चर्चेत… 

by Team KalakrutiMedia 02/07/2025

‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठीवरील गाजलेल्या विनोदी कार्यक्रमातून अभिनेता निलेश साबळे एक्झिट घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनेक माध्यमांमधून ही माहिती समोर आली असून, त्याच्या जागी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करणार असल्याचं जवळपास आता निश्चित झालं आहे. निलेशच्या शोमधून बाहेर पडण्याच्या बातमीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमधून आणि अनेक प्रसिद्ध व्यक्तींमधून प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला आहे. यातच ज्योतिष व राशीचक्र अभ्यासक शरद उपाध्याय यांची प्रतिक्रिया विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर एक दीर्घ पोस्ट लिहून आपला अनुभव शेअर केला आहे. (Sharad Upadhye On Nilesh Sable)

Sharad Upadhye On Nilesh Sable

आदरणीय नीलेशजी साबळे,
आपल्याला *हवा येऊ द्या* च्या दुस-या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकरना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी ११ वा. पोहोचलो. पण ३ वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. मला रुम सोडू नका असे सांगीतले होते. नीलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रुम मध्ये जाऊन गप्पा मारीत होतात पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट ४ वा.स्माईलही न देता स्टेजवर गेलात. इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला ६ वा. बोलावून घाईघाईत १५ मिनिटात सारे आटोपले. त्यावेळीही इतर कलावंत मधेमधे बोलत होते. माझा सारा दिवस फुकट गेला. एडिटींग मध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेंव्हा वडीलांच्या नात्याने काही सल्ले दिले. पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुस-याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की अहंकार अति वाईट. गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते. एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो. स्टेजवर तुम्ही सा-यांना आपलेसे केले नाही. आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या सा-याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. नीलेशजी स्वभाव मनमिळाऊ असावा , सा-यांना सांभाळून घ्यावे मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल. अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात.त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा.आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती.🙏 (Sharad Upadhye On Nilesh Sable)

=============================

हे देखील वाचा: निलेश साबळे नाही तर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता करणार ‘Chala Hava Yeu Dya 2’ चे सूत्रसंचालन !

=============================

शरद उपाध्ये यांच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एकाने ‘शरद जी योग्य पद्धतीने कान उपटले. टेलिव्हिजन माध्यमांवर काही लोक स्वतः प्रसिद्धीसाठी येतात. पण काही लोकांमुळे त्या माध्यमाला, त्या कार्यक्रमाला प्रसिद्ध मिळते .’ अशी प्रतिक्रिया दिली आहे तर, एकाने ‘सर खूप छान तुम्ही आम्हाला निलेश साबळे ची ही बाजू दाखवलीत.’ अस म्हणत त्यांच कौतुक केले आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: abhijit Khandakekar chala hava yeu dya chala hava yeu dya 2 Entertainment nilesh sable rashichakr sharad upadhye sharad upadhye
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.