Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Kishore Kumar यांनी गायलेले गाणे काढून तिथे शब्बीर कुमारचे गाणे का टाकले गेले?
अमिताभ बच्चन यांच्या कला कारकिर्दीतील महत्वाचा टप्पा म्हणजे मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘कुली’ हा चित्रपट. भलेही या चित्रपटाला समीक्षकांनी फारसे गोरवले नसले तरी चित्रपटाने व्यावसायिक यश चांगले मिळविले . या चित्रपटाने अमिताभच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. कारण याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी बेंगलोरला अमिताभ बच्चन एका फाईट सीन मध्ये जबर जखमी झाले आणि मृत्यूच्या दारात पोचले. त्या काळात संपूर्ण भारत म्हणजे एक कुटुंब झाला होता आणि कुटुंबातील एक व्यक्ती म्हणजे अमिताभ बच्चन मृत्यूशी संघर्ष करत होते. हा संघर्ष त्यांनी जिंकला. (Bollywood News)

‘कुली’ हा चित्रपट त्यामुळे बंपर हिट ठरला. अमिताभ चा जणू पुनर्जन्म च झाला. हा किस्सा सगळ्यांना माहिती आहे पण यातील आणखी एका गाण्याचा एक जो किस्सा आहे तो फारसा कुणाला माहिती नाही. ‘कुली’ या चित्रपटाला संगीत संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलं होतं. गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती. या चित्रपटातील अमिताभ वर सर्व चित्रित असणारी गाणी शब्बीर कुमार गाणार होते. शब्बीर कुमार त्या काळात रफीचा आवाज म्हणून ओळखले जायचे. मनमोहन देसाई यांनी शब्बीर कुमारला जेव्हा या चित्रपटातील सर्व गाणी तुला गायची आहेत आणि ही सर्व गाणी अमिताभ बच्चन यांच्या चित्रित होणार आहे असं कळल्यानंतर ते कमालीचे खूष झाले. त्या पद्धतीने गाण्याचे रेकॉर्डिंग देखील सुरु झाले. (Retro News)

मात्र, डिस्ट्रीब्युटर्स कडून मात्र याला नाराजीचा सूर आळवला गेला त्यांचे म्हणणे असे होते की किशोर कुमार असताना तुम्ही अमिताभ बच्चन यांच्यासाठी नवोदित गायकाकडून गाणे कसे गाऊन घेताय? त्यामुळे एक गाणे तरी किशोर कुमारच्या स्वरात असावे असा सगळ्यांचा आग्रह होवू लागला. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना देखील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले आणि त्यांनी शब्बेर कुमारला बोलावून सांगितले की आम्हाला यातील एक गाणे किशोर कुमार कडून जाऊन घ्यावे लागेल. त्यावर शब्बीर कुमार म्हणाले,” अरे वा… हा तर माझ्यासाठी मोठा गौरव आहे.
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
कारण किशोर कुमार हे माझ्यासाठी गुरु आहेत आणि त्यांच्यासोबत मी माझं नाव शेअर करेन ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही किशोर कुमार यांच्याकडून गाणे नक्की गाऊन घ्या. माझी काही हरकत नाही.” त्या पद्धतीने संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी ‘कुली’ या चित्रपटाचे टायटल सॉंग ‘सारी दुनिया का बोझ हम उठाते है.. लोग आते है लोग जाते है हम वही पे खडे रहे जाते है…’ हे गाणं गाऊन घेतलं. पण त्या काळात किशोर कुमार नुकताच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे गाण्याच्या रेकॉर्डिंला ते तितकेसे कम्फर्टेबल नव्हते. त्यामुळे गाणं तसंच रेकॉर्ड झालं .कारण त्याचवेळी असं ठरलं
की अमिताभच्या डेट्स मिळालेल्या होत्या. त्यामुळे शूटिंग करणे गरजेचे होते. शूटिंग करता हे गाणं आपण वापरु आणि त्यानंतर किशोर कुमार पुन्हा एकदा ते स्वतःच्या आवाजात डब करतील असे ठरले. त्या पद्धतीने त्या गाण्याचे चित्रीकरण झालं.(हे चित्रीकरण बंगलोर रेल्वे स्टेशन वर झाले होते) पण नंतर किशोर कुमार आपल्या परदेश दौरा , आजारपण आणि रेकॉर्डिंग मध्ये इतके बिझी झाले की त्यांना हे गाणे डब करण्यासाठी वेळच मिळेना. (KIshore Kumar Songs)

शेवटी मनमोहन देसाई आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल पुन्हा शब्बीर कुमार कडे गेले आणि त्यांना सांगितले की “ किशोर कुमारने ह गाणं गायलं होतं ते परफेक्ट झालेलं नाही. गाण्याचे शूटिंग झालेलं आहे. तुला फक्त ते गाणं डब करायचे आहे.” त्यावर शब्बीर कुमार म्हणाले माझ्या गुरूने गायलेल्या गाण्याला काढून माझ्या स्वरात गाणं घेणं मला संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे मी गाणं गाऊ शकणार नाही.” पण दिग्दर्शक आणि संगीतकार यांनी आग्रह धरल्यामुळे शेवटी असा तोडगा निघाला की शब्बीर कुमार यांच्या म्हणण्यानुसार “ त्यांनी एकदा किशोर कुमारची प्रत्यक्ष बोलावे आणि किशोर कुमारचा जर काही हरकत नसेल तरच मी गाणं गाईन.” (Latest Entertainment News)
================================
हे देखील वाचा: Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?
=================================
नंतर काही दिवसातच किशोर कुमारची संपर्क झाला शब्बीर कुमार यांनी आपली बाजू सांगितली. त्यावर किशोर कुमार म्हणाले,” शब्बीर तू या सिनेमातील उरलेली सगळी गाणी गायली आहेत त्यामुळे हे गाणं गायला तुला काय हरकत आहे? माझा काहीही प्रॉब्लेम नाही. तू माझ्यापेक्षा चांगलं गाणं जाऊ शकतोस. तू बिनधास्त गा. “ अशा प्रकारे किशोर कुमारने गायलेले गाणं बाद झालं आणि तिथे शब्बीर कुमार यांनी गायलेले गाणं चित्रपटात आलं. शब्बीर कुमारला मात्र किशोर कुमार सोबत आपलं नाव जोडण्याची संधी हुकल्याची कायम हुरहुर वाटत राहीली. किशोरकुमारच्या मोठ्या मनाचा प्रत्यय इथे येतो. (Amitabh Bachchan)
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi