Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Mahesh Manjrekar : “महेशला कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी मला..”
मराठीच नव्हे तर भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी आजवर आपल्याला वास्तव, अस्तित्व, काकस्पर्श असे अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत… मात्र, एकीकडे करिअरचा ग्राफ वर जात असताना त्यांच्या वैयक्तिक जीवनात एक मोठा खड्डा पडला होता… महेश मांजरेकर यांना कॅन्सरचं निदान झालं होतं… परंतु, न घाबरता महेश यांनी या आजारावर मात केली होती… कॅन्सरची ट्रिटमेंट घेताना महेश यांची काय अवस्था होती याची भावनिक आठवण मेधा मांजरेकर यांनी नुकतीच एका मुलाखतीमध्ये सांगितली आहे…(Bollywood)

मेधा मांजरेकर यांनी ‘देसी पॉड’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “महेश जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा डॉक्टरांनी मला विचारलं की, याला माहितीये का त्याला काय झालंय ते? महेश चार-पाच माणसांना घेऊन बसला होता. त्याच्या मिटिंग्स आणि गप्पा चालू होत्या. त्यादिवशी महेशला कॅन्सरचं निदान झालं होतं. तोच असा होता त्यामुळे आम्ही पण शांत होतो. माझ्या आईलाही कॅन्सर झाला होता. आईने पण कॅन्सरशी असाच लढा दिला होता. यावेळी मानसिकरित्या खूप स्ट्राँग राहायला हवं. कॅन्सरच्या ट्रीटमेंटला खूप त्रास होतात. किमो करताना खूप वेदना होतात. पण तुम्ही जर ते सकारात्मक पद्धतीने घेतलं तर सगळं छान होतं.”(Entertainment News)
================================
हे देखील वाचा: Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!
=================================
दरम्यान, महेश मांजरेकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नुकतंच त्यांनी देवमाणूस या चित्रपटात रेणुका शहाणे यांच्यासोबत काम केलं होतं… याशिवाय,महेश यांनी ‘ठग लाईफ’ या साऊथ चित्रपटात कमल हासनसोबतही काम केलं आहे. महेश मांजरेकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली असून दुसरीकडे आगामी बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचं ते सुत्रसंचलन करणार का? याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे…(Mahesh Manjrekar movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi