Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali चा भावूक अनुभव !

 “वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali चा भावूक अनुभव !
टीव्ही वाले मिक्स मसाला

“वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali चा भावूक अनुभव !

by Team KalakrutiMedia 03/07/2025

Star Pravah च्या ‘माऊली महाराष्ट्राची’ या भक्तिपर कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना घरबसल्या वारीचा अनुभव मिळतोय. पण फक्त प्रेक्षकच नाही, तर स्टार प्रवाहचे कलाकारसुद्धा प्रत्यक्ष वारीत सहभागी होत आहेत आणि त्या प्रत्येक क्षणाला आपल्या हृदयात साठवत आहेत. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेता अमित भानुशाली यंदा स्वतः वारीचा भाग बनला आणि तो अनुभव त्याच्या शब्दांत मांडताना तो स्वतःही भावूक झाला. (Actor Amit Bhanushali)

Actor Amit Bhanushali

“वारीचं नाव घेतलं की अंगावर रोमांच उभे राहतात,” असं सांगत तो म्हणतो , “पंढरपूरची वारी ही केवळ चालण्याची यात्रा नाही… ती आत्म्याच्या शोधाची, भक्तीच्या एकतानतेची आणि माणसाच्या खर्‍या ओळखीची यात्रा आहे. शरीर चालतं, पण पोहोचतं ते थेट हृदयाच्या गाभाऱ्यात.” वारीची सुरुवात झाली ती आळंदीहून, त्या पवित्र भूमीतून, जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली. त्या मातीशी त्याचं जुने नातं आहे. “लहानपणी आळंदीत दरवर्षी जायचो… ती माझ्यासाठी दुसरं घरच होतं,” असं सांगताना त्याच्या आवाजात नकळत ओलावा जाणवतो. “त्या गल्ल्यांतून अनवाणी फिरणं, समाधीसमोर शांत बसणं, पायऱ्यांवर पूजापाठ करणं , सगळं मनात कोरलं गेलं होतं. पण मोठं होताना, करिअरच्या धावपळीत आळंदी मागे पडली… आणि माऊलीही जणू दूर गेली.”

Actor Amit Bhanushali

पण यंदा, ‘माऊली महाराष्ट्राची’ निमित्ताने पुन्हा एकदा आळंदीचं वासरं झालं. “त्या मंदिरात पाय ठेवताच असं काहीसं जाणवलं, जे शब्दांपलीकडचं होतं. अंगावर काटा आला. आणि अचानक जाणवलं की माऊली म्हणाली असावी,  ‘किती वर्षं झाली बाळा, तू आलाच नाहीस… पण मी वाट बघत होते!’” डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, गर्दीत असूनही फक्त विठोबा दिसत होता. (Actor Amit Bhanushali)

==============================

हे देखील वाचा: निलेश साबळे नाही तर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता करणार ‘Chala Hava Yeu Dya 2’ चे सूत्रसंचालन !

==============================

वारीच्या वाटेवर हजारो वारकरी, टाळ-मृदंगाचा नाद, आभाळातल्या पावसाचा शिडकावा, चिखलात भिजलेले पाय, पण अमित म्हणतो, “त्या क्षणी कोणताही त्रास जाणवत नव्हता. वाटेत चालत होतो, पण थकत नव्हतो. जणू प्रत्येक पावसाचा थेंब विठोबाचं आशीर्वाद बनून अंगावर पडत होता.”हातात वीणा, मुखात ‘विठ्ठल विठ्ठल’चा अखंड गजर आणि मन – ते तर हरवून गेलं होतं त्या एकतानतेत. “वारीमध्ये एक गोष्ट ठळकपणे जाणवते,” तो सांगतो, “इथे कोणी अभिनेता, डॉक्टर, अधिकारी, किंवा उद्योगपती नाही… इथे सगळे एकसमान – सगळे फक्त ‘वारकरी’. इथे माणसाची खरी ओळख उरते – भक्त!” वारीचा हा अनुभव अमितसाठी केवळ भक्तीचा नव्हता , तो होता एका हरवलेल्या नात्याचा पुन्हा गवसलेला स्पर्श. “अशा निर्मळ, प्रेममय आणि शुद्ध अनुभवाचं भारावलेपण मी कधीच अनुभवलं नव्हतं,” तो शेवटी नम्रपणे म्हणतो.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actor amit bhanushali Celebrity ekadashi Entertainment jui gadkari mauli Maharashtrachi pandharichi wari Star Pravah tharal tar mag serial wari 2025
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.