Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

R. D. Burman : संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आर डी बर्मन यांच्यातील निरपेक्ष मैत्रीचा अध्याय
संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल साधारणत: पन्नासच्या दशकाच्या मध्यापासून हिंदी सिनेमाच्या दुनियेत आले. सुरुवातीला ते अनेक संगीतकारांकडे सहाय्यक म्हणून काम करत होते. लक्ष्मीकांत हे स्वतः चांगले मेंडोलीन वादक होते; तर प्यारेलाल हे व्हायोलीन वादक होते. मेंडोलीन आणि व्हायोलिन घेऊन हे त्या काळातील जवळपास सर्व संगीतकारांकडे म्युझिशियन म्हणून जात असत. संगीतकार सचिन देव बर्मन यांच्याकडे देखील ते जात. नंतर सचिन देव प्रमाण यांचा मुलगा राहुल देव बर्मन तथा पंचम हा देखील आपल्या वडिलांना असिस्ट करू लागला. त्यामुळे समवयीन असल्यामुळे लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि पंचम यांच्यात चांगली मैत्री झाली. (Bollywood News)

बऱ्याचदा रिहर्सल सचिन देव बर्मन यांच्या घरीच व्हायच्या. तिघेही तरुण हरहुन्नरी त्यामुळे किचनचा ताबा घेऊन ते मस्तपैकी सँडविच , ऑम्लेट बनवायचे आणि खायचे. ‘सोलवा साल‘ या चित्रपटात ‘है अपना दिल तो आवारा न जाने किस पे आयेगा..’ हेमंत कुमार यांनी गायलेले गाणं होतं. या गाण्यात लक्ष्मीकांत यांनी मेंडोलीन वाजवलं होतं. तर माऊथ ऑर्गन पंचम यांनी वाजवले होते. १९६१ साली राहुल देव बर्मन यांना ‘छोटे नवाब’ हा मेहमूद यांचा चित्रपट संगीतबद्ध करायला मिळाला. तो त्यांचा पहिलाच चित्रपट होता. पण सचिन देव बर्मन यांनी पंचमला सांगितले,” तू हा चित्रपट स्वीकारू नकोस. तू अजून लहान आहेस. संगीतकार बनण्यासाठी अजून तुला खूप मेहनत घ्यावी लागेल.” पण लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी पंचमला सांगितले की,” मित्रा , हि सुवर्णसंधी आहे तू सोडू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत!” मित्रांच्या पाठींब्यावर पंचमने त्याच्या पहिल्या चित्रपटाला संगीत दिले. या चित्रपटाच्या ओपनिंग क्रेडिटमध्ये म्युझिक असिस्टंट म्हणून लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांची नावे येतात. (Entertainment)

पुढे १९६३ साली लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना ‘पारसमणी’ हा चित्रपट मिळाला आणि ते देखील चित्रपट संगीतकार बनले. ‘पारसमणी’ नंतर त्यांचा दुसरा चित्रपट होता राजश्री प्रोडक्शन चा ‘दोस्ती’. हा चित्रपट मिळाल्यानंतर ते खूप खूष झाले. त्यांनी पहिल्यांदा ही बातमी पंचमला सांगितली आणि सांगितले “ या चित्रपटात दोन मित्रांची कहाणी आहे. एक गाणे गातो आणि दुसरा माऊथ ऑर्गन वाजवतो.” त्यावर पंचमने सगितले,” माझ्या लक्षात आले . मला या चित्रपटात माउथ ऑर्गन वाजवायचा आहे.” ‘दोस्ती’ या चित्रपटातील सर्व गाणी आणि पार्श्व संगीतात माउथ ऑर्गन पंचम यांनी वाजवला आहे. (Retro News)
=============
हे देखील वाचा : Mohammed Rafi यांच्या दिलदारपणाचे आणि लोकप्रियतेचे किस्से
=============
या चित्रपटातील एक गाणं आहे ‘जाने वालो जरा मुडके देखो मुझे…’ या गीताचे रेकॉर्डिंग होते यासाठी त्यांना पंचम हवा होता. पण नेमकं त्याच वेळी पंचम आपल्या वडिलांच्या एका चित्रपटाच्या रेकॉर्डिंगच्या मध्ये व्यस्त होता. पण प्यारेलाल यांनी त्यांना लँडलाईन वरून फोन करून सांगितले की ,” रफी साहेब दुपारी दोन वाजता येत आहेत. कसेही करून तू इकडे ये.” त्या काळात रफी प्रचंड बिझी होते आणि वक्तशीर होतो. त्यामुळे पंचम न लगेच आपल्या वडिलांना कडून रीतसर परवानगी घेऊन आपलं रेकॉर्डिंग थांबवलं आणि मित्रांच्या रेकॉर्डिंगला पोचले. तिथले रेकॉर्डिंग संपल्यानंतर पुन्हा तो वडिलांच्या रेकॉर्डिंग साठी निघून गेला. (Bollywood News Tadaka)

इतकी जबरा मैत्री होती. १९६७ साली लक्ष्मीकांत प्यारेलाल जितेंद्र च्या ‘फर्ज’ या चित्रपटाला संगीत देत होते. तेव्हा पंचमने एकदा फोन करून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सांगितले आज संध्याकाळी आपण कुठेतरी हॉटेलवर बसू या. मस्त ड्रिंक्स घेऊयात आणि गप्पा मारू. तिघेही संध्याकाळी हॉटेलमध्ये गेलो तिथे गेल्यानंतर साहजिकच त्यांच्या कामाबाबत चर्चा सुरू झाली. प्यारेलाल म्हणाले आम्हाला एक चित्रपट मिळाला आहे ‘फर्ज’ या चित्रपटाच्या पार्श्वसंगीतात आम्ही जेम्स बॉण्डच्या चित्रपटाचे संगीत वापरत आहोत. त्यावर पंचम म्हणाले ,”काय सांगता? मी सुद्धा सध्या माझ्या वडिलांनी संगीत दिलेल्या चित्रपटाला असिस्ट करत आहे. मी देखील तिथे जेम्स बॉण्डच्या चित्रपटाचेच पार्श्वसंगीत वापरत आहे!” पण मग पंचम म्हणाले,” असं रिपिटेशन नको. (Entertainment Update)

तुमच्या सिनेमाच्या किती रील्स वरच म्युझिक आतापर्यंत झालं आहे?” त्यावर एल पी म्हणाले “जवळपास १० रील पूर्ण झाल्या आहेत.” त्यावर पंचम म्हणाले,” मग मी असं करतो मी ते म्युझिक वापरत नाही. कारण माझी आता सुरुवात झालेली आहे. मी त्यासाठी नवीन पार्श्वसंगीत तयार करतो. तुम्ही जेम्स बॉंड मुव्हीचे ते संगीत वापरा. मी बदलतो.” इतकी समय सूचकता आणि इतका एकमेकांबद्दलचा आदर त्यांच्यामध्ये होता. सत्तरच्या दशकात तर लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आर डी बर्मन हे दोघे छोटीचे संगीतकार होते त्यांच्यात स्पर्धा नक्कीच होती पण मैत्री त्यापेक्षा जास्त त्यामुळे स्पर्धक असूनही ते कधीही एकमेकांवर टीका करत नव्हते.(Latest Entertainment News)

ऐंशीच्या च्या दशकाच्या उत्तरार्धात पंचमच्या चित्रपटाला यश काही मिळत नव्हते. पंचम वैतागला होता. नंतर त्याला ‘1942 अ लव स्टोरी’ हा विधू विनोद चोप्रा यांचा चित्रपट मिळाला. या चित्रपटातील संगीत पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा फोन केला लक्ष्मीकांत प्यारेलाल या मित्रांना. आणि त्यांना म्हणाला “ आज संध्याकाळी तुम्ही माझ्या घरी या आणि माझं नव्या सिनेमाचं संगीत ऐका. मी खूप वेगळं संगीत दिलं आहे आणि मला खात्री आहे की हे संगीत नक्की चालणार. या चित्रपटापासून मी पुन्हा एकदा नव्याने उभा राहील असं मला वाटतं.” त्यावर प्यारेलाल म्हणाले,” मित्रा तू असं म्हणतोयस म्हणजे सिनेमाचे नक्कीच संगीत चांगलं झालं असेल. आम्ही आज संध्याकाळी तुला भेटायला येतो. आम्हाला तुझे संगीत ऐकव आणि जर आम्हाला संगीत आवडले तर मी तुझ्या गालाची पप्पी देखील घेईल!” संध्याकाळी सर्वजण भेटले.
===============
हे देखील वाचा : Saraswati Rane : जब दिलको सताये गम तू छेड सखी सरगम
===============
चित्रपटांचे संगीत एलपी यांना खूपच आवडले ते पंचमला म्हणाले,” आता मागचं सर्व अपयश विसरून जा आणि नव्या दमानं कामाला लाग. या सिनेमा चे संगीत तुझं नाव अजरामर करून ठेवणार आहे.” एल पी यांनी उच्चारलेलं वाक्य अक्षरशः खरं ठरलं. कारण चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच ४ जानेवारी १९९४ या दिवशी पंचम यांचे अवघ्या ५५ व्या वर्षी निधन झाले. चित्रपट त्यानंतर १५ ऑगस्ट १९९४ प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. संगीत अजरामर झालं. एल पी मात्र आपल्या आवडत्या मित्राच्या अनपेक्षित जाण्याने कितीतरी दिवस दुःखाच्या छायेत वावरत होते.