जेव्हा शायर Kaifi Azmi यांनी आपल्या बेगमला रक्ताने पत्र लिहिले

अभिनयापूर्वी आपल्याच वडिलांना Direct करणारा Ranbir Kapoor!
बॉलिवूडमध्ये बच्चन, कपूर अशा कुटुंबांनी अढळ स्थान निर्माण केलं आहे… त्यातच कपूर घराण्यातील प्रत्येक पिढी अभिनय, दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे विशेष चर्चेत असते… सध्या याच कपूर फॅमेलीमधील रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) विशेष चलती आहे… लवकरच त्याचा ‘रामायण’ (Ramayana Movie) हा बॉलिवूडमधला पहिला भव्य पौराणिक चित्रपट येणार असून यात तो प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार आहे… चला तर जाणून घेऊयात रणबीर कपूरबद्दल काही रंजक गोष्टी…(Bollywood News)

राज कपूर (Raj Kapoor) यांचा नातू आणि ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचा मुलगा असल्यामुळे जन्मत:च अभिनय त्याच्या नसानसांत भिनलेला आहे… असं असूनही त्याचा पदार्पणातील पहिला चित्रपट ‘सावरिया’ (२००७) (Sawariya Movie) जोरदार आपटला होता… अयशस्वी होऊनही रणबीरने आपले प्रयत्न सुरुच ठेवले होते… रणबीरने ‘रॉकस्टार’ चित्रपटासाठी चक्क गिटार वाजवण्याचं ट्रेनिंग घेतलं होतं; इतकंच नाही तर तो उत्कृष्ट तबला वादक देखील आहे हे फार कमी जणांना माहित आहे… इतकंच नाही तर रणबीरच्या नावामागे देखील एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे… भारतीय चित्रपटसृष्टीचे ग्रेटेस्ट शो मॅन राज कपूर यांचं खरं आणि पूर्ण नाव रणबीर राज कपूर असं होतं… मात्र, इंडस्ट्रीसाठी त्यांनी राज कपूर हे नाव पुढे केलं… आणि रणबीरचं त्याच्या आजोबांच्या नावाने नामकरण केलं गेलं आहे…

मुळात अभिनय क्षेत्रात स्वत:ला झोकून देण्यापू्र्वी १९९६ मध्ये रणबीर कपूरने ‘प्रेम ग्रंथ’ (Prem Grantha Movie) या ऋषी कपूर यांच्या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं… रणबीरने न्युयॉर्कमधील स्ट्रैसबर्ग इन्स्टीट्युट अॅण्ड स्कुल ऑफ व्हिजुअल आर्ट्समधून अभिनयाचे धडे घेतले असून या अॅक्टिंग कोर्सदरम्यान त्याने शॉर्ट फिल्म्स केल्या होत्या… ‘सावरिया’ चित्रपटात डेब्यू करण्याआधी ‘कर्मा’ (Karma Short Film) या शॉर्ट फिल्ममधून त्याने अॅक्टिंग डेब्यू केला होता…(Bollywood)
================================
हे देखील वाचा: Ramayana Movie : ‘हे’ मराठी कलाकार झळकणार…९०० कोटींच्या ‘रामायणा’त!
=================================

रणबीर कपूरच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर सावरिया नंतर त्याने ‘बचना ए हसीनो’, ‘वेक अप सीड’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘ये जवानी है दिवानी,’ ‘बेशरम’, ‘राजनीती’, ‘चिल्लर पार्टी’, ‘तमाशा’, ‘ए दिल है मुश्किल’, ‘संजू’, ‘ब्रम्हास्त्र’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये कामं केली होती.. मात्र, अनुराग बासू यांचा ‘बर्फी’ (Barfi Movie) चित्रपटात त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्वरुपासाठी कोरली गेली आहे.. दरम्यान, ‘रामायण’ हा रणबीर कपूरचा पहिलाच पौराणिक चित्रपट (Mythological Movie) असून या चित्रपटासाठी त्याने १५० कोटी मानधन घेतल्याचं सांगितलं जात आहे… इतकंच नाही तर बॉलिवूडमधला ८३५ कोटींचा हा पहिला बिग बजेट चित्रपट असून या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार एकवटले आहेत… त्यामुळे आता नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा यांच्या रामायण चित्रपटाकडून आणि रणबीर कपूरच्या अभिनयशैलीकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi