
Bazaar Movie : ……करोगो याद तो हर बात याद आयेगी!
सागर सरहदी हे एक अतिशय संवेदनशील संवेदनशील आणि प्रतिभावंत दिग्दर्शक. त्यांनी संख्येने खूप चित्रपट कमी दिग्दर्शित केले पण जे बनवले ते कल्ट क्लासिक बनवले . आज इतक्या वर्षानंतर देखील त्यांच्या चित्रपटांची चर्चा अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये अभ्यास सत्रात होत असते. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘बाजार’ २१ मे १९८२ रोजी प्रदर्शित झाला. त्यापूर्वी सागर सरहदी यश चोप्रा यांच्या चित्रपटांच्या स्क्रिप्ट लिहीत असत. साम्यवादी विचारांनी भारलेले सागर सरहदी सिनेमाचा खूप बारकाईने अभ्यास करत.

‘बाजार’ हा त्यांचा पहिला चित्रपट. स्त्रियांच्या विशेषत: मुस्लिम स्त्रियांच्या एका मोठ्या समस्येवर भाष्य करणारा होता. भारतातील गरीब लाचार मुफलीस मुस्लिम मुलींना कशाप्रकारे आपल्या जाळ्यात ओढून अडकवलं जातं आणि त्यांच्याशी निकाह करून गल्फ मध्ये पाठवलं जातं तिकडे गल्फ मध्ये या लाचार मुलींचे कसे शोषण होते हि बातमी त्यांनी वर्तमान पत्रात वाचली होती. सागर सरहदी यांनी हैद्राबादला जावून या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला आणि स्क्रिप्ट लिहून काढली. सिनेमाला फायनान्सर मिळालाच नाही. शशी कपूर आणि यश चोप्रा यांनी मदत केली. या चित्रपटात मुस्लीम तरुणींच्या शोषणाचा विषय खूप प्रभावीपणे मांडला होता.
हैदराबाद इथे या चित्रपटाचे बव्हंशी शूटिंग झाले. या सिनेमातील आशय, अभिनय, दिग्दर्शन आणि संगीतामुळे हा सिनेमा आजही आठवला जातो. या चित्रपटाच्या मेकिंग बाबत मध्यंतरी या सिनेमाची नायिका सुप्रिया पाठक यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या. सागर सरहदी जेव्हा हा चित्रपट दिग्दर्शित करत होते त्यावेळेस त्यांनी कलाकारांना सांगितले होते की,” सिनेमाकरीता फंड अत्यल्प असल्याने तुम्हाला आत्ता या चित्रपटात काम करण्याची कोणतेही मानधन मी देऊ शकत नाही. हा चित्रपट जर प्रदर्शित झाला आणि यशस्वी झाला तर मी तुम्हाला नक्की मानधन देईल. त्याचप्रमाणे या चित्रपटाला लागणारे कॉस्च्युम्स, मेकअप सामान हे तुमचं तुम्हाला आणायला लागेल. सध्या मी या आर्थिक परिस्थितीतच नाही की तुम्हाला काही देऊ शकेल!”.
================================
हे देखील वाचा: अभिनेत्री स्मिता पाटील का खुश होती या दिग्दर्शकावर ?
=================================
या चित्रपटात फारुख शेख, नसिरुद्दीन शहा, सुप्रिया पाठक आणि स्मिता पाटील यांच्या प्रमुख भूमिका होत्या, हे सर्वजण हिंदी सिनेमातील लोकप्रिय कलावंत. पण सागर सरांनी यांच्या मेरिटची त्यांना खात्री होती म्हणून त्यांनी हा चित्रपट स्वीकारला. या मुलाखतीत सुप्रिया पाठक पुढे असं सांगतात की “ आम्ही स्वतः तिकीट काढून हैदराबादला पोहोचलो. तिथे एका सामान्य दर्जाच्या हॉटेलमध्ये आमची राहायची व्यवस्था केली होती. चित्रपटात लागणारे सर्व कॉस्ट्यूम्स आम्ही स्वतः घरून आणले होते. त्याचप्रमाणे मेकअप साहित्य आम्ही शेअर करत होतो. हे सगळं असं असलं तरी कामाविषयी प्रत्येकाच्या मनात श्रद्धा होती. अतिशय कौटुंबिक वातावरणात या चित्रपटाची शूटिंग झाले.

सागर सरहदी यांनी ज्या हॉटेलमध्ये या कलाकारांची राहायची सोय केली होती तिथले जेवण देखील अतिशय सामान्य होते पण कलाकारांनी कुठलीही तक्रार केली नाही आणि हा चित्रपट बनला.” सेटवर जाण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनची सोय नव्हती त्यामुळे सर्व कलाकार रिक्षाने सेटवर जात असेत. या चित्रपटाला संगीतकार खय्याम यांनी खूप सुंदर असं सांगितलं होतं. त्यांच्या टॉप टेन चित्रपटात या बाजारचा नक्की समावेश होतो. सागर सरहदी यांनी या चित्रपटासाठी गीतकार म्हणून चार वेगवेगळ्या
कालखंडातील गीतकारांची गाणी वापरली. यात काही खूप जुने गीतकार देखील होते. यातील गाणी लता मंगेशकर, भूपिंदर सिंग,तलत अजीज, पामेला चोप्रा जगजीत कौर यांनी गायली होती. ‘देखलो आज हमको करीब से’,’दिखाई दिये यूं’,’करोगे याद तो हर बात याद आयेगी’, ‘फिर छीडी रात बात फुलोंकी’… हि गाणी मिर्झा शौक , मीर टाकी मीर,बशर नवाज,मखदूम मोहिउद्दीन यांनी लिहिली होती.
================================
हे देखील वाचा: Prateik Smita Patil : आता बब्बर नाही ‘प्रतीक स्मिता पाटील’ म्हणायचं!
=================================
सर्व गाणी आज देखील मनाला भावतात. खरं तर तो काळ डिस्को संगीताचा होता पण या त्या डिस्को युगात खय्याम यांनी स्वरबध्द केलेली हि गाणी पहाटेच्या अलवार दवबिंदू सारखी वाटली. त्या वर्षीच्या फिल्मफेअर अवोर्ड सोहळ्यात ‘बाजार’ ला तब्बल सात नाम्नाकाने मिळाली. सुप्रिया पाठक यांना सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सर्व प्रतिकूल परिस्थिती असताना हा चित्रपट पूर्ण झाला आणि रिलीज झाला. चित्रपट प्रदर्शनानंतर पहिले काही दिवस थोडे ठंडा चालला पण नंतर हळूहळू माऊस पब्लिसिटीने या चित्रपटाने वेग घेतला आणि चित्रपट यशस्वी झाला. जेव्हा चित्रपटाच्या यशानंतर सागर सरांनी यांच्याकडे पैसा आले. त्यांनी प्रत्येक कलाकाराला बोलावून त्यांना त्यांची परिश्रमिक दिले. “सच्चा दिलाने केलेली कुठली कलाकृती ही अप्रतिमच होत असते हे त्रिकाला बाधित सत्य आहे.” असं सुप्रिया पाठक यांनी या मुलाखतीत सांगितले. आज देखील आपण बाजार चित्रपट पाहिला तर त्यातील विषयाचे गांभीर्य, दाहकता ,त्याची परिणामकारक मांडणी ,दिग्दर्शकाचे कसब, कलावंतांचा उत्कृष्ट अभिनय आणि खय्याम यांचे लज्जतदार संगीत आपण पाहून धन्य होतो.