हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Genelia Deshmukh : ‘सितारे जमीन पर’ नंतर तिच्याच सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये दिसणार!
जवळपास १० वर्ष चित्रपटसृष्टीपासून लांब राहिलेल्या जिनिलिया देशमुखने (Genelia Deshmukh) आमिर खान याच्या ‘सितारे जमीन पर’ (Sitare Zameen Par Movie) चित्रपटातून कमबॅक केलं… बरं, फिल्मी बॅकग्राऊंड असून आणि इतक्या वर्षांचा अनुभव गाठीशी असूनही जिनिलियाला चक्क या चित्रपटासाठी ऑडिशन द्यावं लागलं होतं… मात्र, तिने स्वत: मधील उत्कृष्ट अभिनेत्री सिद्ध केली असून आता या चित्रपटाच्या यशानंतर ती तिच्याच एका गाजलेल्या हिंदी चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये दिसणार आहे… कोणता आहे तो चित्रपट जाणून घेऊयात…(Bollywood News)

तर, २००४ मध्ये इंद्रा कुमार दिग्दर्शित’ मस्ती’ (Masti Movie) चित्रपट रिलीज झाला होता… ज्यात रितेश देशमुख, विवेक ऑबरॉय, आफताब शिवदासनी, अजय देवगण, लारा दत्ता, अमृता राव, जिनिलिया देशमुख आणि तारा शर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या… ३ मित्रांची भन्नाट गोष्ट सांगणाऱ्या ‘मस्ती’ या चित्रपटाने प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला होता… पहिल्या भागाच्या यशानंतर चित्रपटाचे २ आणखी भाग आले होते… आता लवकरच ‘मस्ती ४’ (Masti 4) येणार असून यात जिनिलिया झळकणार आहे…

‘मस्ती’ या कॉमेडी फ्रेंचायझीच्या चौथ्या भागाचं शूटिंग सुरू झालं असून या भागाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी करणार आहेत. आधी जिनिलियाची सेटवरील हजेरी लोकांना बुचकळ्यात पाडणारी होती.. मात्र, नंतर शूटिंगसाठी रिहर्सल करताना आणि स्वतः शूटिंग करताना ती दिसल्यामुळे पुन्हा एकदा रितेश देशमुखसोबत जिनिलिया मस्ती ४ मध्ये दिसणार आहे. तसेच, त्यांच्यासोबत पुन्हा विवेक ऑबरॉय आणि आफताब हेच दोन कलाकार असणार आहेत…
================================
=================================

२००३ मध्ये रितेश देशमुख आणि जिनिलिया या दोघांनी एकाच चित्रपटातून म्हणजे ‘तुझे मेरी कसम’ मधून अभिनयाची सुरुवात केली होती…या चित्रपटानंतर जिनिलियाने ‘फोर्स’, ‘तेरे नाल लव्ह हो गया’, ‘जाने तु या जाने ना’ असे बरेच हिंदी चित्रपट केले… आता मस्ती ४ व्यतिरिक्त ती ‘गनस्टार जी९’ या चित्रपटात अपारशक्ती खुराणा आणि इमरान हाश्मी सोबत दिसणार आहेत.(Genelia Deshmukh Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi