
Bollywood Movies : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांचं झालंय शुटींग…
अलीकडे बॉलिवूडच नाही तर बऱ्याच मराठी चित्रपटांचं देखील परदेशात शुटींग करण्याचं प्रमाण वाढलं आहे… मात्र, आपल्या भारतात किंबहुना महाराष्ट्रात इतके सुंदर, निसर्गरम्य आणि कथेला साजेशे लोकेशन्स आहेत ेह कदाचित ापल्याच मराठी इंडस्ट्रीला विसरायला झालं आहे.. मात्र, अनेक बॉलिवूड चित्रपटांचं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात शुटींग झालं आहे हे तुम्हाला माहित आहे का? आता निसर्ग म्हटलं की कोकण, महाबळेश्वर, सातारा ही ठिकाणं लगेच नजरेसमोर उभी राहतात.. या पैकीत एका तालुक्यात बऱ्याच हिंदी चित्रपटांचं शुटींग झालं आहे.. जाणून घेऊयात या चित्रपटांबद्दल…(Bollywood News Update)

तर, सगळ्यात पहिला चित्रपट म्हणजे २००४ मध्ये आलेला आशुतोष गोवारीकर यांचा ‘स्वदेस’ (Swades Movie) चित्रपट… एनआरआय लोकांचा आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलवून टाकणारी अप्रतिम भूमिका शाहरुख खान याने केली होती… आणि या ‘स्वदेस’चं शुटींग आपल्या महाराष्ट्रातल्या वाई येथे झालं आहे… काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘स्वदेस’मधील ‘ये तारा वो तारा’ या गाण्याचं चित्रीकरण करण्यासाठी संपूर्ण टीम जवळपास ७ महिने वाईमध्येच थांबली होती. आणि या चित्रपटातील प्रसिद्ध ‘पंचायत सीन’ देखील वाईमध्येच चित्रित केला गेला होता. शिवाय, ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘गंगाजल’, ‘ओमकारा’, ‘दबंग’, ‘दबंग २’, ‘इश्किया’, ‘सिंघम’(Singham), ‘बोल बच्चन’, ‘जिला गाजियाबाद’ या चित्रपटांचंही शुटींग इथे झालं आहे…(Entertainment)
================================
हे देखील वाचा: Marathi in Hollywood : हॉलीवूडमधला मराठी तडका!
=================================
या व्यतिरिक्त छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास मांडणाऱ्या छावा चित्रपटाचं शुटींग देखील वाईत झालं आहे… बॉलिवूडसाठी वाई हे ठिकाण फार प्रसिद्ध असून येथील निसर्ग त्यांना अधिक आकर्षित करतो… लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशलच्या छावा व्यतिरिक्त वाई मध्ये सलमान खानचं प्रसिद्ध गाणं ‘हुड हुड दबंग’ एका प्रसिद्ध मंदिराजवळ शूट करण्यात आलं होतं.

तसेच, स्टंटबाज दिग्दर्शक रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘चेन्नई एक्सप्रेस’ मधील काही दृश्यांचं चित्रीकरणसुद्धा वाईमध्येच झालं आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्यातील भांडणाचा सीन इथेच चित्रित केला गेला होता.. तसेच, शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यावर ‘राजकूमार’ या चित्रपटातील चित्रित झालेलं मत मारी हे गाणं देखील वाईच्या भाजी मंडळीत शुट झालं आहे… परदेशात शुटींगसाठी सवलत मिळूनही हिंदीतील काही मेकर्स अजूनबी शुटींगसाठी महाराष्ट्रातील निसर्गरम्य ठिकाणांची निवड करत आहेत हे आनंददायी आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi