Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे

Amitabh Bachchan : १८ वर्षांपूर्वी बॉलिवूडचा Multi Star Cast चित्रपट ठरला होता फ्लॉप; पण गाणी होती हिट
प्रत्येकवेळी चित्रपट हिट होतोच असं नाही… कधीतरी त्या चित्रपटाची केवळ कथा बेस्ट असते पण कलाकारांचा अभिनय गंडतो; तर कधी अभिनय उत्कृष्ट असतो मात्र कथेची मांडणी नीट होत नाही… असे बरेच फ्लॉ असतात… १८ वर्षांपूर्वी देखील बॉलिवूडमध्ये एक मल्टिस्टार कास्ट चित्रपट आला होता… जो खरं तर फ्लॉप झाला पण आजही त्या चित्रपटातील गाणी सुपरहिट आहेत.. जाणून घेऊयात त्या चित्रपटाबद्दल…(Bollywood News)

तर, हा चित्रपट होता २००७ मध्ये रिलीज झालेला ‘झुम बराबर झुम’ (Zhoom Barabar Zhoom Movie). ज्याचं दिग्दर्शन केलं होतं शाद अली यांनी आणि यशराज बॅनरखाली चित्रपटाती निर्मिती करण्यात आली होती… चित्रपटात प्रीती झिंटा , लारा दत्ता, अभिषेक बच्चन, बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर अमिताभ बच्चन यांनी कॅमिओ केला होता… चित्रपटाची कथा मांडणी, अभिनय एकूणच गंडलं असं समीक्षकांना वाटलं आणि त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवरही झाला… मात्र, चित्रपटातील प्रत्येक गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर तोंडपाठ आहेत…
================================
=================================
झुम बराबर झुम, टिकीट टू हॉलिवूड,किस ऑफ लव ही गाणी आजही रिल्सवर ऐकायला मिळतात… बरं या चित्रपटाची आणखी एक बाब म्हणजे प्रीती झिंटा आणि लारा दत्ता यांच्या आधी या चित्रपटासाठी विद्या बालन आणि प्रियांका चोप्रा यांना ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यांनी नकार दिल्यामुळे लारा आणि प्रीत यात दिसला… तसेच, अभिषेक बच्चनच्या ऐवजी जॉन अब्राहम ऑफर दिली होती; पण त्यानेही नकार दिला होता.. आता १८ वर्षांनी पुन्हा चित्रपटाची चर्चा रंगली असून कलाकारांच्या अभिनयापेक्षा गाणीच जास्त प्रेक्षकांच्या लक्षात आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi