
Salman Khan याने २२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘तेरे नाम’मधील ‘ही’ गोष्ट ठेवलीये जपून!
सलमान खान याने आजवर १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत… सलमान म्हणजे प्रेम हे समीकरण पक्क झालं होतं आणि आजही ते आहेच.. पण त्याची प्रेमची इमेज ब्रेक करणारा चित्रपट म्हणजे २००३ मध्ये आलेला ‘तेरे नाम’…या चित्रपटात प्रेमभंग झालेला आशिक कसा असेल याचं उत्तम सादरीकरण सलमानने केलं होतं… पण तुम्हाला माहित आहे का? २२ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटातील एक गोष्ट सलमानने आजही स्वत:कडे जपून ठेवली आहे…

तर, सलमान खान याचा ‘तेरे नाम’ चित्रपट तुफान गाजला… त्याने साकारलेला राधे मुलांमध्ये भलताच फेमस होता… त्याची फॅशन, हेअर स्टाईल हे सगळंच तुफान गाजलं होतं.. सांगायचा मुद्दा हा की, २२ वर्षांनी सलमान खान याने तेरे नाम चित्रपटात जी बाईक वापरली होती ती आजही त्याने त्याच्याजवळच ठेवली आहे.

================================
=================================
दरम्यान, ‘तेरे नाम’ चित्रपटाचं दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केलं होतं… आणि या चित्रपटात सलमान खान यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.. त्याच्यासोबत भूमिका चावला त्याची हिरोईन होती.. याशिवाय, रवी किशन, सविता प्रभूणे, सचिन खेडेकर,दर्शन कुमार, इंदू वर्मा, सौरभ दुबे असे बरेच कलाकार झळकले होते… विशेष म्हणजे १० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने २४.५४ कोटींच कमाई केली होती…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi