
Sonali Bendre : “मला वाटायचं मायकल जॅक्सनचं नाक…”
आजही मायकल जॅक्सनचा (Michael Jackson) कुणी चाहता नसेल असा एकही माणूस सापडणं केवळ अशक्यच… मुंबईतील प्रत्येक माणसाला ज्यावेळी मायकल जॅक्सन मुंबईत कॉन्सर्टसाठी आला होता तो दिवस लक्षात असेलच… त्याच्या World Tour चा भाग असणाऱ्या मुंबई शहरात १९९६ मध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) आणि सोनाली बेंद्रे त्याच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते… त्याची भारतातली तरी पहिली आणि एकमेव भेट ठरली होती.. यावेळी सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) हिला मायकल जॅक्सनबद्दल काय वाटलं होतं याचा खुलासा तिने नुकत्याचत एका मुलाखतीत केला आहे…

तर, सोनाली बेंद्रे हिला विमानतळावर मायकल जॅक्सनचे स्वागत करण्यासाठी खास आमंत्रण दिलं गेलं होतं… त्यावेळी पहिल्यांदा जॅक्सनला पाहिल्यानंतर काय वाटलं होतं हे लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगताना ती म्हणाली की, “मला त्यावेळी सारखं भिती वाटतं होती की, त्याचं नाक खाली पडू नये. त्याचं नाक फार विचित्र दिसत होतं. मला वाटतं होतं की, त्याच्या नाकाला हात लावावा. पण ते काही घडलं नाही… परंतु,त्याची प्रतिभा कमाल होती. तो डान्सर, गायक आणि कलाकार म्हणून तर ग्रेट होताच. याबाबत कोणतीही शंका नाही.
================================
=================================
मायकल जॅक्सन याने जगभरात असंख्य कॉन्सर्ट्स केले. पण आजही १९९६ मध्ये मुंबईत त्याच्या झालेल्या म्युझिक कॉन्सर्टची विशेष आठवण काढली जाते. पॉपच्या या बादशहाने १ नोव्हेंबर १९९६ रोजी भारतात त्याचा एकमेव लाईव्ह शो सादर केला. स्मार्ट फोन, सोशल मिडियाच्या आधीचा जरी तो काळ असला तरी मायकल जॅक्सनच्या त्या कॉन्सर्टची लोकप्रियता इतकी होती की त्यावेळी ३५००० पेक्षा अधिक लोकांनी गर्दी केली होती.(Entertainment news)