लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

आत्महत्या करायला निघालेली एक व्यक्ती;Anand Bakshi यांचे ‘हे’ गाणे ऐकून परत आली!
असं कधी कधी काळात त्या घडायचं की एखाद्या गाण्यासाठी एक विशिष्ट गायक संगीतकाराच्या मनात असायचा. त्याच्याकडून कधी कधी गाण्याची रिहर्सल देखील करून घेतली जायची पण काही कारणाने ते गाणे तो गायक गाऊ शकायचा नाही आणि त्याच्या ऐवजी दुसऱ्याच गायकाची वर्णी लागायची. बऱ्याच वेळा त्या गायकाची काही अडचण किंवा कधीकधी निर्माता किंवा चित्रपटाचा अभिनेता अभिनेत्री कडून एका विशिष्ट आवाजाची मागणी हे देखील त्या मागचं कारण असायचं. पण त्या काळात एकूणच निरोगी स्पर्धात्मक वातावरण असल्यामुळे कुणाला त्याचं काही वाटायचं नाही. (Bollywood)

बऱ्याचदा तर गायकच “हे गाणं माझ्या प्रकृतीचे नाही हे गाणं तुम्ही त्याच्याकडून गाऊन घ्या असं सांगायचे!” असाच काहीसा प्रकार सत्तरच्या दशकामध्ये एकदा झाला होता. हे गाणं मोहम्मद रफी यांनी गावं असं संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना वाटत होतं. पण गाण्यातील भावना आणि गाण्याची चाल पाहून ,”या गाण्याला माझ्यापेक्षा किशोर कुमार जास्त न्याय देऊ शकेल त्यामुळे हे गाणं त्यांच्याकडून गाऊन घ्या!” असं स्वतः मोहम्मद रफी यांनी संगीत कार जोडीला सांगितलं. नंतर किशोर कुमार यांनी गायलेलं गाणं हे प्रचंड लोकप्रिय झालं. या गाण्याच्या बाबतचा आणखी एक किस्सा म्हणजे हे गाणं ऐकून एक व्यक्ती जी आत्महत्या करणार होती तिने आत्महत्या करण्याचा निर्णय मागे घेतला!
================================
हे देखील वाचा: V. Shantaram : सेहरा चित्रपटातील रफीच्या गाण्याचा बेहतरीन किस्सा!
=================================
एका आत्महत्याग्रस्त माणसाला पुन्हा जीवनाकडे वळवण्याचं सामर्थ्य या गाण्यात होतं. कोणतं होतं ते गाणं आणि कोणता होता तो चित्रपट? १९७४ साली दिग्दर्शक दुलाल गुहा यांनी ‘दोस्त’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या सिनेमात धर्मेंद्र, हेमामालिनी, शत्रुघन सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात गेस्ट एपीरेंस केला होता. या चित्रपटाची गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते. या चित्रपटातील तीन गाणी होती. पैकी एक लता मंगेशकर यांनी गायलं होतं. ‘दुनिया जब जलती है हाय रे बडा मजा आता है ..’

एक गाणं मोहम्मद रफी आणि शत्रुघन सिन्हा यांच्या स्वरात होतं ‘ आ बता दे तू मुझे कैसे जिया जाता है’ यातील तिसरे जे सिनेमातील थीम सॉंग होतं ते म. रफी यांनी गावं अशी एल पी यांची इच्छा होती. गाणे होते ‘ गाडी बुला रही है सिटी बजा रही है…’ या गाण्याच्या रीहर्सल साठी जेव्हा रफी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी आनंद बक्षी यांनी लिहिलेलं गाणं जेव्हा वाचलं तसेच एल पी यांची ट्यून ऐकली. त्यावेळेला ते म्हणाले की “माझ्यापेक्षा हे गाणं किशोर कुमार यांच्या स्वरात जास्त चांगला होईल. तुम्ही त्यांच्याकडून हे गाणं गाऊन घ्या. गाण्यातील भावनांना तो माझ्यापेक्षा चांगलं व्यक्त करेल.” रफी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी गुरु सारखे होते. जेव्हा रफी सांगतात तेव्हा त्यामध्ये नक्कीच तथ्य आहे असे समजून त्यांच्या आभार मानले आणि किशोर कुमार यांना कॉन्टॅक्ट केले.
किशोर कुमार यांनी हे गाणं अतिशय सुंदर गायले. चित्रपटात हे गाणं दोन-तीनदा येतं चित्रपटाचे कथानक पुढं नेण्यासाठी हे गाणं खूप महत्त्वाचं होतं. या गाण्याने त्या काळात उदंड लोकप्रियता मिळवली होती. या गाण्याला त्या वर्षीच्या फिल्मफेअर मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून किशोर कुमार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून आनंद बक्षी यांना नामांकन मिळाले होते. या गाण्याची महती इथेच थांबत नाही. गीतकार आनंद बक्षी यांनी एका मुलाखतीत असे सांगितले की ,”एका व्यक्तीचे मला पत्र आले होते. ती व्यक्ती आयुष्यात खूप नैराश्यग्रस्त झाली होती आणि आयुष्य संपवण्यासाठी आत्महत्या करायला निघाले होते. पण त्याचवेळी त्यांच्या कानावर ‘गाडी बुला रही है सिटी बजा रही है’ हे गाणं पडलं आणि त्यातील एक अंतरा ते क्षणभर थांबले. त्या शब्दांनी त्यांनी आत्महत्येचा निर्णय मागे घेतला ‘गाडी का नाम ना कर बदनाम हिम्मत ना हार कर इंतजार आ लौट जाये घर को ये रात जा रही है वो सुबह आ रही है ….’ .
================================
हे देखील वाचा: सिनेमाचा हिरो Rajesh Khanna पण किशोर कुमार यांचे गाणे दुसऱ्याच कुणावर चित्रित झाले!
=================================
आयुष्य माणसाला एकदाच मिळतं आणि ते असं आत्मनाश करून संपवायचं नसतं. हा संदेश यांना त्यातून मिळाला आणि परत पावली ते घरी गेले या गाण्याने त्यांना आत्महत्या करण्यापासून थोपवलं आज ती व्यक्ती आनंदाने जीवन जगत आहे!” त्या व्यक्तीने आनंद पक्षी यांना आभाराचे पत्र पाठवले. आनंद बक्षी या मुलाखतीत पुढे म्हणतात “एका व्यक्तीला पुन्हा आयुष्य जगायला लावणार गाणं हा माझ्यासाठी फार मोठा पुरस्कार आहे!” आनंद बक्षी यांच्या पुस्तकात ही आठवण विस्ताराने सांगितली आहे!