Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

NAFA : अमेरिकन संसदेने घेतली ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२५’ची दखल
मराठी चित्रपटांचा डंका आंतररष्ट्रीय स्तरावर सातत्याने गाजत आहेच… अशातच आता नॉर्थ अमेरिकेत मराठी चित्रपटांना लोकप्रियता मिळावी आणि आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीची महती संपूर्ण अमेरिकेतील लोकांना परिचित व्हावी या हेतूने उद्योजक आणि ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे निर्माते अभिजीत घोलप यांनी ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन’ची (नाफा) (NAFA) स्थापना २०२४ मध्ये केली आहे. मराठी चित्रपट, कला संस्कृतीच्या माध्यमातून दरवर्षी अमेरिकेत मराठी चित्रपटांचा भव्य सोहळा अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन होजे येथे आयोजित केला येतो. अभिमानाची बाब म्हणजे या महोत्सवाची दखल अमेरिकेच्या संसदेने नुकतीच घेतली असून अमेरिकेतील मराठी खासदार श्री. ठाणेदार यांनी अमेरिकन संसदेतील सभागृहात या महोत्सवाची माहिती दिली. कार्यक्रमाची माहिती दिल्यानंतर त्यांनी नाफासाठी या मराठी खासदाराकडून खूप खूप शुभेच्छा असे मराठीत म्हटले आहे.

दरम्यान, ठाणेदार संसदेत नाफा महोत्सवाबद्दल भाषण करताना म्हणाले, “मॅडम स्पीकर, ‘नाफा’ या संस्थेचा उगम मराठी चित्रपटांसाठी झाला आहे. नॉर्थ अमेरिकेत या संस्थेच्या कार्यातून मराठी चित्रपट, कला आणि महाराष्ट्रातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या मराठी संस्कृती, परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम होत आहे. ‘नाफा’च्या माध्यमातून अभिजित घोलप ‘महाराष्ट्र’ आणि ‘नॉर्थ अमेरिके’साठी सांस्कृतिक दुवा ठरत आहेत, ‘नाफा’साठी या मराठी खासदाराकडून खूप खूप शुभेच्छा.”
हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक वैभव मिळवून देण्यासाठी ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ अर्थात ‘नाफा’द्वारे मराठी चित्रपटांना अमेरिका-कॅनडामध्ये भव्य कॅनव्हास उपलब्ध झाला आहे. २५ जुलै २०२५ रोजी सुरु होणाऱ्या या कार्यक्रमाला मराठी कलाकारांसोबत हॉलिवूडमधील दिग्गजांचीही उपस्थिती असणार आहे. तसेच, या महोत्सवात ‘स्नोफ्लॉवर’, ‘मुक्ताई’, ‘छबीला’ प्रेमाची गोष्ट २ आणि ‘रावसाहेब’ या चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमियर होणार आहेत.

यानंतर २६ जुलै रोजी अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी खास संवाद सोहळा आयोजित करण्यात आला असून यावेळी उपस्थित रसिकांशी सचिन खेडेकर गप्पा मारतील. यानंतर ‘नाफा वर्ल्ड प्रीमियर्स’ मध्ये संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, स्नोफ्लॉवर या चित्रपटांचे आणि ‘नाफा’ची निर्मिती असलेल्या ‘सबमिशन’, ‘योगायोग’ आणि ‘द गर्ल विथ रेड हॅट’ या लघुपटांचेही प्रीमियर शो होणार आहेत.
त्यासोबत २७ जुलै रोजी ‘नाफा’ विनिंग ‘शॉर्टफिल्म्सचे स्क्रिनिंग होणार असून त्यामध्ये ‘डंपयार्ड’, ‘राडा’, ‘बिर्याणी’ या तीन शॉर्टफिल्म्स पहायला मिळणार आहेत. त्यापाठोपाठ ‘छबिला’, ‘रावसाहेब’ आणि ‘प्रेमाची गोष्ट २’ या मराठी चित्रपटांचे ‘नाफा वर्ल्ड प्रीमियर’ होतील. तसेच, चित्रपटांच्या प्रीमीयर्स सोबतजेष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर, मधुर भांडारकर, महेश कोठारे, डॉ. मोहन आगाशे, सचिन खेडेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे व वैदेही परशुरामी यांच्यासोबत पॅनल डिस्कशन होणार आहे.
================================
हे देखील वाचा: War 2 : ‘मैं इन्सान नही, जंग का हथियार हू’; ‘वॉर २’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
=================================
यासोबतच दिग्दर्शक मधुर भांडारकरांचा वास्तववादी सिनेमासंदर्भातला मास्टर क्लास, ‘क्रॉसिंग बॉर्डर्स: सिनेमा आणि स्थलांतर यांच्यातील जीवन’ यावर अभिनेत्री अश्विनी भावे, ‘मराठी चित्रपटातील विनोदी आणि अद्भुत दुनिया’ हा विषय घेऊन महेश कोठारे असे दिग्गज सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर, २७ जुलैला ‘सो कुल लाईफ’ : अर्थात अ जर्नी विथ सोनाली कुलकर्णी’ त्यांच्यानंतर ‘अभिनयातील स्थित्यंतरे’ कशी असतात यावर स्वप्नील जोशी, ‘व्हाइस, प्रेझेन्स आणि ट्रुथ’ बद्दल सचिन खेडेकर आणि ‘कॅमेऱ्यामधून आयुष्याकडे बघताना’ नेमका काय दृष्टीकोन हवा याबद्दल डॉ. मोहन आगाशे मास्टर क्लास घेणार आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi