Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून कां डच्चू दिला होता?

    yash chopra and javed akhtar

    ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jarann Movie OTT Release: दमदार अभिनयात गुंफलेली भय आणि भावनांची उत्कंठावर्धक गोष्ट ‘जारण’

Mahavatar Narsimha : भगवान विष्णूंची बॉक्स ऑफिसवर किमया; बिग बजेट

‘सौतन’ मधील Kishore Kumar यांच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा मजेदार किस्सा!

Suraj Chavan : “माझ्याच विचारांमध्ये खोट असेल”; ‘झापूक झुपूक’बदद्ल केदार

इराण, इटली, पाकिस्तान; परदेशातही वाजला होता Sholay चा डंका!

Jeetendra : ‘आखरी दाव’, खेळ जो रंगलाच नाही…

उपहार : Jaya Bachchan यांच्या मुग्ध अभिनयाने नटलेला अप्रतिम चित्रपट!

Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

Bin Lagnachi Gosht Teaser: नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या सिनेमात पहायला मिळणार  प्रिया- उमेशची

‘Ghadhvach Lagn 2: सावळा कुंभार आणि गंगी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Eros…. आता ‘स्वदेशी’ शॉपिंग सेंटर

 Eros…. आता ‘स्वदेशी’ शॉपिंग सेंटर
कलाकृती विशेष

Eros…. आता ‘स्वदेशी’ शॉपिंग सेंटर

by दिलीप ठाकूर 26/07/2025

चर्चगेट रेल्वेस्थानकाबाहेर पडल्यावर समोरच असलेल्या इरॉस चित्रपटगृहावरील चित्रपटाचे आकर्षक व बोलके भव्य पोस्टर पाहत पाहत रस्ता ओलांडायची किमान चार पाच पिढ्यांची (त्यातही खास करुन चित्रपट रसिकांची) सवय आता कालबाह्य होत होत जाणार, कारण आता तेथे इरॉस हे नाव जरी ठळकपणे दिसत असले तरी पटकन लक्ष वेधून घेते ते ‘स्वदेश’ हे नाव. आकर्षक लेटरिंग. तुम्ही डिजिटल चॅनेलवर पाहाल तर या स्वदेशीची एक मिनिट अठ्ठेचाळीस सेकंदाची अतिशय आकर्षक अशी शॉपिंग सेंटरची क्लिप दिसेल. त्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सर्व कुटुंबिय या स्वदेश शॉपिंग सेंटरचे उद्घाटन करताना दिसत आहेत. इरॉसची इमारत ही दक्षिण मुंबईतील अतिशय महत्त्वपूर्ण जागा (अर्थात स्पॉट). तेथे मूल्यवान गोष्टीच्या विक्रीला भरपूर वाव. हे शॉपिंग सेंटर सुरु झाले असतानाच त्यात कदाचित मूळ चित्रपटगृह असेल. पण मुख्य दर्शनी भागात तरी तशी कोणतीही गोष्ट दिसत तरी नाही. इरॉसच्या मूळ व्यक्तिमत्वात बदल वा फरक झाल्याचे दिसतेय. आजच्या ऑनलाईन तिकीट विक्रीच्या युगात इरॉस चित्रपटगृहाचा प्रतिसाद त्यावर जास्त स्पष्ट दिसेल.

आता असेही म्हटले जाईल, घरबसल्या ओटीटीवर जगभरातील अनेक भाषेतील चित्रपट, वेबसिरीज पाहायला मिळतेय तर एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटरची गरजच काय? मुंबईसह राज्यातील व देशातीलही पिक्चर भारी असेल तरच डिजिटल युगात मल्टीप्लेक्सचं महागडे काढून ‘मोठ्या पडद्यावर’ तो एन्जॉय करतो, अन्यथा डिजिटल युगात ‘वर्क फ्रॉम होम’ तसेच ‘बसल्या जागी कुठेही आपण ओटीटीवर, यू ट्यूबवर पिक्चर पाहतोय’. त्यामुळेच भविष्यात चित्रपटगृह ही संकल्पनाच कालबाह्य होऊ शकते. इरॉस थिएटरशी माझे नाते अगदीच वेगळे. आणि तेवढेच जिव्हाळ्याचे.

 गिरगावातील खोताची वाडीतील दहा बाय दहाच्या चाळीत लहानाचा मोठा होताना दक्षिण मुंबईतील सिंगल स्क्रीन थिएटर्स, गल्ली चित्रपट आणि दूरदर्शनवरचा शनिवारचा मराठी व रविवारचा हिंदी चित्रपट एन्जॉय करीत मोठा होताना एक जाणवण्यासारखा फरक होता. तो म्हणजे, मॅजेस्टीक, सेन्ट्रल, रॉक्सी, ऑपेरा हाऊस, इंपिरियल, सुपर, अलंकार, शालिमार, नाझला ज्या सहजतेने जायचो तेच मेट्रो, न्यू एम्पायर, न्यू एक्सलसियर, रिगल, इरॉसला जाताना कपड्यांना इस्री व्यवस्थित आहे ना, शर्ट व्यवस्थित इन केलेय ना, बुटांना पॉलिश करायला हवेय का हे  पाहायचो. कारण ही इंग्लिश पिक्चर्सची हायफाय थिएटर्स. शाळेत इंग्लिशमध्ये काठावर पास होण्याशी घनिष्ठ नाते असल्यानेच या इरॉस, मेट्रोत जाताना केवढा संकोच काही विचारुच नका.  माझ्यासारखी माझ्या मित्रांची अशीच अवस्था होती. आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृतीतील हा एक महत्वाचा फंडा. हा प्रेक्षक कसा विचार करतो, कसा घडतो हेदेखील महत्वाचे.

================================

हे देखील वाचा: अगदी खरं खरं सांगा, Saiyaara पाहून रडलात की नाही?

=================================

 मी मिडियात आल्यावर माझं इराॅसशी नातेसंबंध वाढले. याचे महत्वाचे कारण, इरॉसच्या दुसर्‍या मजल्यावरील मिनी थिएटर. साधारण पंचवीस तीस पस्तीस वेताच्या अतिशय ऐसपैस आरामदायक खुर्च्या. त्यात एकदा बसल्यावर चित्रपट कितीही फसलेला असला तरी अजिबात कंटाळा येत नसे. आणि एकादा पिक्चर चांगला असल्याने त्यात गुंतत गुरफटत गेलो की त्या खुर्चीत बसलोय तो बोनस वाटे. मिनी थिएटरचे विश्वच तसे वेगळेच.

इरॉस मिनी थिएटरमधल्या प्रेस शोच्या काही आठवणी सांगायला हव्यात. ‘काफिला’ नावाच्या चित्रपटात असलेला उदय टीकेकर शो संपताच आम्हा सिनेपत्रकाराना भेटायला आल्याचे मला आजही आठवतेय आणि विशेष म्हणजे याचे त्याला आजही कौतुक आहे.  सतीश कुलकर्णी निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित  ‘गंमत जंमत’च्या (१९८७)  प्रेस शोला वर्षा उसगावकर आपल्या आईसोबत आवर्जून हजर होती हे आठवतेय. ‘वंडरगर्ल’ अशी तिला त्याच वेळी उपाधी दिल्याने तिची उपस्थिती लक्षवेधक ठरली. संजय दत्त, नम्रता शिरोडकर, रिमा लागू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘वास्तव ‘चा (१९९९) प्रेस शो संपल्यावर आम्हा समिक्षकांचे मत जाणून घेण्यास दिग्दर्शक  महेश मांजरेकर आला होता. त्याला विलक्षण कुतूहल होते की आम्ही समिक्षक त्याच्या चित्रपटावर काय बोलतोय. ‘वास्तव’ संपून आम्ही बाहेर यायला आणि महेश मांजरेकरचे यायला एकच गाठ पडल्याने त्याला आमच्या चेहर्‍यावरुनच समजले की, चित्रपट आम्हाला आवडलाय.

राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘घायल’च्या ( १९९९) प्रेस शोच्या मध्यंतरमध्ये चित्रपटाच्या पीआरओकडून हळूच निरोप मिळाला, सिनेमा संपल्यावर सनी देओलने काही निवडक समिक्षकांसाठी मागच्याच तारांकित हॉटेलमध्ये पार्टी ठेवली आहे तेव्हा थांब. असं थांबल्याने सनी देओलची भेट घेता आली. तोच यजमान असल्याने आम्हा प्रत्येकाला भेटला. चित्रपट कसा वाटला वगैरे त्याने आवर्जून विचारले.  सनी देओलची ही भेट अनपेक्षित आणि सुखावह. दिग्दर्शक रामगोपाल वर्माचे इरॉस अतिशय फेवरेट. त्याचे रंगीला, मस्त, सत्या, जंगल  येथेच मेन थिएटरला रिलीज झाले. रंगीला व सत्या आजही सुपर हिट आहेत.

अरुणा विकास दिग्दर्शित ‘गहराई’, विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘राज’, मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘कार्पोरेट‘, प्रियदर्शन दिग्दर्शित ‘विरासत’ हे इरॉसचे विशेष उल्लेखनीय हिंदी चित्रपट. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरचा ‘लगान’ (२००१) पाहायला पहिल्याच आठवड्यात दिलीप वेंगसरकर याच इरॉसमध्ये  ‘लगान’ पाहायला आला त्याची मोठी बातमी झाली. इरॉसबाहेर एका इंग्रजी वृत्तवाहिनीची भली मोठी व्हॅन उभी होती हे आठवतेय. ती लाईव्ह न्यूज ठरली. शबाना आझमी आणि नंदिता दास यांच्या भूमिका असलेला ‘फायर’ या चित्रपटांचे मेन थिएटर इरॉस हे होते. तेव्हा शिवसेनेने आंदोलन करुन हा चित्रपट बंद पाडला होता. इरॉसच्या मिनी थिएटरमध्ये कधी  सकाळी इंग्रजी चित्रपटाचे प्रेस शो असत तर कधी सेन्सॉरसाठीचेही शो होत. म्हणजे याचा कार्यविस्तार खूप होता. आणि यातून इराॅस चित्रपटगृहाचा इतिहास अधोरेखित होतोय.

================================

हे देखील वाचा: Sholay : स्पर्धेत टिकले कोण? गळपटले कोण

=================================

इरॉस इंग्लिश चित्रपटांसाठी  विशेष होते. टॉवरिंग इन्फर्मो, एन्टर द ड्रॅगन, समर ऑफ 42 असे अनेक इंग्लिश चित्रपट येथेच हिट. इरॉस आणि मराठी चित्रपट हा अतिशय दुर्मिळ योग. तरी कुमार सोहनी दिग्दर्शित ‘एक रात्र मंतरलेली’ हा रहस्यरंजक चित्रपट तेथे सकाळच्या मॅटीनी शोला रिलीज झाला. महेश कोठारे दिग्दर्शित ‘चिमणी पाखरं’ (२००१)  या यशस्वी  मराठी चित्रपटाचा एक खास खेळ नियमित शोला  आयोजित करण्यात आला होता. हाही अनुभव मी घेतला.

इरॉसला पिक्चर हाऊसफुल्ल असल्यावर ब्लॅक मार्केटमध्ये तिकीट मिळतेय का याकडे कान द्यावा लागे आणि आवाजावर डोळे लावून त्या दिशेने जावे लागे. पण समोरच्या कार पार्किंगमधील सॅन्डवीचवाल्याशी परिचय वाढला की किमान एक तिकीट एक्स्ट्रात मिळे. अचानक एके दिवशी समजले इरॉसमधील चित्रपट खेळ थांबवलेत. इरॉसच्या मुख्य दरवाजाबाहेर निळे पत्रेही लागले. अशा वेळी उलटसुलट बातम्या पसरतात. ते बंद झालेय, त्यात माॅल होतोय वगैरे वगैरे. पण तसे काहीच नसून काही बदलांसह छान नूतनीकरण होतेय अशी पक्की खबर मला असल्याने मी गप्प राहिलो. पुन्हा कधी सुरु होतेय याची वाट पाहिली.

अखेर शुक्रवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी ते ‘तेरी बातों मे ऐसा उलझा दिया’ या चित्रपटाने ते नवीन स्वरुपात सुरु होत असल्याचे समजताच बोरिवलीवरुन निघून सकाळीच इरॉसला साडेनऊ वाजता पोहचताच ‘नवीन इरॉसचे पहिले तिकीट काढणारा मी पहिला चित्रपट रसिक ठरलो’. आयनॉक्सचे सीओओ चंद्रेश यांनी माझे आवर्जून स्वागत केले. विशेष उल्लेखनीय गोष्ट, मराठी वृत्तपत्रात याची विशेष बातमी झाली. मला व्यक्तिश: या गोष्टीचा आनंद झाला. इराॅस चित्रपटगृहाशी असलेल्या माझ्या नात्यातील ही एक अतिशय उल्लेखनीय गोष्ट.

इरॉस इंग्रजांच्या काळात १५ फेब्रुवारी १९३८ रोजी सुरु झाले. दक्षिण मुंबईतील अनेक जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स त्याच काळात उभी राहिली.  तात्कालिक पारशी व्यापारी शिवावक्स कावसजी कंबाटा यांच्या मालकीच्या जागेवर वास्तुविशारद सोहराबजी भेदवार यांनी थिएटर डिझाईन केले. इरॉस हे नाव ग्रीक देवतेच्या नावावरुन बेतले आहे. काळ बदलला. चित्रपट वितरण, मार्केटिंग व प्रदर्शन यात फरक पडत गेला. आता कार्पोरेट युग रुजलय. त्यात भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रीमियम सिनेमा प्रदर्शक पीव्हीआर आयनॉक्स ओळखले जाते. त्यांनीच ‘ आयनॉक्स इरॉस’ असे नवीन नामकरण केले. मुळात बाल्कनीसह १२०० सीटस होत्या. आता बाल्कनी नव्हती. दुसर्‍या मजल्यावर थिएटर आले आणि आता ३०५ प्रशस्त आसनक्षमता होती. मिनी थिएटर मात्र आता नव्हते. आता हे लेझर थिएटरसह मुंबईतील पहिल्या स्टँडअलोन  आयमॅक्स म्हणून ओळखले जाते. इमर्सिव्ह आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत सिनेमॅटिक अनुभवासाठी अतिशय उत्तम असे म्हटले जाऊ लागले.  लेझर तंत्रज्ञानासह आयमॅक्स, नेक्स्ट जनरेशन लेझर प्रोजेक्शन आणि मल्टी-चॅनल साउंड सिस्टीम केवळ आयमॅम्स थिएटर्ससाठी खऱ्या अर्थाने इमर्सिव्ह अनुभवासाठी अशी या नवीन इरॉसची ओळख.

तांत्रिक भाषेत सांगायचे तर, लेझरसह आयमॅक्स त्याच ४के लेसर प्रोजेक्शन प्रणालीद्वारे वेगळे केले. ज्यामध्ये एक नवीन ऑप्टिकल इंजिन आणि मालकी आयमॅक्स तंत्रज्ञानाचा एक संच आहे जो क्रिस्टल स्पष्ट प्रतिमा, वाढलेले रिझोल्यूशन, प्रभावी कॉन्ट्रास्ट तसेच स्क्रीनवर उपलब्ध असलेले सर्वात वेगळे, विदेशी रंग प्रदान करतो. विशाल पडदा , लेसर-संरेखित स्पीकर आणि पेटंट केलेले डीएमआर तंत्रज्ञान यामुळेच आपण जणू पडद्यावरच्या जगात वावरतोय असेच वाटते. विशेषत: थ्री डी चित्रपट येथे वेगळाच अनुभव देणारा ठरेल. मी आता तशाच चित्रपटाची वाट पहात आहे. चित्रपटापेक्षा त्याचा तांत्रिक परिणाम अनुभवणे आता महत्वाचा झाला असून आशयघन चित्रपट पाहायचा तर जुने चित्रपट पाहा असेही सांगण्यात येते. उगाच जुने चित्रपट आजही चर्चेत असतात का? सिनेमाने मूळ आर्ट डेको डिझाइनची भव्यता आयमॅक्सच्या स्केलसह अखंडपणे एकत्रित केली आहे.

पिक्चर काय हो, आजकाल कुठेही पाह्यला मिळतोय. चार चाकी नवीन मॉडेलच्या गाडीवाले तर बीकेसीमधील ड्राईव्ह इन थिएटरला जाऊन आपल्या गाडीत बसून चित्रपट पाहतात. पण कधी थिएटर पाहायलाही जावे आणि गेलोच आहोत तर चित्रपट पाहून यावे. ऐवीतेवी हल्ली आवर्जून पहावेत असे चित्रपट असतात तरी किती सांगा? चित्रपटाचा अभ्यास म्हटल्यावर त्यात हेदेखील आहे. पूर्वी पडदा सफेद वा पिवळा पडलेला असे, मोनो साऊंड सिस्टीम असे, पण पिक्चर असे भारी असे या गोष्टी जाणवत नसत. आता पाहण्यासारखे चित्रपट किती असतात हा प्रश्न असला तरी स्क्रीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त असतात. तो अनुभव चित्रपटापेक्षा सरस असतो.

दक्षिण मुंबईतील अगदी जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्समधील ऑपेरा हाऊस काही वर्षांपूर्वी सुरु होताना असाच सुखाचा धक्का दिला होता. इरॉस पुन्हा सुरु झाल्यावर असाच सुखद धक्का बसला होता. पण अवघ्या दीड वर्षातच स्वदेश शाॅपिंग सेंटर सुरु झालेय. एकेकाळी चित्रपट हे मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय या वर्गाचा खूपच मोठा भावनिक आनंद व आधार होता. आशावादी, कष्टाळू, स्वप्नाळू वर्ग रुपेरी पडद्यावरील जगात हरवून हरखून जात असे. त्याच सामाजिक प्रश्न वर्गाने आपल्या देशात चित्रपट रुजवला, वाढवला, पसरवला. आज महानगरातील उच्चभ्रू, नवश्रीमंत वर्गाची आवडनिवड महत्वाची झाली आहे. आणि तीच गरज मल्टीप्लेक्स, मॉल व शॉपिंग सेंटर पूर्ण करीत आहेत.

================================

हे देखील वाचा : Shole : ‘शोले’ १९५३ सालीही पडद्यावर आला होता…

=================================

इरॉस, त्याचे अलिकडेच झालेले नूतनीकरणानंतरचे इरॉस व आता हे ‘स्वदेश’ शॉपिंग सेंटर हे एक बदलत्या काळानुसारचे स्थित्यंतर आहे. ते स्वीकारावे व फ्लॅशबॅकमध्ये जात जुन्या आठवणीत रमावे. पण वरच्या मजल्यावरील मूळ चित्रपटगृह कार्यरत राहणार आहे हा चित्रपट रसिकांना मोठाच दिलासा.

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Celebrity Celebrity News Entertainment Entertainment News Eros theatre latest bollywood news mumbai
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.