Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

२५ दिवसांत ८५ कोटी व्ह्युज आणि जगातील सर्वाधिक पाहिला गेलेला TV शो आहे तरी कोणता?
चित्रपट, नाटक जितक्या आवडीने भारतात पाहिले जातात तितक्याच आवडीने मालिका देखील पाहिल्या जातात… मग त्या मराठी भाषेतील असो किंवा हिंदी… पण मालिकांना सर्वात जास्त प्रेक्षकवर्ग भारतात आहे हे डावलून चालणारच नाही… मात्र, तुम्हाला माहित आहे का ९० च्या दशकात एक मालिका होती जिला केवळ २५ दिवसांत कोटींच्या घरात व्ह्युज मिळाले होते आणि जिचं नाव जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका म्हणून तिचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले होते… कोणती होती ती मालिका चला तर जाणून घेऊयात…

७०-८० च्या दशकात नाटकापलिकले लोकांना टीव्ही हे देखील एक मनोरंजनाचं माध्य आहे हे समजलं होतं… बरं त्यावेळी केवळ भारतात किंवा जगात काय सुरु आहे हे लोकांपर्यंत पोहोचावलं म्हणून बातम्या आणि धार्मिक किंवा एखाद दुसरी कौंटुबिक मालिका आणि गाणी इतकंच मनोरंजनाचं मटेरियल प्रसारित केलं जात होतं… विशेष म्हणजे त्याकाळी चाळ संस्कृती असल्यामुळे कुणा एक दोघांकडेच टी.व्ही असायचा.. त्यामुळे कार्यक्रम पाहायला सगळेजणं एकत्रित त्या माणसाच्या घरी जमायचे… याच दरम्यान, रामानंद सागर यांनी ‘रामायण’ (Ramayana) ही मालिका रिलीज केली आणि आश्चर्य म्हणजे लोकांनी अक्षरश: प्रभू श्री राम यांच्या भूमिकेत असणाऱ्या अरुण गोविल यांना टी.व्हीवरच ओवाळायला आणि आरती करायला सुरुवात केली होती…
================================
हे देखील वाचा: Ramayana Movie : ‘हे’ मराठी कलाकार झळकणार…९०० कोटींच्या ‘रामायणा’त!
=================================
अर्थात देव-देवतांच्या मालिका म्हणजे प्रत्येक भारतीयचांचं श्रद्धास्थान… त्या कार्यक्रमांमुळे लोकांच्या जीवनावर आणि विचारांवर खूप मोठा प्रभाव व्हायचा… आणि त्यामुळेच रामानंद सागर यांनी वाल्मीकी रामायण आणि तुलसीदास यांच्या रामचरितमानस यांवर आधारित ‘रामायण’ ही मालिका दूरदर्शनवर २५ जानेवारी १९८७ पासून प्रसारित केली… ७८ भागांची मालिका असणाऱ्या रामायणला प्रेक्षकांनी इतका तुफान प्रतिसाद दिला होता की लोकं सगळी कामं बाजूला सारुन दर रविवारी सकाळी साडे नऊ वाजता टीव्हीसमोर बसून राहायचे. लोकांच्या उत्सफुर्त प्रतिसादामुळे रामायण मालिका प्रसारित झाल्याच्या अवघ्या २५ दिवसांमध्येच व्ह्युजची संख्या जवळपास ८५ कोटींच्या घरात गेली होती… विशेष म्हणजे दिग्दर्शक रामानंद सागर यांनी अभ्यासपूर्वक ‘रामायण’ ही पौराणिक मालिका सादर केली होती… त्यामुळे जवळपास ३७ वर्ष उलटून गेली तरी आजही रामायण म्हटलं की रामानंद महासागर यांचीच मालिका डोळ्यांपुढे येते…(Entertainment News)

रामायण या मालिकेत प्रभू रामचंद्रांच्या जीवनाची संपूर्ण कथा दाखवण्यात आली होती… त्यांच्या जन्मापासून ते वनवासापर्यंतचे प्रत्येक प्रसंग फार बारकाईने सादर केले गेले होते.. यात सीता मातेचं हरण, रावणाचा वध आणि नंतर सहकुटुंब १४ वर्षांनी प्रभू श्रीराम यांचं अयोध्याला परतणं हे सर्व दाखवण्यात आलं होतं. मालिकेतील प्रभू श्री राम, सीता, लक्ष्मण, हनुमान आणि रावण यांसारख्या व्यक्तिरेखांनी लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं होतं.

या मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका अरुण गोविल (Arun Govil) यांनी इतकी उत्कृष्ट सादर केली होती की लोकं त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर प्रभू राम समजून त्यांच्या पाया पडत असत… तर, दीपिका चिखलिया यांनी सीता मातेची भूमिका, दारा सिंह यांनी हनुमान, आणि रावणाची भूमिका अरविंद त्रिवेदी यांनी भूमिका साकारत अक्षरश: जीवंत केल्या होत्या…
================================
हे देखील वाचा: आदिपुरुष बघून रामानंद सागर यांच्या रामायणाची का आठवण काढली जातेय!
=================================
१९८७ ते १९८८ या कालावधीत दुरदर्शनवर प्रसारित झालेली ‘रामायण’ ही मालिका देशात २०२० मध्ये जेव्हा लॉकडाऊन लागला होता तेव्हा पुन्हा दाखवण्यात आली होती… आणि त्यावेळी एका एपिसोडला जवळपास ७.७ कोटी लोकांनी पाहिलं होतं… आणि पुन्हा जवळपास ३० वर्षांनी या मालिकेशी कोटींच्या घरात प्रेक्षक जोडले गेले होते… मीडिया रिपोर्टनुसार, रामायण माविकेला आजवर ८५ कोटी व्ह्युज मिळाले असून IMDb वर आजही या शोला ९.१ रेटिंग आहे. शिवाय, या मालिकेचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे भविष्यात कितीही कोटींच्या बजेटमध्ये रामायण मालिका किंवा चित्रपटस्वरुपात बनवलं गेलं तरी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ची क्रेझ काही केल्या कमी होणार नाही हे पक्क आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi