Raanjhanaa : “नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा आत्मा”; धनुषने व्यक्त केल्या भावना

‘सौतन’ मधील Kishore Kumar यांच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा मजेदार किस्सा!
महान कलाकार किशोर कुमार यांचा आज ४ ऑगस्ट हा जन्मदिवस… त्या निमित्ताने त्यांच्या एका गाण्याच्या रेकॉर्डिंगचा भन्नाट किस्सा…. हे गाणं गायला आधी किशोर कुमार का तयारच नव्हते आणि नंतर अशी कोणती गोष्ट झाली की ज्याने ते हे गाणं गायला एका मिनिटात तयार झाले? खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे. ‘सौतन’ या १९८३ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील एका लोकप्रिय गाण्याच्या मेकिंगचा हा किस्सा आहे.

संगीतकार उषा खन्ना या भारतातील सर्वात लोकप्रिय आणि मोठी इनिंग खेळलेल्या महिला संगीतकार आहेत. त्यांच्याकडे सर्व गायक आणि गायिकांनी गायली. किशोर कुमार यांनी उषा खन्ना यांच्याकडे तशी संख्याने कमी गाणी गायली. पण जी गाणी गायलेली ती अतिशय बहारदार आहेत; आठवणीत राहणारी अशी आहे. सावनकुमार टाक दिग्दर्शित ‘सौतन’ हा चित्रपट ३ जून १९८३ या दिवशी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक होते सावन कुमार होते.
या चित्रपटातील एका गाण्याच्या रेकॉर्डिंगचा किस्सा मध्यंतरी संगीतकार उषा खन्न खन्ना यांनी एकदा रेडिओवरील कार्यक्रमात सांगितला. खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे. किशोर कुमार यांच्या हरहुन्नरी पणाची साक्ष देणारा हा किस्सा आहे. ‘सौतन’ चित्रपटाची निर्मिती जेव्हा होत होती तेव्हा संगीतकार उषा खन्ना यांनी चित्रपटातील गाण्याच्या जागा ओळखून त्यावर काम करायला सुरुवात केली. चित्रपटाची गाणी सावंत कुमार यांनीच लिहिली होती.
या चित्रपटात राजेश खन्ना टीना मुनीम, पद्मिनी कोल्हापुरे आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपट म्युझिकली हिट झाला. या चित्रपटातील एका गाण्याचं रेकॉर्डिंग होतं. हे गाणं गाणं गाणार होते किशोर कुमार. संगीतकार उषा खन्ना यांनी या गाण्याचे डमी रेकॉर्डिंग करून किशोर कुमार यांच्याकडे पाठवले. चार दिवसानंतर गाण्याचे शूटिंग होतं. त्यामुळे रेकॉर्डिंग करणं गरजेचं होतं. किशोर कुमार यांना फेमस स्टुडिओमध्ये बोलवण्यात आला होते. सर्व म्युझिशियनस तयार होते. पण तितक्यात स्टुडिओमध्ये किशोर कुमार यांचा फोन आला.

उषा खन्ना यांना किशोर म्हणाले ,” उषाजी मेरी तबीयत अचानक बिगड गई है. मै आज रेकॉर्डिंग को नही आ सकता. सॉरी.” त्यावर उषा खन्ना म्हणाल्या “ लेकिन दादा. यहा तो हम सब लोग आपका इंतजार कर रहे है और रेकॉर्डिंग स्टुडिओ सिर्फ आज के दिन के लिये हम ले लिया है.” किशोर कुमार म्हणाले,” लेकिन उषाजी मै बिलकुल नही गा सकता. मेरी आवाज बिलकुल अच्छी नही निकलती. तुम ट्रॅक रेकॉर्ड कर लो. मैं बाद में डब करूंगा.” उषा खन्ना म्हणाल्या,” दादा, आप जानते हो ये सुविधा इस रेकॉर्डिंग स्टुडिओ मे उपलब्ध नही है. तुम्हे तो मालूम है. तुम्हे आना पडेगा.” किशोर कुमार म्हणाले,” नही उषाजी. मुझे माफ कर दो.” आता उषा खन्ना आणि सर्व म्यूझिशन्स डोक्याला हात लावून बसले. काय करायचं?
पण मग चमत्कार झाला तास दीड तासाने अचानक किशोरदा किशोरदा असा जल्लोष ऐकु यायला लागला. आणि चक्क किशोर कुमार यांनी रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये एन्ट्री घेतली. आणि उषा खन्ना यांना म्हणाला ,”चलो चलो चलो. गाना जल्दी रेकॉर्ड कर दो . मुझे जाना है!” उषा खन्ना , सर्व म्युझिशियनस एकदम खूष झाले. सूचना केल्या गेल्या. एक-दोन रिहर्सल झाल्या. आणि गाणे ओके झाले. गाणं होतं ‘जिंदगी प्यार का गीत है इसे हर दिल को गाना पडेगा’ गाणं रेकॉर्डिंग झाल्यानंतर उषा खन्ना ने किशोर कुमारला आपला रूम मध्ये बोलावलं आणि म्हणाल्या ,” दादा, सकाळी काय झालं होतं?”
================================
हे देखील वाचा: Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?
=================================
त्यावर हसत हसत किशोर कुमार म्हणाले,” उषाजी तुम्ही जी टेप माझ्याकडे दिली होती ती टेप न ऐकता मी दुसऱ्याच कुठल्यातरी संगीतकाराची टेप ऐकली आणि त्या गाण्याच्या टेप मध्ये रागधारी होती ताणेबाणे होते. और तुम तो जानती हो ये रागाधारी मेरे पल्ले नही पडती. मुझे वो कुछ नही आती. मुझे क्लासिकल सिंगिंग आतीही नही इसलिये मैने बहाना बनाया; की रेकॉर्डिंग टाल दिया जाय. पण नंतर माझा असिस्टंट अब्दुल ने तुम्ही पाठवलेली टेप माझ्या हातात दिली ती ऐकली आणि लगेच मी इकडे आलो. खूप सुंदर गाणं बनवलं आहे. सुबह की तकलीफ के लिये सॉरी.” अशा पद्धतीने एका लोकप्रिय गाण्याचा जन्म झाला. ‘जिंदगी प्यार का गीत है’ हे गाणं राग यमन वर आधारित आहे. हेच गाणं चित्रपटात लता मंगेशकर यांच्या आवाजात देखील स्वतंत्ररित्या रेकॉर्ड केले गेले. आज ४ ऑगस्ट. किशोर कुमार यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने किशोर कुमारच्या एका गाजलेल्या गाण्याचा हा एक वेगळा किस्सा.