‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Dhadak 2 : तृप्ती डिमरीचा धडक बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला; जाणून घ्या कलेक्शन…
तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘धडक २’ चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झाला… जातीय वादावर भाष्य करणारा हा चित्रपट खरं तर रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता… २०१८ मध्ये आलेल्या धडक चित्रपटाचा हा सीक्वेल असून पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग यश मिळवण्यात कमी पडला आहे…जाणून घेऊयात ‘धडक २’ (Dhadak 2) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे…

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘धडक २’ ने पहिल्या दिवशी ३.५ कोटी, दुसऱ्या ३.७५ कोटी, तिसऱ्या ४.१५ कोटी, चौथ्या दिवशी १.३५ कोटी, पाचव्या दिवशी १.७ कोटी, सहाव्या दिवशी १.१५ कोटी, सातव्या दिवशी १.१ कोटी, आठव्या दिवशी अद्याप ३३ लाख कमवत एकूण केवळ १७.०३ कोटींचाच गल्ला जमवला आहे… विशेष म्हणजे तृप्ती डिमरी हिच्या आजवरच्या चित्रपटांच्या कमाईपैकी सर्वात कमी कमाई करणारा धडक २ चित्रपट ठरला आहे…(Dhadak 2 box offfice collection)
================================
=================================
तृप्ती डिमरी हिच्या ‘भूल भूलैय्या ३’ (Bhool Bhulaiya 3) चित्रपटाने २६०.११ कोटी, ‘बॅड न्यूज’ने ६४.५३ कोटी, ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ने ४२.०९ कोटी कमावले होते… महत्वाचं म्हणजे ‘सैय्यारा’ आणि ‘महावतार नरसिंहा’ या चित्रपटामुळे धडक २ चित्रपटाची कमाई कमालीची घटली आहे… आता येत्या काळात हा चित्रपट किमान ५० कोटींचा टप्पा तरी पार करु शकेल का अशी शंका उपस्थित केली जात आहे.. तसेच, लवकरच तृप्ती माधुरी दीक्षित सोबतही झळकणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi