Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Shubha Khote : “तडपाओगे तडपालो हम तडप तडप कर भी तुम्हारे गीत गायेंगे…”
सध्याच्या सोशल मीडिया च्या जमाने मध्ये instagram वर रील पोस्ट करणे हा इथला तरुणाईचा अत्यंत आवडीचा छंद झाला आहे. हे काही कलाकारांचे प्रोफेशन देखील झाले आहे. यात एक होतं की जुनी दुर्मिळ गाणी आणि त्यावर बनलेल्या रिल्स रसिकांना नव्या स्वरूपात नव्या अंदाजात आणि नवीन पिढीकडून पाहायला मिळतात. कितीतरी विस्मृतीत गेलेली गाणी या निमित्ताने पुन्हा रसिकांच्या पुढे येतात. अर्थात हे यश जितकं या नवीन कलाकारांचा आहे तितकच किंबहुना त्याहून जास्त यश हे पन्नास साठ वर्षांपूर्वी त्या काळातील कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीचा आहे.

सध्या रील्सच्या दुनियेमध्ये सर्वात लोकप्रिय असलेलं गाणं म्हणजे १९५९ साली प्रदर्शित झालेल्या ‘बरखा’. या चित्रपटातील ‘तडपाओगे तडपालो…’ या या गाण्यावर अक्षरशः रोज असंख्य रील्स बनत आहेत. नवीन पिढीचे हे अत्यंत आवडीचं रील सॉंग झालं आहे. गुगलवर या रील बाबत माहितीचा शोध घेतला असता असं दिसतं की आजवर याच्या किमान ३० लाख रिल्स बनलेल्या आहेत. यातून या गाण्याची सर्वात जास्त जी रील बघितली गेली आहे तिच्या दर्शकांची संख्या तब्बल सहा कोटी आहे. याचाच अर्थ या ३० लाख रील्सला आजवर अंदाजे चाळीस कोटी प्रेक्षकांनी बघितले असणार! हा आकडा फार मोठा आहे. अर्थात इन्स्टा ची अल्गोरिदमची गणित त्यांचा बिजनेस पॉईंट ऑफ व्ह्यू या सर्व गोष्टींचा विचार जरी केला तरी या गाण्याने प्रचंड मोठी लोकप्रियता मागच्या महिन्याभरात कमावली आहे असे म्हणावे लागेल. ही लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच आहे.
या निमित्ताने नवीन पिढी पुन्हा एकदा जुन्या चांगल्या गाण्यांच्या शोधात मागे मागे सिनेमाच्या गोल्डन इरा कडे जाते आहे. हा खूप चांगला शुभ संकेत आहे. कारण त्या काळामध्ये तयार झालेली गाणी खरोखरच मेलडीअस तर होतीच पण त्यामागे त्यांनी घेतलेली मेहनत प्रचंड होती. तंत्रज्ञान आजच्या इतकं विकसित नसताना देखील त्यांनी संगीतामध्ये जे प्रयत्न केले होते; जे प्रयोग केले होते त्याला तोड नव्हती. अभिजात पारंपारिक आणि पाश्चात्य या वाद्यांचा सुरेल मेळ या गाण्यांमध्ये असायचा. गीतकार कलावंताच्या भावना अगदी सटीक शब्दांमध्ये व्यक्त व्हायचे. आणि गायक कलाकार गाण्यातील भावनांना योग्य रीतीने रसिकांपर्यंत पोहोचवायचे. या सर्वांचा टोटल कम्बाइन इफेक्ट खूप प्रभावी असायचा. त्यामुळे भलेही चित्रपट त्या काळात चालले नसले तरी गाणी मात्र प्रचंड चालेली.

आता थोडसं ‘बरखा’ या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट दक्षिणेतील एव्हीएम या चित्र संस्थेने बनवला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन कृष्णन आणि पंजू या जोडीने केले होते. या चित्रपटात जगदीप आणि नंदा ही लीडिंग पेअर होती. ‘तडपाओगे तडपालो’ हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं होतं. हे गाणं लिहिलं होतं गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी. याला संगीत होतं चित्रगुप्त यांचे. चित्रपटात हे गाणे अभिनेत्री शोभा खोटे आणि अनंत कुमार यांच्यावर चित्रित झालं होतं. यातील शुभा खोटे च लटके झटके आणि तिचं प्रियकरावरचं निरागस प्रेम खूप चांगल्या रीतीने दिसतं. या गाण्यात अकॉर्डियन चा वापर खूप चांगला केलेला दिसतो. हा चित्रपट १९५९ साली प्रदर्शित झाला होता. वस्तुतः हा चित्रपट एका Thai Pirandhal Vazhi Pirakkum या तमिळ सिनेमाचा रिमेक होता. या चित्रपटाला त्या काळात चांगले यश मिळाले होते.
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
गंमत म्हणजे जगदीप या अभिनेत्याला या चित्रपटासाठी 750 रुपये महिना असा पगार होता तर अभिनेत्री नंदा हिला पंधरा हजार रुपये प्रति महिना पगार होता! चित्रगुप्त यांनी या चित्रपटाला संगीत देताना यातील सर्व गाणी लता मंगेशकर यांनी गायलेली होती. मुकेश यांच्यासोबत लताचे ‘एक रात मे दो दो चाँद खिले एक घुंघट मी…’ हे गाणं त्या काळात खूप लोकप्रिय झालं होतं तसेच रफी सोबतच ‘दूर जो नदिया बहती है…’ हे गाणं देखील त्या काळात चांगलं चाललं होतं

चित्रपटाचे दिग्दर्शक कृष्णन आणि पंजू हे अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक होते. त्यांनी पन्नास हुन अधिक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. हिंदीमध्ये यांनी ‘भाभी’, ‘बरखा’, ‘बिंदिया’, ‘शादी’, ‘मनमौजी’, ‘मेरा कुसुर क्या है’, ‘दो कलिया’, आणि ‘मै सुंदर हु’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटातील ‘तडपाओगे तडपालो…’ या गाण्यात शुभा खोटे सोबत जो देखणा अभिनेता दिसतो त्याचं मराठी कनेक्शन सांगितलंच पाहिजे. हा अभिनेता आहे अनंत कुमार. प्रभात फिल्म्सच्या छाया (१९३६) आणि रामशास्त्री (१९४१) या सिनेमात तो बालकलाकार म्हणून चमकला.पुढे ‘दोन घडीचा डाव’ या सिनेमातील त्याची भूमिका खूप गाजली. अनंत पुरुषोत्तम मराठे हा गायक आणि अभिनेता राम मराठे चा भाऊ. एव्हीएम चित्र संस्थेच्या अनेक सिनेमात विशेषत: धार्मिक सिनेमात तो चमकला. देखणा अनंत मराठे तेंव्हा या संस्थेचा लाडका अभिनेता होता. मनोजकुमार यांच्या ‘शहीद’ (१९६५) मध्ये त्याने राजगुरूची भूमिका केली होती.