Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Deepika Padukone : दीपिका पादुकोण हिची The Internच्या हिंदी रिमेकमधून एक्झिट
बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आई झाल्यानंतर आता पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाली आहे… दुआ हिला जन्म देण्यापूर्वी तिने ‘कल्की २८९८ एडी’ आणि ‘सिंघम अगेन’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं… गेल्या काही काळापासून ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘द इंटर्न’ (The Intern) या चित्रपटात पिकू नंतर पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार असं सांगितलं जात होतं… मात्र, आता दीपिकाने ‘द इंटर्न’ या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून माघार घेतली असून केवळ चित्रपटाची निर्मिती ती करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे…

‘द इंटर्न’ (The Intern) हा २०१५ साली आलेला हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट होता. यात रॉबर्ट डि नीरो आणि अॅनी हॅथवेने मुख्य भूमिका साकारली होती. आणि आता याच चित्रपटाचा हिंदी रिमेक द इंटर्न रिलीज होणार आहे… चित्रपटाची कथा अशी आहे की, निवृत्त झाल्यानंतर काहीतरी काम हवं म्हणून रॉबर्ट डी नीरो एका कंपनीत इंटर्न म्हणून रुजू होतात. अॅनी हॅथवे तिथे बॉस असते. नवीन पिढीच्या अनेक नव्या गोष्टी ते कशा समजून घेतात आणि नव्या पिढीची अॅनी त्यांच्याकडून नकळत काय काय शिकते याचं उत्तम सादरीकरण या चित्रपटात करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि (Amitabh Bachchan) दीपिका पादुकोण (Deepika Padukone) प्रमुख भूमिका साकारणार होते. मात्र आता नवीन अपडेटनुसार दीपिका पादुकोणने अभिनेत्री म्हणून माघार घेतली असून आता तिच्या जागी नवी कोणती अभिनेत्री येणार हा प्रश्न उभा राहिला आहे…

‘द इंटर्न’च्या हिंदी रिमेकची चर्चा २०२० पासूनच सुरु होती. दीपिकाने या हॉलिवूड चित्रपटाचे हक्क विकत घेतल्याची घोषणा देखील केली होती. तसंच हिंदी वर्जनमध्ये ती स्वत: भूमिका साकारणार होती. आधी अमिताभ बच्चन नाही तर ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्यासोबत ती द इंटर्नमध्ये दिसणार होती… पण ऋषी कपूर यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांचं नाव फायनल करण्यात आलं. कालांतराने कोरोनामुळे हा प्रोजेक्टच लांबणीवर पडला होता. पण आता लवकरच चित्रपटाची मेकींग सुरु होणार असून अमिताभ यांच्या अपोझिट नवी अभिनेत्री दिसणार आहे… दीपिका पादुकोण तिच्या KA productions अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करणार आहे…
================================
हे देखील वाचा : Deepika Padukone : “इंडस्ट्रीच्या बाहेरची अशी भावना….”; दीपिकाचं महत्वाचं विधान
=================================
काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ (Spirit Movie) चित्रपटातूनही तिची झालेली एक्झिट चर्चेचा विषय होती… आता स्पिरिटनंतर लागलीच दुसऱ्या चित्रपटातून तिने घेतलेली माघार लोकांच्या भूवया उंचावणारी नक्कीच आहे… आता नेमकं तिने असं का केलं याचं कारण जाणून घेण्याची लोकांना उस्तुकता निर्माण झाली असून तिच्या जागी कोणती अभिनेत्री येणार हे देखील समजणं महत्वाचं आहे… शिवाय, दीपिका पादूकोण हळूहळू अभिनयापासून दुर होत निर्मिती क्षेत्रात जाणार का? असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे… आता येणारा काळ आणि स्वत: दीपिकाच याचा खुलासा करेल अशी अपेक्षा आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi