Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

“Rohini Hattangadi फार उत्तम अभिनेत्री आहे पण मालिकांमुळे…”; जेव्हा अनुपम खेर यांनी केलेली तक्रार
भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आजवर १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत… ‘गांधी’ (Gandhi Movie) हा त्यांच्या सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपट असून या चित्रपटामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली… रोहिणी यांनी आजवर हिंदीतल बऱ्याच दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली आहे… यापैकीच एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर… रोहिणी हट्टंगडी आणि अनुपम खेर यांनी ‘सारांश’ चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं… त्यानंतर ‘क्रोध’,’तमाचा’,’लढाई’, ‘चालबाज’ अशा बऱ्याच चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.. पण तुम्हाला माहित आहे का एका मराठमोळ्या अभिनेत्रीकडे अनुपम यांनी रोहिणी हट्टंगडी यांची तक्र केली होती… काय होता हा किस्सा जाणून घेऊयात…

तर, रोहिणी हट्टंगडी यांनी नुकतीच ‘आरपार’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी मराठी अभिनेत्री व लेखिका मुग्धा गोडबोले यांच्याशी संवाद साधला. यादरम्यान, मुग्धा यांनी रोहिणी हट्टंगडी व अनुपम खेर यांचा एक किस्सा सांगितला. मुग्धा म्हणाल्या की, “मी एकदा रोहिणी ताईंबद्दल काही वर्षांपूर्वी एक लेख लिहिला होता आणि तो बऱ्यापैकी विस्तृत होता. त्यावेळेला मी अनुपम खेर यांना फोन केला होता. तो फोन त्यांच्या मॅनेजरने उचलला होता. मी त्यांना विचारलं की, मला अनुपम खेर यांच्याबरोबर रोहिणी ताईंसंदर्भात बोलायचं आहे. मी कधी करू फोन? त्यावर ते कॅलेंडर बघून मी सांगतो तुम्ही एक काम करा उद्या २ वाजता फोन करा, असं म्हणालेले. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला सांगाल त्या वेळेला फोन करेन, अगदी मध्यरात्रीपण करेन. अनुपम खेर यांच्याशी मला बोलता येणार आहे वगैरे तर, असं म्हणून मी फोन ठेवला.”

पुढे मुग्धा म्हणाल्या, “मी तो फोन ठेवल्यानंतर काही वेळातच मला अनुपम खेर यांचा फोन आला आणि त्यानंतर ते पाऊण तास माझ्याशी रोहिणी ताई तुझ्याबद्दल बोलत होते. ते भरभरून बोलत होते. ‘सारांश’ चित्रपटाबद्दलही ते बोलले. पण, त्यावेळेला रोहिणी ताई त्यांनी तक्रार केली किंवा ते खूप मनापासून म्हणाले होते की, ती फार उत्तम अभिनेत्री आहे आणि मला असं वाटतं की, तिने जेवढं करायला हवं होतं तेवढं केलं नाही. ती मालिकांमध्ये अडकली, असं काहीतरी ते म्हणाले होते.”
================================
हे देखील वाचा : Gandhi चित्रपटातील ‘त्या’ सीनमध्ये ३ लाख लोकं झाली होती सहभागी!
=================================
दरम्यान, अनुपम खेर यांनी देखील उल्लेख केलेला ‘सारांश’ चित्रपट मुळात त्यांचा स्वत:चा बॉलिवूडमधला डेब्यु चित्रपट होता जे १९८४ मध्ये आला होता… या चित्रपटात त्यांच्यासोबत रोहिणी हट्टंगडी यांनी काम केलं होतं… तसेच. यात निळू फुले, मदन जैन, सुहास भालेकर व सोनी राजदान असे बरेच कलाकार झळकले होते.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi