Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Raj Kapoor-Nargis यांच्या सुपर हिट ‘चोरी चोरी’ सिनेमातील गाणी मन्नाडे यांना कशी मिळाली?
भारतीय सिनेमाचे गोल्डन इरामध्ये प्रत्येक नायकाची एका गायकासोबत चांगली जोडी जमली होती. पन्नास च्या दशकामध्ये दिलीप कुमार सुरुवातीला तलत मेहमूद आणि नंतर रफी यांच्या स्वरात गात होते. देव आनंद यांच्यासाठी किशोर कुमार यांचा स्वर अगदी फिक्स आणि परफेक्ट होता. तर राजकपूर यांच्यासाठी मुकेशचा स्वर! हे असं जरी असलं तरी काही वेळा त्यात बदल देखील होत होते. पण हे बदल होत असताना मन्ना डे यांना मात्र एका चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंग च्या वेळेला चित्रपटाच्या निर्मात्याने खूप जास्त वाईट पद्धतीने अपमानित केलं होतं. पण राजकपूर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी त्या निर्मात्याला योग्य ती समज दिली आणि ही गाणी मन्नाडे यांच्याकडूनच गाऊन घेण्यात आली.

मन्नाडे खरोखरच ग्रेट थोर मनाचे. त्यांनी हा अपमान विसरून या चित्रपटाची गाणी गायली, जी आज ६०-७० वर्षानंतर देखील आपण तितक्याच आवडीने ऐकतो. कोणता होता चित्रपट? आणि कोणती होती ती गाणी? आणि चित्रपट निर्मात्याने मन्नाडे यांचा का अपमान केला होता? १९५६ साली राज कपूर आणि नर्गिस यांना मुख्य भूमिकेत घेऊन दक्षिणेतील एव्हीएम या बॅनरखाली ‘चोरी चोरी’ या चित्रपटाची निर्मिती झाली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन अनंत ठाकूर यांनी केले होते. चित्रपटाची गाणी शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांनी लिहिली होती. तर संगीत शंकर जयकिशन यांचे होते. चित्रपटांमध्ये राजकपूर, नर्गिस यांच्यासोबत प्राण, भगवान, जॉनी वॉकर, गोप यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट फ्रांक कापरा यांच्या ‘ इट्स हॅपनड इन वन नाईट’ या गाजलेल्या हॉलीवूड सिनेमाचा रिमेक होता. एव्हीएम प्रोडक्शन चा हा खूप महत्वकांक्षी सिनेमा आहे.
================================
हे देखील वाचा : ‘कोमा’त गेलेल्या नर्गिसला सुनील दत्त ने परत आणले!
=================================
या चित्रपटातील गाणी राज कपूर साठी मुकेश यांनी गावी असे साऊथ कडील निर्मात्याला वाटत होते तसे त्यांनी संगीतकाराला सुचवले देखील होते. पण त्या काळात मुकेश अवेलेबल नव्हते. त्यामुळे या चित्रपटातील राजकपूर वर चित्रित असलेली सर्व गाणी मन्नाडे यांनी गावीत असे ठरले. मन्नाडे आणि राजकपूर हे कॉम्बिनेशन १९५१ सालच्या ‘आवारा’ पासून सुपरहिट ठरत होते. त्यानंतर श्री 420 या चित्रपटात देखील या दोघांची गाणी होती. त्यामुळे साहाजिकच शंकर जयकिशन यांनी राजकपूर साठी मन्नाडे यांचा स्वर निवडला. मन्नाडे यांना रेकॉर्डिंग ला बोलवण्यात आलं.

या रेकॉर्डिंगला चित्रपटाचे निर्माते आणि इतर प्रोडक्शन चे लोक देखील उपस्थित होते. निर्मात्यांना गायकाचा हा बदल माहिती नव्हता. त्यामुळे मन्ना डे ला पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यात तिडीक गेली आणि ते म्हणाले “यांना इथे कोणी बोलावलं? या सिनेमातील सर्व गाणी तर मुकेश गाणार आहेत.” आणि त्यांनी मन्नाडे कडे बघून सांगितलं की,” तुम्ही आता रेकॉर्डिंग स्टुडिओतून बाहेर गेले तरी चालेल!” बिचारे मन्नाडे . शांतपणे बसून राहिले. पण मन्नाडे यांच्या मदतीला तत्काळ राज कपूर धावून गेले त्यांनी निर्मात्याला खडसावून विचारले,” तुम्ही एका प्रस्थापित गायकाशी असे कसे बोलू शकतात? आणि मन्ना डे आज पहिल्यांदाच माझ्यासाठी गात नाहीत. यापूर्वी देखील त्यांनी माझ्यासाठी गायले आहे. तुम्ही कदाचित ऐकलं नसेल. तुम्ही ताबडतोब मन्ना डे यांची माफी मागा. ते खूप ग्रेट गायक आहेत. आणि तुम्ही जर माफी मागणार नसेल तर मी सिनेमातूनच बाहेर पडत आहे!” चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत ठाकूर यांनी देखील निर्मात्याला समजावून सांगितले. जेव्हा राजकपूर ने सिनेमा सोडण्याची धमकी दिली आणि सगळीकडून मन्नाडे यांच्या बाजूने लोक उभे राहिले तेव्हा निर्मात्यानी आणि माघार घेतली. आणि मन्नाडे यांची माफी मागून त्यांना गायची विनंती केली.
================================
हे देखील वाचा : Shashi Kapoor यांना राज कपूर यांनी कोणता मोलाचा सल्ला दिला होता?
=================================
मन्नाडे देखील मोठ्या थोर हृदयाचे! त्यांनी मोकळ्या मनाने माफ करून गाणे रेकॉर्ड केले. गाणे होतं ‘ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाये…’ निर्मात्याला तो स्वर आवडला. नंतर उरलेली सर्व गाणी पुढच्या आठवड्यामध्ये मन्नाडे यांच्चाच स्वरात रेकॉर्ड झाली. हि गाणी काय बेफाम होती. ‘आजा सनम मधुर चांदनी में हम..’,’ जहां मै जाती हू वही चाले आते हो..’ राज वर चित्रित हि तीनही गाणी मन्नाडे यांच्या स्वरातली होती. ऑक्टोबर १९५६ मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिट झाला. मन्नाडे यांच्या गाण्यांमध्ये कुठेही कुणाला काहीही कमतरता वाटली नाही. उलट राजकपूर साठी मन्नाडे यांचा आवाज किती योग्य आहे असेच सर्वांना वाटले. मन्नाडे यांनी अपमान गिळून टाकला आणि गाणी गायली. खरोखरच ग्रेट कलावंताचे हे उदाहरण आहे.

या सिनेमात पंछी बनू उडती फिरू, इस पार साजन उस पार धारा आणि (लताचे ऑल टाईम ग्रेट ) रसिक बलमा हि लताची तीन सोलो गाणी होती. रफीच्या स्वरातील ‘ऑल लाइन क्लियर’ आणि रफी लताच्या स्वरातील तुम अरबो का हेर फेर करने वाले राम जी सव्वा लाख की लॉटरी भेजो अपने भी नाम जी हि गाणी होते. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरातील ‘मनभावन के घर जाये गोरी घुंघट मे शरमाये गोरी हमे ना भुलाना…’ हे अप्रतिम गाणं या चित्रपटात होते. राज कपूर नायक असलेला चित्रपट असून देखील त्याच्यावर कोणतेही सोलो गीत चित्रित झाले नव्हते .सिनेमाचे निर्माते एल बी लछमन जरी असले तरी या सिनेमाचा सर्व फायनान्स हा एव्हीएम प्रोडक्शन ने केला. तिकडच्याच एका निर्मात्याने मन्नाडे यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते होता. ‘चोरी चोरी’ हा चित्रपट राज कपूर आणि नर्गिस यांचा शेवटचा चित्रपट ठरला. यानंतर ते पुन्हा कधीच एकत्र आले नाहीत. या चित्रपटाच्या संगीताला फिल्मफेअर अवार्ड फंक्शन मध्ये बेस्ट म्युझिक चा पुरस्कार शंकर जयकिशन यांना मिळाला.