Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Rajinikanth आणि ह्रतिक रोशन ३९ वर्षांनी येणार समोरासमोर…
भारतीय चित्रपटसृष्टीत बऱ्याच कलाकारांनी अगदी बालकलाकार म्हणून आपली काकिर्द सुरु केली होती…. असाच एक हरहुन्नरी अभिनेता म्हणजे ह्रतिक रोशन (Hrithik Roshan)… ३९ वर्षांपूर्वी ज्या सुपरस्टारच्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं… आज त्यांच्या चित्रपटासोबत ह्रतिकचा चित्रपट क्लॅश होणार आहे… होय… थलायवा, सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या ‘कुली’ चित्रपटासोबत ह्रतिक रोशन याचा ‘वॉर २’ रिलीज होणार आहे…. काय आहे ३९ वर्षांचा किस्सा जाणून घेऊयात…

तर, १९८६ मध्ये ओम प्रकाश दिग्दर्शित ‘भगवान दादा’ हा चित्रपट रिलीज झाला होता… यात रजनीकांत, श्रीदेवी, राकेश रशन यांच्या प्रमुख भूमिका होत्या… आणि यात ह्रतिक रोशन याने रजनीकांत यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती… आता तब्बल ३९ वर्षांनी पुन्हा एकदा ह्रतिक आणि रजनीकांत समोरासमोर येणार आहेत; पण वेगवेगळ्या चित्रपटांमधून..
================================
हे देखील वाचा : Rajinikanth : रजनीकांतचा वन मॅन शो “बाशा” चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण
=================================
दरम्यान, रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीत ५० वर्ष पूर्ण केली असून त्यांचा आगामी ‘कुली’ (Coolie) चित्रपट फार खास असणार आहे… हा चित्रपट खऱ्या अर्थाने पॅन इंडिया चित्रपट असून यात तमिळ चित्रपटसृष्टीसोबतच इतर ४ चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार दिसणार आहेत… शिवाय, ‘कुली’च्या निमित्ताने ३० वर्षांनी आमिर खान (Aamir Khan) आणि रजनीकांत पुन्हा एकत्र दिसणार असून त्याचा डेब्यु चित्रपट असणार आहे… तर, ह्रतिक रोशन याचा वॉर २ चित्रपट ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) याचा बॉलिवूड डेब्यु असून यात कियारा अडवाणी देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे… त्यामुळे आता प्रेक्षकांच्या पसंतीस कुली येणार की ‘वॉर २’ (War 2) हे १४ ऑगस्ट २०२५ लाच समजणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi