Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

जेव्हा Kishore Kumar यांनी गाणे गात गात बप्पी लहरींना स्टेजवरून उतरवले!
अष्टपैलू कलावंत किशोर कुमार जितके चांगले गायक होते तितकेच ते चांगले परफॉर्मर देखील होते. देशभर आणि जगभर त्यांनी अनेक स्टेज परफॉर्मन्स केले आणि प्रत्येक ठिकाणी जबरदस्त हंगामा केला. त्यांच्या म्युझिकल शो ला सर्वत्र प्रचंड गर्दी असायची. या कार्यक्रमात किशोर ने गायलेल्या गाण्यांसोबत च केलेलं योडेलिंग आणि इतर गमती जमती प्रेक्षकांना जाम आवडायच्या . सत्तर आणि ऐंशी च्या दशकाच्या सुरुवातीला किशोर कुमार यांचे शोज आणि म्युझिकल कॉन्सर्ट म्हणजे प्रचंड गर्दी हे जणू समीकरण झालं होतं.

रसिकांचं खूप मोठं प्रेम होतं किशोरच्या स्वरावर आणि गाण्यावर. त्यामुळे किशोर कुमार एकदा स्टेजवर आले की लोकांना ते पुन्हा परत जाऊ नये असच वाटायचं. ते त्यांची कायम वाट पाहत असायचे. पण एका म्युझिकल शोमध्ये किशोर कुमार यांची एन्ट्री खूप उशिरा झाली. त्यामुळे किशोर कुमार खरंतर बॅक स्टेजला वैतागले होते. आपल्या एन्ट्री ची वाट पाहत होते. पण स्टेजवर गाणारे दुसरे कलावंत म्हणजे बप्पी लहरी हातातून माईक सोडायला तयार नव्हते. त्यामुळे किशोर कुमार यांनी वैतागून एन्ट्री घेतली आणि आपल्या खास शैलीमध्ये बप्पीला स्टेज सोडायला सांगितले! हा किस्सा हास्य अभिनेता असरानी याने अलीकडेच एका रियालिटी शो च्या कार्यक्रमात गेस्ट म्हणून आल्यानंतर सांगितला होता. खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे! (Entertainment News)
=================================
हे देखील वाचा : Shahu Modak : या खिश्चन कलावंताने २९ वेळा श्रीकृष्णाची भूमिका साकारली!
=================================
खरंतर किशोर कुमार आधी लाईव्ह परफॉर्मन्स किंवा स्टेज शोज करत नव्हते. पण अभिनेता सुनील दत्त यांनी त्यांना एकदा फौजी बांधवांसाठी एक कार्यक्रम करण्यासाठी बॉर्डरवर नेलं आणि तिथे त्यांना गायला लावलं. या कार्यक्रमाला फौजी बांधवांनी प्रचंड जल्लोषात किशोरचे स्वागत केले. किशोर कुमारला आपल्यातलं हे हिडन टॅलेंट तिथेच कळालं आणि त्यानंतर किशोर कुमार देशभर आणि जगभर स्टेज शो करू लागले. सर्वत्र त्यांच्या कार्यक्रमाला प्रचंड दाद मिळू लागली.
ऐंशीच्या दशकामध्ये एकदा संगीतकार बप्पी लहरी यांनी कलकत्त्याला ‘बप्पी- किशोर नाईट’ हा शो ठेवला होता. बप्पी लाहिरी चं तर ते कलकत्ता म्हणजे होम पीच. त्यामुळे तिथे त्याच्या चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. किशोर कुमार देखील पश्चिम बंगालमध्ये प्रचंड लोकप्रिय गायक. त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस इंनडोर स्टेडियम खचाखच भरले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन हास्य अभिनेता असरानी करत होते. सुरुवातीला असं ठरलं होतं की पहिली पाच गाणी बप्पी लाहिरी गातील. आणि त्यानंतर किशोर कुमार यांना स्टेजवर बोलावलं जाईल. त्या पद्धतीने किशोर कुमार बॅक स्टेजला आपल्या एन्ट्री ची वाट पाहत होते.(Kishore Kuamr movies and songs)

बप्पी पहिल्या गाण्यापासूनच पेटला होता. त्याच्या प्रत्येक गाण्याला रसिक प्रचंड दाद देत होते. प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये बप्पी लाहिरी यांचे वडील देखील होते. ते देखील आपल्या मुलाचं कौतुक पाहत होते. पाच गाणी झाली त्यानंतर किशोर कुमार यांच्या एन्ट्री ची अनाउन्समेंट असरानी यांना करायची होती . त्यामुळे ते माईक कडे धावले. परंतु बप्पी लहरी यांनी त्यांच्या हातात माईक मिळू दिला नाही. आणि सहाव्या गाणे सुरू केले आणि हाताने सांगितले की अजून दोन गाणी मी गाणार आहे असे खुणेने सांगितले. असरानी पुन्हा बॅकस्टेजला गेले आणि किशोर कुमार सांगितले की, “बप्पी आणखी दोन गाणी जाणार आहेत. त्यानंतर तुमची एन्ट्री होईल.” किशोर कुमार आता वैतागले. सात गाणी झाल्यानंतर पुन्हा असरानी स्टेजकडे गेले पण पुन्हा तोच प्रकार! (Retro Bollywood News)
================================
=================================
बप्पी लाहिरीने आठव गाणं सुरू केलं; नववं गाणं सुरू केले आणि आता कहर झाला! अर्थात सर्व प्रेक्षक बप्पीची गाणी एन्जॉय करत होती. पण इकडे मागे किशोर कुमार मात्र कमालीचे अस्वस्थ झाले होते ते आपल्या एन्ट्री ची वाट पाहत होते. त्यांनी असरानी विचारले की,” अरे , मेरा भांजा बप्पी उधर कर क्या रहा है?” त्यावर असरानी म्हणाला,” क्या कहू दादा? वो मेरी सुनता ही नही. वो माईक छोडता ही नही.” त्यावर किशोर कुमार म्हणाले,” बेटा ये तेरे बस का रोग नही है. मुझे ही इलाज कुछ करना पडेगा. चलो.” बप्पीचे दहावे गाणे संपत असतानाच किशोर कुमारने एन्ट्री घेतली आणि म्युझिशियन्स बघत हाताने ताल धरला. म्युझिशियन्स ने ते वाजवायला सुरुवात केली. मग किशोरने माईक हातात घेऊन बप्पी कडे पाहत सुरात गात म्हणाले ‘बप्पी रे.. बप्पी रे.. तू जाता क्यू नही … तू जाता क्यू नही… अरे बप्पी .. मेरे भांजे … मेरे भांजे रे s s s s …जा.. जा.. जा.. बप्पी तू वापस स्टेज पे न आ… जा जा मेरे भांजे s s भांजे रे s s भगवान के लिए जा …जा s s “ किशोर कुमारच्या सुरामध्ये हे गात होता. पब्लिकला ते प्रचंड आवडत होतं.