
Dashavatar : ‘राखणदार तुमच्या डोक्यात आहे, जंगलात फक्त… ‘; प्रभावळकरांच्या चित्रपटाचा गुढ ट्रेलर रिलीज
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत कथा, आशय यांचे वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत… पुन्हा एकदा मराठी मातीतील कथा मोठ्या पडद्यावर येत असल्यामुळे प्रेक्षकही पुन्हा एकदा मराठी चित्रपटांकडे वळू लागले आहेत… अशातच ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर ‘दशावतार’ (Dashavatar Movie) चित्रपटात हटके भूमिकेत दिसणार आहेत… नुकत्याच या चित्रपटाचा शानदार ट्रेलर रिलीज झाला आहे… झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेला ‘दशावतार’ हा चित्रपट १२ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे.

कोकणातील ‘दशावतार’ या परंपरेवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. केवळ या कलेविषयीचे कथानक असून त्यात थ्रिलर, गूढ, सस्पेन्स आणि ड्रामा असं मिश्रण चित्रपटात दिसणार आहे. ट्रेलरमध्ये कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, प्रथा-परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा मिलाफ यामध्ये पाहायला मिळणार आहे…

दरम्यान, कोकणातील समृद्ध निसर्गवैभव, गर्द देवराई, या देवरायांचे राखणदार यांचे गूढ या चित्रपटात आहे. कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्री आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या वादळाची गोष्ट यामध्ये पाहायला मिळेल. गावात होणाऱ्या खुनाचे गूढ यामध्ये उलगडत जाणार असून सोबत कोकणातील संक्सृती देखील दिसणार आहे. ‘दशावतार’ चित्रपटात पोलिसांच्या भूमिकेत दिसणारे महेश मांजरेकर हे गूढ कसे उकलणार आणि दशावदार अन् राखणदाराची कहाणी नेमकी काय आहे हे पाहण्याची सगळ्यांनाच उस्तुकता आहे… ‘राखणदार तुमच्या डोक्यात आहे, जंगलात फक्त जनावरं असतात’, ‘तो देवाचा माणूस आहे, तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारुन निघून जाईल’ असे हटके संवादही या ट्रेलरमध्ये विशेष लक्ष वेधतो…
================================
हे देखील वाचा : Dilip Prabhavalkar : ‘कांतारा’ चित्रपटाची Vibe देणारा ‘दशावतार’!
=================================
दशावतार या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असून यात विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.. सुबोध खानोलकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केले असून त्यांनीच या चित्रपटासाठी कथा-पटकथा लेखनाची जबाबदारी सांभाळली आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi