
Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!
एखादा चित्रपट ऐंशी टक्क्याच्या वर तयार होतो त्यानंतर मात्र आर्थिक टंचाईमुळे या चित्रपटाची निर्मिती ठप्प होते पण त्याच वेळी या सिनेमाच्या रेकॉर्ड्स मार्केटमध्ये येतात गाणी प्रचंड गाजत असतात त्यामुळे हा चित्रपट कसाबसा तयार करून तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित होतो. गाण्याच्या जोरावर चित्रपटाला यश मिळते पण चित्रपट निर्मितीमध्ये प्रचंड कालावधी गेला असला तरी गाण्याच्या लोकप्रियतेमुळे चित्रपटा कडे प्रेक्षक येतात. हा किस्सा घडला होता १९७७ साली. मनोज कुमार आणि साधना यांचा हा चित्रपट होता. या चित्रपटाने तसा फारसा काही इतिहास निर्माण केला नाही पण यातली गाणी मात्र आज देखील लोकप्रिय आहेत. कोणता होता चित्रपट आणि नेमकं काय झालं होतं याच्या एवढ्या दिरंगाईला?

१९६७ साली मनोज कुमार आणि साधना यांना घेऊन शत्रूजित पॉल यांनी त्यांच्या बॅनरखाली एका चित्रपटाची निर्मिती सुरू केली. चित्रपटाचे नाव होतं ‘अमानत’. मनोजकुमार आणि साधना त्या काळातील हिट पेअर होती. वह कौन थी, मेरा साया हे त्यांचे सिनेमे पब्लिक पुन्हा पुन्हा पाहत होती. ‘अमानत’ या चित्रपटाला संगीत रवी यांचे होते तर चित्रपटातली गाणी साहीर लुधियानवी यांनी लिहिली होती. चित्रपटात मनोज कुमार, साधना, मेहमूद, बलराज सहानी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आणि काही रील्स बनल्यानंतर फायनान्शिअल प्रॉब्लेम निर्माण झाला. त्यामुळे चित्रपटाचे शूट थांबले.

याच काळात अभिनेत्री साधना हिला थायरॉईडचा प्रॉब्लेम सुरू झाला. त्याच्या उपचारासाठी ती अमेरिकेला निघून गेली. तिकडे तिचा बराच काळ मुक्काम राहिला. ‘अमानत’ चित्रपटाची गाणी स्वरबद्ध झाली होती. साधना भारतात परत आल्यानंतर तिने ‘स्त्री’ नावाच्या एका ओडिया चित्रपटात आणि ‘सच्चाई’ या हिंदी चित्रपटात काम करायला सुरुवात केली. पण ‘अमानत’ चे आर्थिक गणित जमत नसल्यामुळे शूटिंग सुरू होत नव्हते. याच काळात या सिनेमाच्या रेकॉर्डस मार्केट मध्ये आल्या. नंतर १९७० साली पुन्हा चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. १९७२ पर्यंत चित्रपट बऱ्यापैकी पूर्ण झाला पण पुन्हा फायनान्सर आणि निर्माते यांच्यामध्ये वाद झाला. मॅटर कोर्टामध्ये गेले.

या काळात चित्रपटाच्या रेकॉर्ड्स मार्केटमध्ये धुमाकूळ घालत होत्या. यातील गाणी रसिकांना प्रचंड आवडत होती. दूर रह कर ना करो बात करीब आ जाओ, तेरी जवानी तपता महिना आ मेरी रानी लेजा छल्ला निशाना , मतलब निकल गया है तो पहचानते नही यूं जा रहे हो जैसे कोई जानता नही ही रफी ने गायलेली गाणी प्रचंड गाजली. १९७३ साली कोर्ट प्रकरण थांबले मामला थोडा थंड झाला. पण त्याच वेळी अभिनेते बलराज यांचे निधन झालं. त्यांचे डबिंग शिल्लक राहिले होते. त्यामुळे चित्रपट पुन्हा रेंगाळला. तोवर साल १९७५ उजाडलं. चित्रपटाच्या गाण्यांची लोकप्रियता कायम होती तेव्हा निर्मात्याने ठरवलं की हा चित्रपट आपण हा सिनेमा प्रेक्षकां पुढे आणलाच पाहिजे म्हणून हा चित्रपट सेंसर बोर्डाकडे पाठवण्यात आला. सेन्सर बोर्डाने हा सिनेमा संमत केला आणि १९७७ हा चित्रपट प्रदर्शित झाला !
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
हा सिनेमा जेव्हा पडद्यावर आला तेव्हा लोक फक्त गाणी पाहायला गेलो होते. कारण चित्रपटातील वातावरण कम्प्लीट बदललं होतं. दहा वर्षाचा काळ मध्ये निघून गेला होता. मनोज कुमार आणि साधना वयाच्या मनाने खूपच तरुण दिसत होते. प्रेक्षकांनी थेटर वर गर्दी केली पण एवरेज यश या चित्रपटाला मिळाला. ‘अमानत’ हा सिनेमा रेंगाळण्याचे कारण हास्य अभिनेता मेहमूद यांनी वेगळं सांगितलं होतं. त्यांच्या मते मनोज कुमारला मेहमूद ची लोकप्रियता खुपत होती. ‘गुमनाम’ पासूनच त्यांच्यात हा वाद सुरू झाला होता. मेहमूद यांच्यामुळेच या चित्रपटाची निर्मिती झाली होती. मनोज कुमारला मात्र या चित्रपटात मेहमूद च अस्तित्व आणि त्याची वाढती लोकप्रियता नको होती त्यामुळे त्याने स्वतःहूनच चित्रपट डिले करत गेला असं मेहमूदने एका मुलाखतीत सांगितलं होतं. यात सत्याचा भाग किती माहिती नाही पण त्या काळात मेहमूद ची धास्ती बडे बडे स्टार देखील घेत होते हे नक्की. पण एक चांगला चित्रपट जर वेळेत निर्माण झाला असता तर कदाचित या सिनेमाला मनोज कुमार साधनाच्या इतर चित्रपटासारखे यश मिळाले असते असे नक्की वाटते.