
गोल्डन इरातील मान्यवर संगीतकारांनी Mukesh यांचा स्वर का कमी वापरला असावा?
भारतीय चित्रपटाच्या सुवर्ण काळामध्ये गायक मुकेश यांचं स्थान खूप महत्त्वाचे असे आहे. खरंतर त्यांनी गायलेल्या गाण्याची संख्या इतर गायकांच्या तुलनेने अतिशय कमी आहे. अलीकडे सर्व गायक, संगीतकार, गीतकार यांचे गीतकोश उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली प्रत्येकाने किती गाणी गायली. कुणाकडे किती गाणी गायली तसेच कुणासोबत किती गाणी घ्यायची याचा संपूर्ण लेखाजोखा आपल्याला मिळू शकतो. यातून आपण त्या कलावंतांच्या सांगीतिक कारकिर्दीचे तटस्थ पणे व्यवस्थित विश्लेषण करू शकतो.
मुकेश यांच्या एकूण गायलेल्या गाण्याची संख्या १०८१ इतकी आहे. (संदर्भ :मुकेश यांचा गीत कोष). अर्थात काही वेब साईट वर हि संख्या १२०० पर्यंत दाखवली आहे. खरंतर ही संख्या पाहून मुकेश प्रेमींना सुरुवातीला खूप धक्का बसला होता. काहीतरी नक्की चूक आहे असे देखील वाटत होते. पण नंतर या सर्व गीतकोशाची सत्यता तपासल्यानंतर मुकेशच्या गाण्यांची संख्या १२०० च्या आत आहे हे लक्षात येतं. अर्थात संख्यात्मक दृष्ट्या जरी ही आकडा कमी असली तरी मुकेश यांच्या गाण्यांची गुणवत्ता, लोकप्रियता आणि स्मरणरंजता यामध्ये मुकेश इतर कुठल्याही गायकांपेक्षा तसूभर देखील कमी नाही हे लक्षात येतं. तरी देखील काही प्रश्न उरतातच.

हिंदी सिनेमातील तत्कालीन मान्यवर संगीतकारांना मुकेश यांचा स्वर अप्रिय होता का? पन्नास आणि साठ च्या दशकात जेंव्हा मुकेश लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेव्हा शंकर जय किशन आणि कल्याणच्या आनंदजी यांचा अपवाद वगळता मुकेश यांचा स्वर आपल्या संगीतात वापरावा असं इतर संगीतकारांना का वाटत नसावे? हा प्रश्न आहे. मुकेश यांनी सर्वाधिक १३३ गाणी शंकर जयकिशन यांच्याकडे गायली आहेत. कल्याणजी आनंदजी यांच्याकडे ९९ गाणी आहेत तर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे ७२ गाणी गायली आहेत. यानंतर त्यांनी इतर संगीतकारांकडे गायलेले गाण्याची संख्या ५० हून कमी आहे. त्यांनी ६१ संगीतकारांकडे अवघे एक गाणे गायले आहे.
=============
हे देखील वाचा : “मी दुसरी नर्गीस तयार करेन!” असं दिग्दर्शक मेहबूब का म्हणाले?
=============
मुकेश यांनी जवळपास ७५ संगीतकारांकडे अवघी दोन ते नऊ अशी गाणी गायली आहेत. त्यांनी तब्बल १५९ संगीतकारांकडे गाणी गायली होती. काही संगीतकारांची नावे मला खूप सरप्राईजिंग वाटली. कारण त्यांच्या संगीताच्या शैलीमध्ये खरंतर मुकेश यांचा स्वर खूप चांगल्या पद्धतीने वापरता आला असता. पहिलं नाव प्रामुख्याने येतो ते संगीतकार मदन मोहन यांचे. त्यांच्याकडे मुकेश यांनी अवघी नऊ गाणी गायली. खरंतर त्यांच्या पहिल्याच आंखे (१९५१) या चित्रपटात मुकेश यांनी गायले होते. पण त्यानंतर लता मंगेशकर आणि तलत महमूद यांचाच स्वर त्यांच्या संगीतात प्रामुख्याने आल्याने मुकेश यांचा स्वर मागे पडला.
‘हम चल रहे थे वो चल राहे थे मगर दुनिया वालो के दिल जल राहे थे’ (दुनिया न माने), ‘भुली हुई यादे मुझे इतना न सताओ’ (संजोग), ‘चल चल मेरे दिल’ (अकेली मत जइयो), ‘इक मंझील राही दो फिर प्यार न’ (संजोग) हि गाणी लगेच आठवतात. मुकेश यांच्या स्वराला नक्कीच मर्यादा होते पण दर्दभरी गाणी हा त्यांचा यूएसपी होता मदन मोहन यांना त्यांच्या संगीतात हा स्वर अधिक वापरता आला असता असे वाटते. दुसऱ्या संगीतकाराचं नाव म्हणजे संगीतकार सी रामचंद्र. यांच्याकडे मुकेश यांनी अवघी चार गाणी गायली. तिथे सुद्धा एक लक्षात घ्यायला पाहिजे की स्वतः संगीतकार सी रामचंद्र हे चांगले गायक होते. त्यांनी रफी तलत यांचा स्वर माफकच वापरला.

मुकेश यांचं सी रामचंद्र कदम यांच्याकडे सर्वात गाजलेले गाणं म्हणजे राज कपूरच्या ‘शारदा’ चित्रपटातील ‘जप जप जप रे..’ हे गाणे सुद्धा राज कपूरच्या हट्टापायी मुकेश कडून गाऊन घेतले असावे. संगीतकार ओ पी नय्यर यांनी मुकेश यांना आपल्या संगीत नियोजनात फक्त चार गाणी गायला दिली. खर तर ही चारही गाणी आज देखील लोकप्रिय आहेत आहे ‘संबंध’ चित्रपटातील ‘चल अकेला चल अकेला तेरा मेला पीछे छूटा जाये चल अकेला..’ हे गाणं असेल. किंवा ‘एक बार मुस्कुरा दो’ या चित्रपटातील ‘ये दिल लेकर नजराना आ गया तेरा दीवाना’ हे गाणं असेल तसेच याच सिनेमात ‘चेहरे से जरा आचल..’ हे देखील गाणं खूप चांगल्या रीतीने मुकेश यांनी गायले होते.
=================
हे देखील वाचा :‘माझी ओळख ‘मदर इंडिया’ म्हणूनच रहावी’ असे नर्गीस का म्हणत ?
=================
ही झाली वानगी दाखल तीन संगीतकारांची उदाहरणे. पण इतर संगीतकारांकडे मुकेश यांनी गायलेल्या गाण्यांचा लेखा जेव्हा काय होता? रोशन (३६) नौशाद (३०) खय्याम (२६) आर डी बर्मन (१७)सचिन देव बर्मन (११) मुकेश हे अतिशय संवेदनशील आणि दुसऱ्यांच्या भावना जपणारे संगीतकार होते मुकेश यांच्या स्वराचा याथा योग्य वापर संगीतकारंकडून करून घेता आला नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. त्यांच्या संगीतामध्ये मुकेश यांनी गायलेल्या गाण्यांची संख्या आपल्याला कमी का दिसते? इतका मुकेश त्यांना नावडता झाला होता का? आज ही सर्व मंडळी आपल्यात नाहीत. पण त्या काळातील काही उपलब्ध दस्तावेजांमधून आपण काही अंदाज बांधू शकतो. आज २७ ऑगस्ट मुकेश यांचा स्मृतिदिन. २७ ऑगस्ट १९७६ या दिवशी मुकेश यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे पन्नासावे वर्ष आता सुरू होत आहे. मुकेश यांच्या गाण्याची लोकप्रियता आज देखील अबाधित आहे हे आपल्याला विविध सांगीतिक कार्यक्रमातून दिसते.