स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

चिमणराव मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते Bal Karve यांचं निधन
मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकाविश्वाला आपल्या अभिनेयाने समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालं. २८ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या मृत्यूची बातमी मुलगी स्वाती कर्वे हिने दिली होती… अनेक अजरामर भूमिका साकारणाऱ्या बाळ कर्वे यांची चिमणराव (१९७९) मालिकेतील गुंड्याभाऊ ही भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती… त्यांच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीत कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे..

बाळ कर्वे यांनी दिग्दर्शिका विजया मेहता आणि विजया जोगळेकर धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगभूमीवर सुरुवात केली होती… बाळ कर्वे यांनी ‘रथचक्र’, ‘तांदूळ निवडता निवडता’, ‘मनोमनी’, ‘आई रिटायर होते’, ‘कुसूम मनोहर लेले’ अशी अजरामर नाटकं सादर केली होती…
================================
हे देखील वाचा: Ramayana : रणबीर कपूरच्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक!
=================================
बाळ कर्वे यांनी ‘कॉलेज ऑफ इंजिनीअिरग पुणे’ येथून ‘स्थापत्य अभियंता’चं शिक्षण पुर्ण केलं होतं… त्यानंतर ते मुंबई महानगरपालिकेत स्थापत्य अभियंता म्हणून नोकरीला लागले. ३२ वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी रंगभूमीकडे आपली पावलं वळवली… ‘किलबिल बालरंगमंच’ ही छोटीशी संस्था स्थापन केली आणि ते या संस्थेतर्फे बालनाट्ये बसवू लागले.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi