MHJ Unplugged पॉडकास्ट सिरीजमध्येमधून उलगडणार आपल्या लाडक्या हास्यवीरांचं विनोदापलीकडलं आयुष्य

Gulzar : ‘आनेवाला पल जानेवाला है…..’ या गाण्याच्या मेकिंगची भन्नाट कहानी!
प्रतिभावान गीतकार गुलजार यांनी लिहिलेल्या एका कवितेवरून एका सुपरहिट गाण्याचा जन्म झाला. खरंतर गुलजार यांनी ही कविता सहज म्हणून आपल्या डायरी लिहिली होती. त्यांनाही माहित नव्हतं की या कवितेतून एका अतिशय लोकप्रिय गाण्याची निर्मिती होणार आहे. गुलजार यांच्यामधील कवी अतिशय संवेदनशील होता. ही कविता फिलॉसॉफिकल होती. मानवी नातेसंबध आणि जीवनावर तरल भाष्य करणारी होती. पण चित्रपटासाठी या कवितेचे जेव्हा गाणं बनलं तेव्हा ते कल्ट रोमँटिक गाणं बनलं! आज जवळपास पंचेचाळीस पन्नास वर्षानंतर देखील या गाण्याला रसिक प्रचंड दातद देतात. कोणतं होतं ते गाणं? कोणता होता चित्रपट आणि गुलजार यांच्या कोणत्या कवितेचं गाण्यात परिवर्तन झालं होतं? हा किस्सा मजेदार आहे.

सत्तरच्या दशकाच्या अखेरीस दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी एक सिनेमा दिग्दर्शित करत होते ’गोलमाल’. सत्तरच दशक हे हिंदी सिनेमासाठी अतिशय महत्त्वाचे दशक होते. यामध्ये सुरीलं संगीत होतं, ॲक्शन इमोशन्स चा तडका होता ,मारधाड ॲक्शन पॅक सिनेमा होता, लास्ट अँड फाउंड फॉर्मुला होता, मसाला एंटरटेनमेंट होतं…. पण त्याच वेळी ऋषिकेश मुखर्जी आणि बासू चटर्जी हे दोन दिग्दर्शक प्रवाहाच्या विरुद्ध पोहत वास्तववादी आणि संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन होईल असे संस्कृती रक्षक चित्रपट बनवत होते!

या चित्रपटांचा नायक बऱ्याचदा अमोल पालेकर असायचा. अमोल पालेकर टिपिकल मिडल क्लास चे प्रतिनिधित्व करणारा कलाकार होता. बासू चटर्जी यांचा तो अतिशय लाडका कलाकार होता. रजनीगंधा, छोटी सी बात, चितचोर हे त्याचे चित्रपट अमिताभच्या झंजावात देखील चांगला बिजनेस करत होते. दुसरीकडे ऋषिकेश मुखर्जी सुपरस्टार कलावंतांना घेऊन देखील आपल्या सिनेमाचा जॉनर कायम ठेवत होते. आनंद, गुड्डी, मिली, चुपके चुपके, नामक हराम या लोकप्रिय चित्रपटानंतर ऋषिकेश मुखर्जी यांनी एक लाईट कॉमेडी सिनेमा दिग्दर्शित करायचे ठरवले.
‘गोलमाल’ या चित्रपटाचे निर्माते होते एन एन सिप्पी. या चित्रपटात त्यांनी अमोल पालेकर आणि रेखा यांना कास्ट केलं. अमोल पालेकर पहिल्यांदाच ऋषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटात काम करत होते. नंतर रेखा तिच्या अन्य चित्रपटात बिझी असल्यामुळे तिच्या जागी बिंदिया गोस्वामी ची वर्णी लागली. निर्मात्याने सिनेमातील गाणी लिहिण्यासाठी गुलजार यांना आणि संगीतासाठी आर डी बर्मन यांना फायनल केले. चित्रपटाचे नाव होते ‘गोलमाल’.
================================
हे देखील वाचा: Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?
=================================
या चित्रपटाच्या गीत संगीताच्या जेव्हा मीटिंग घेऊ लागल्या तेव्हा ऋषिकेश मुखर्जी देखील या मिटींगला हजर राहू लागले. त्यांनी या चित्रपटात एक सॉफ्ट रोमँटिक गाणे असल्याची जागा दाखवून त्या गाण्याची चर्चा सुरू झाली. पंचमने गुलजारला सर्व कल्पना दिली. गुलजार म्हणाले या टाईपची एक कविता मी नुकतीच लिहिली आहे. आपल्या डायरीत लिहिलेली कविता त्यांनी दाखवली. कवितेच्या पहिल्या ओळी होत्या ‘आनेवाला पल जानेवाला है हो सके तो इसमे जिंदगी बीता लो पल तो ये जानेवाला है…..’ पंचमला आणि मुखर्जी यांना त्या ओळी खूप आवडल्या त्यांनी ती संपूर्ण कविता वाचली. ऋषिकेश मुखर्जी आणि पंचम यांचं मत असं होतं की, “कविता खूप चांगली आहे पण ही खूप फिलॉसॉफिकल वाटते. जड वाटते. आपल्याला इथे रोमँटिक गाणे हवे आहे. ते थोडे लाईट मूडचे पाहिजे!” त्यावर गुलजार म्हणाले,” थांबा आजची रात्र माझ्याकडे द्या. मी उद्या तुम्हाला हिच कविता तुम्हाला पाहिजे तशी गाण्याचे रूपात परावर्तित करून देतो!” रात्री त्यांनी त्याच्यावर मेहनत घेतली आणि त्याचे अंतरे बदलले त्याला एक रोमँटिक टच दिला.

दुसऱ्या दिवशी जेव्हा गुलजार ने आपल्या कवितेच्या केलेल्या गाण्याला पंचमला दाखवले. पंचम बेहद खूष झाला. पंचम म्हणाले,” यार गुलजार, क्या गाना बनाया है,,!” या गाण्याचे म्युझिक तयार झाले. आता हे गाणं कुणाच्या स्वरात गाऊन घ्यायचे यावर चर्चा सुरू झाली. सर्वांचं मत पडलं की हे गाणं येसुदास यांच्याकडून गाऊन घ्यायचं. कारण तो वर येसुदास हाच अमोल पालेकर यांचा आवाज होता. परंतु पंचमच्या मनात हे गाणे किशोर कुमार यांनी गावे असे वाटत होते. त्यांनी तसेच सुचवले देखील. पण सर्वांचं मत होतं की किशोर चा आवाज अमोल पालेकर सूट होणार नाही. पण त्याच वेळी त्यांच्या कानावर अशी चर्चा आली की, बासू चटर्जी अमोल पालेकरला घेऊन एक चित्रपट बनवत आहे ’बातो बातो में’.
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
या चित्रपटात संगीतकार राजेश रोशन यांनी अमोल पालेकरसाठी किशोर कुमार यांचा स्वर वापरला आहे. अमोल साठी किशोर कुमार हे कॉम्बिनेशन पहिल्यांदाच त्या चित्रपटात होत. त्यामुळे गोलमाल च्या टीमने देखील किशोर कुमारला पाचारण केलं. किशोर कुमार याला हे गाणं खूप आवडलं आणि आपल्या धुंद स्वरांमध्ये किशोर कुमारने हे गाणे रेकॉर्ड केले. पंचम यांनी या गाण्यात भरपूर वाद्यांचा वापर केला . राग किरवाणी आधारीत हे गाणे अतिशय मेलडीयस बनलं.
या गाण्याच्या रेकॉर्डिंग च्या वेळेला किशोरचा स्वर संपूर्ण स्टुडिओमध्ये भारावला होता त्याच वेळेला उपस्थित असणारे सगळ्यांना असं वाटलं की हे गाणं सुपरहिट होणार आणि तसंच झालं. ‘आने वाला पल जानेवाला है..’ या गाण्याला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट गीताचा फिल्मफेअर पुरस्कार गुलजार यांना मिळाला. बासू चटर्जी यांचा ‘बातो बातो मे’ हा चित्रपट 13 एप्रिल 1979 या दिवशी प्रदर्शित झाला तर ऋषिकेश मुखर्जी यांचा गोलमाल हा चित्रपट 20 एप्रिल 1979 या दिवशी प्रदर्शित झाला. एका आठवड्याच्या अंतराने प्रदर्शित झालेले दोन्ही सिनेमे सुपर हिट झाले!