Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक

Punjab Floods And Bollywood : कलाकरांचा मदतीचा हात, कुणी केली आर्थिक मदत तर कुणी घेतली गाव दत्तक
पंजाबमधील पुरस्थिती सधा फार भयंकर झाली आहे… आत्तापर्यंत या पूरात ४५ पेक्षा अधिक जणांचा जीव गेल्याची माहिती समोर येत आहे… यादरम्यान केंद्रीय संस्था राज्यातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काम करत आहेत. या पूरजन्य परिस्थितीत पंजाब नागरिकांच्या मदतीला बॉलिवूड कलाकार आले आहेत... जाणून घेऊयात कोण-कोणत्या कलाकारांनी पुरग्रस्तांना मदत केली आहे…(Punjab Floods 2025)

बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला असून यामध्ये संजय दत्त, सनी देओल, शिल्पा शेट्टी, विकी कौशल, भूमी पेडणेकर, करीना कपूर खान, आलिया भट्ट या कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. आलियाने देणगीच्या लिंक्स शेअर केल्या आहेत… तर, सोनू सूदने एक हेल्पलाइन सुरू केली आणि त्यांची घरं पुन्हा उभारण्यासाठी पूर्ण मदतीचे आश्वासनही त्याने दिले आहे… दिलजीत दोसांझने दहा गावे दत्तक घेतली आहेत, अॅमी विर्कने २०० घरे पुन्हा बांधण्याचे वचन दिलंय. इतकंच नाही तर, अक्षय कुमारने ५ कोटींची मदत जाहिर केली आहे.. या कलाकारांच्या यादीत याबरोबरच, सोनम बाजवा, गिप्पी ग्रेवाल, सतींदर सरताज आणि करण औजला यांच्या नावाचाही समावेश होतो…(Entertainment News)
================================
हे देखील वाचा : पहिल्यांदाच दिसली ‘किंग’ची झलक, Shah Rukh Khanचा लूक पाहून चाहते झाले थक्क!
=================================
दरम्यान, पंजाबमधील पुर परिस्थिती कधी आणि कशी आटोक्यात येईल याचा अंदाज सध्या तरी कुणालाच लावता येत नाही आहे… मात्र, देशभरातून पंजाबमधील नागरिकांना मदतीचा हात पुढे केला जात असून लवकरच हे नैसर्गिक संकट टळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi