Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Siddharth Ray : “त्याला उचकी आली आणि…”, ‘अशी ही बनवाबनवी’तील शंतनूचं निधन कसं झालं?
१९८८ साली रिलीज झालेला ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे… चित्रपटातील प्रत्येक दृष्य, डायलॉग्स आणि कलाकारांच्या भूमिका मनात घर करुन बसल्या आहेत… सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सिद्धार्थ रे यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे…‘अशी ही बनवा बनवी’ (Ashi Hi Banva Banvi) या एव्हरग्रीन चित्रपटात शंतनूच्या भूमिकेतून सिद्धार्थ रे (Siddharth Ray) याने चांगलीच लोकप्रियता मिळवली… मात्र, फार कमी वयात सिद्धार्थचं निधन झालं… नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थची बायको अभिनेत्री शांती प्रिया हिने सिद्धार्थसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल आणि त्याच्या निधनाबद्दल सांगितलं आहे…

शांती प्रियाने स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या व सिद्धार्थच्या पहिल्या भेटीबद्दलच्या आठवणी सांगितल्या… ती म्हणाली की, “एका इव्हेंटमध्ये आम्ही भेटलो. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि मला स्पेशल वाटलं. तो सिनेइंडस्ट्रीतील एका मोठ्या कुटुंबातून आला होता, पण त्याच्यात अजिबात अॅटिट्यूड नव्हता. नंतर आमची ओळख झाली आणि पहिल्या भेटीला एक वर्ष होण्याआधीच आम्ही लग्नबेडीत अडकलो”.
चित्रपटांमध्ये चांगलं करिअर सुरु असताना सिद्धार्थ रे याचं २००४ साली हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं… त्या दिवसाबद्दल शांती प्रियाने मुलाखतीत म्हटलं की, “ते खूप धक्कादायक होतं. संध्याकाळची जेवणाची वेळ होती. तो धाकट्या मुलाला काहीतरी शिकवत होता. आम्ही सगळेच जेवणाच्या टेबलावर बसलो होतो. त्याला अचानक उचकी आली आणि त्याने डोकं खाली टेकवलं. तो अगदी सहज कोणत्याही त्रासाशिवाय गेला. मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही”.
================================
हे देखील वाचा : Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट
=================================
प्रिया पुढे म्हणाली, ठसिद्धार्थला तसं पाहून मला काहीच सुचत नव्हते. मी काहीच करू शकत नव्हते. माझी मदतनीस आली आणि तिने त्याला वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले. आमच्या वरच्या मजल्यावर डॉक्टर राहत होते. त्यांना बोलावलं. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले. इंजेक्शन दिलं. पण काहीच उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मी स्तब्ध झाले होते. कसं व्यक्त व्हावे, ते मला कळतच नव्हते. इमोशन्स व्यक्त करू की जबाबदारी घेऊ, हे मला समजतच नव्हते. त्यानंतर मी लोकांपासून दूर होऊ लागले. रडले नाही. मला कोणाचीही मदत घ्यायची नव्हती. सर्व विधी संपल्यानंतर मला अचानक जाणवलं की तो आता आमच्यासोबत नाही“…

सिद्धार्थने ‘नजर के सामने’, ‘जोर’, ‘गोलमाल’, ‘मेला’, ‘बिच्छु’, ‘बाजीगर’, ‘खलनायक’, ‘नायक’, ‘इन्कार’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’, ‘वंश’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली होती…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi