
Saiyaara आता OTT गाजवणार!
ह्रतिक रोशन, रजनीकांत, टायगर श्रॉफ अशा बड्या स्टार कलाकारांचे चित्रपट आले असले तरी अजूनही सैय्यारा चित्रपटाची चर्चा जोरदार सुरु आहे… Gen Z प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या या सैय्यारा चित्रपटाने बरेच रेकॉर्ड मोडले आहेत… तरुणाईला थिएटर्समध्ये ढसाढसा रडायला भाग पाडणारा हा चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे… भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या लव्हस्टोरी चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाने आपले नाव कोरले असून यातअहान पांडे (Ahan Pandey) आणि अनीत पड्डा (Aneet Padda) यांच्या प्रमुख भूमिका आहेत…

दरम्यान, प्रेक्षकांना आता ‘सैय्यारा’ १२ सप्टेंबर २०२५ पासून नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर पाहता येणार आहे… विशेष म्हणजेओटीटी रिलीजपूर्वीच, निर्मात्यांनी चाहत्यांना एक नवीन सरप्राइज दिले आहे. चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणेच दोन नवीन गाणी त्यांनी रिलीज केली आहेत. सैय्यारा चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सुरीचं असून अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या भिनयाने संपूर्ण देशाला वेड लावले आणि आज ही दोघं जनरेशन जेन झीचे नवे सुपरस्टार बनले आहेत.
====================================
हे देखील वाचा : Gen Z जनरेशनच्या डोळ्यात पाणी आणणारा Saiyaara ओटीटीवर कधी येणार?
====================================
‘सैय्यारा’च्या संगीत अल्बमनेही अनेक रेकॉर्ड मोडले आहेत… चाहत्यांचे अफाट प्रेम पाहून, यशराज फिल्म्स म्युझिकने एक्सटेंडेड अल्बम रिलीज केला आहे, ज्यात दोन नवीन गाण्यांचा समावेश आहे. तसेचस बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार सैय्यारा चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १७२.७५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात १०७.२५ कोटी, तिसऱ्या आठवड्यात २८.२५ कोटी, चोथ्या आठवड्यात १४.१ कोटी, पाचव्या आठवड्यात २.९५ कोटी, सहाव्या आठवड्यात २.९ कोटी कमवत एकूण ३२९.२ कोटी कमावले आहेत… ४०-५० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या सैय्याराने प्रेक्षकांना वेड लावत दुप्पट कमाई केली आहे… (Saiyaara box office collection)