….आणि Lata Mangeshkar आणि सचिन देव बर्मन यांच्यातील मतभेद मिटले!

Dashavatar Box Office Collection : मराठी प्रेक्षकांना दशावताराची भूरळ; ३ दिवसांत कमावले बक्कळ कोटी
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘दशावतार’ (Dashavatar) हा चित्रपट सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे… या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी चित्रपटांचा सुगीचे दिवस आले आहेत… कोकणातील लोकप्रिय ‘दशावतार’ ही परंपरा आणि त्यासोबतच एर गुढ कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे… विशेष म्हणजे २०२५ मध्ये उत्तम कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये या चित्रपटाची नोंद झाली आहे… जाणून घेऊयात १२ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या दशावतारने अवघ्या ३ दिवसांमध्ये किती कमाई केली आहे…(Marathi movie 2025)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘दशावतार’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ५८ लाख, दुसऱ्या दिवशी १.३९ कोटी, तिसऱ्या दिवशी २.४ कोटी कमवत आत्तापर्यंत ३ दिवसांत ४.३७ कोटी कमावले आहेत… पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना आपल्या मातीतला आणि एक वेगळा विषय मांडणारा चित्रपट पाहायला मिळाला असून विशेष आनंद नक्कीच झाला आहे… ४ दिवसांमध्ये ४ कोटींचा टप्पा पार करणारा दशावतार लवकरच १० कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा नक्कीच आहे…(Dashavatar box office collection)
================================
हे देखील वाचा : Dilip Prabhavalkar : होय महाराजा! ‘दशावतार’ चित्रपटाने गाजवलं बॉक्स ऑफिस!
=================================
कोकणात घडणाऱ्या गूढ कथेवर आधारित ‘दशावतार’ चित्रपटात विविध स्वभावांची माणसं, तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो… दरम्यान, या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्रीचं काम केलं आहे….त्यांच्यासोबत या चित्रपटात महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.(Marathi entertainment news)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi